Skip to main content

कॅल्शियमसाठी दुधाशिवाय अन्य पर्याय

  ब्लॉग नं. 2026/129. दिनांक: 9 मे, 2026.   मित्रांनो, दुधाशिवाय कॅल्शियम ? हाडांच्या बळकटीसाठी दुधापेक्षाही सरस आहेत हे पदार्थ आपण लहानांपासून ऐकत आलो आहोत की , हाडांच्या बळकटीसाठी ' दूध ' हाच सर्वोत्तम उपाय आहे. दुधाला कॅल्शियमचा खजिना मानले जाते , हे खरेच आहे.पण , जर मी तुम्हाला सांगितले की दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असलेले,अनेक पदार्थ आपल्या आसपास सहज उपलब्ध आहेत , तर ? कदाचित हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल , पण ही वस्तुस्थिती आहे.चला तर मग , आजच्या ब्लॉगमध्ये,आपण अशाच काही कॅल्शियमयुक्त पदार्थांबद्दल जाणून घेऊया,जे तुमच्या दैनंदिन आहाराला अधिक पौष्टिक बनवू शकतात. सविस्तर: दुधाचे प्रमाण आणि आपली गरज सुरुवातीला एक बेसिक गोष्ट समजून घेऊ.एका कपात (245 मिली) सुमारे 305 मिग्रॅ कॅल्शियम असते. प्रौढांसाठी कॅल्शियमचे दररोजचे शिफारस केलेले प्रमाण ( RDA) 1 ,000 ते 1,200 मिग्रॅ इतके आहे. याचा अर्थ , केवळ एक ग्लास दुध, हे तुमची दैनंदिन गरज पूर्ण करण्यासाठी पुरेसे नाही.तर मग , कॅल्शियमच्या पूर्ततेसाठी इतर कोणते पर्याय आहेत ? पाहूया: 1 . चीज आणि दुग्धजन्य पदार्थ : ·...

हात पाठीमागे नेण्यासाठी संघर्ष करावा लागतोय?

ब्लॉग सं. 2025/146.

दिनांकः 27 मे, 2025.

मित्रांनो

            तुम्ही जर हातापायांचे stretching exercises करत नसाल तर,कधी कपडे वळत घालण्यासाठी किंवा काही वारूण खाली काढण्यासाठी हात वर केला तर,लक्षात येतं की हात वर जातं नाहीये.अन मग आपण कां जात नसेल? त्याच्यासाठी काय उपाय करावेत वगैरे वगैरे विचार करू लागतो अन मग हात व्यवस्थित व्हायला आठ दहा दिवसांचा वेळ लागतोच.आज आपण आजच्या ब्लॉगमधून हे जाणून घेऊ या की, हे असं कां होतं आणि त्याची कारणे आणि उपाय.

सविस्तर:

खांद्याच्या हालचालींवर मर्यादा येणे,हा अनेक व्यक्तींना जाणवणारा सामान्य आरोग्यदोष आहे, विशेषत: वयानुसार.जसे की दैनंदिन कामे, जसे ब्लाउज/बनियन किंवा टी शर्ट घालणे किंवा वस्तू उचलणे, अचानक कठीण होऊ शकते.या परिस्थितीला अनेक आरोग्यविषयक कारणे असू शकतात,ज्यामध्ये रोटेटर कफ दुखापत, गोठलेला खांदा forzen shoulder, संधिवात, बर्साइटिस, आणि टेंडिनाइटिस यांचा समावेश होतो.

रोटेटर कफ दुखापत

रोटेटर कफ हा खांद्याच्या सांध्याभोवती असलेल्या स्नायू आणि टेंडन्सचा समूह आहे, जो खांद्याच्या हालचालींसाठी आवश्यक आहे. या दुखापतीची कारणे:

·        स्नायू फाटणे किंवा नुकसान होणे.

·        वयानुसार होणारी झीज.

·        खांद्यावर अनियमित भार पडणे.

लक्षणे

·        खांद्यामध्ये वेदना आणि अशक्तपणा.

·        हात उंचावणे किंवा मागे हलवणे कठीण होणे.

गोठलेला खांदा (Frozen Shoulder)

गोठलेल्या खांद्यामध्ये मसल्स घट्ट होतात,ज्यामुळे वेदना आणि हालचालींमध्ये कडकपणा येतो.
प्रमुख कारणे

·        मधुमेह किंवा थायरॉईडसारखे चयापचय विकार.

·        दीर्घकाळ खांद्याचा निष्क्रियपणा.

इतर संभाव्य कारणे

1.       संधिवात: सांध्यामधील जळजळ आणि हाडांची झीज.

2.       बर्साइटिस: सांध्याभोवतीच्या द्रवाच्या पिशवेत जळजळ होणे.

3.       टेंडिनाइटिस: टेंडन्समध्ये सूज येणे.

उपचार आणि व्यवस्थापन

यावर उपायांसंबंधी बोलतांना तज्ञ म्हणतात,खांद्याच्या हालचालींवर मर्यादा येणे म्हणजे नेहमीच गंभीर समस्या असेल असे नाही. परंतु वेदना कायम राहिल्यास किंवा हालचाली अजून कठीण झाल्यास वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

उपचार पद्धती:

1.       औषधे: वेदनाशामक औषधे आणि जळजळ कमी करणाऱ्या गोळ्या.

2.       थेरपी:

o   फिजिओथेरपी: कडकपणा कमी करण्यासाठी नियमित व्यायाम.

o   उष्ण उपचार (Hot packs): सांध्यातील जळजळ कमी करणे.

3.       शस्त्रक्रिया: रोटेटर कफ फाटण्यासारख्या गंभीर अवस्थांमध्ये शस्त्रक्रियेची आवश्यकता असू शकते.

प्रतिबंधक उपाय:

·        नियमित व्यायाम करून खांद्याचे स्नायू मजबूत करणे.

·        दीर्घकाळ एकाच स्थितीत काम केल्यास मधून-मधून विश्रांती घेणे.

·        संतुलित आहाराने हाडे व सांधे निरोगी ठेवणे.

समारोप:

            अशा प्रकारच्या आजारामध्ये ते लवकर लक्षांत येणे आणि त्यावर लवकरात लवकर उपचार घेणे आवश्यक होऊन बसते.कारण दुर्लक्ष केल्यास हा आजार बळावू शकतो आणि त्याचा त्रास वधू शकतो. म्हणून,      सांधेदुखी किंवा खांद्याच्या कडकपणामुळे ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी,लवकरात लवकर उपचार घेऊन जीवनाचा दर्जा सुधारावा. वेळेवर उपचार आणि नियमित काळजी घेतल्यास ही समस्या दूर होऊ शकते.

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर जरूर लिहा. पुनः भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

प्रसाद नातु, पुणे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...