Skip to main content

ताटात भात आणि पोळी दोन्ही एकत्र असावे की नाही? 2106

  ब्लॉग नं. 2026/1 72.   दिनांक: 21 जून, 2026.   मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात,रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात एक चर्चा नेहमी रंगते, " मधुमेह ( Diabetes) असेल , तर ताटात भात आणि पोळी दोन्ही एकत्र असावे की नाही ?" आपल्या समाजात हा समज इतका घट्ट रूढ झाला आहे की , रक्तातील साखर वाढण्याच्या भीतीने,अनेक रुग्ण नाईलाजाने या दोन मुख्य पदार्थांपैकी एकाचीच निवड करतात. पण खरंच हा नियम वैद्यकीयदृष्ट्या योग्य आहे का ? चला , आजच्या ब्लॉगमध्ये,आपण यामागील वैज्ञानिक सत्य आणि योग्य पद्धत सविस्तरपणे जाणून घेऊया. सविस्तर: 🛑 समज की गैरसमज ? काय म्हणतात तज्ज्ञ ? ' जीव्हीके हेल्थकेअर ' चे वैद्यकीय संचालक आणि वरिष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ. एन. जी. शास्त्री यांच्या मते , भात आणि पोळी यांचे एकत्र सेवन करणे ही अजिबात समस्या नाही. हा एक मोठा गैरसमज आहे. डॉ. शास्त्री म्हणतात: " भात आणि पोळी हे दोन्ही कर्बोदकांचे ( Carbohydrates) स्रोत आहेत.जेव्हा आपण ते खातो , तेव्हा शरीर ऊर्जेसाठी त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते.खरी समस्या या दोन पदार्थांच्या संयोजनात ( Combinat...

आपल्याला आजार कां होतो?

ब्लॉग नं. 2025/089.

दिनांक:- 30 मार्च, 2025. 

मित्रांनो

            आपण जरी स्वीकारत नसलो तरी आपण आजारी पडत असतोच आणि आपलं मन ही एक अशी गोष्ट आहे की,जी आपल्याला नेहमीच आजारी करून ठेवते जर तुमचे मन कमकुवत असेल तर.कुठल्याही गोष्टीची सारखी चिंता करत राहाणं, नकारात्मक विचार बाळगणं आणि ते सर्वत्र व्यक्त करत फिरणं, कुठल्याही गोष्टीवर सतत टिकाच करत राहणं हे देखिल सगळे आजार आहेत.पण एक गोष्ट मात्र खरी आपण आजारी कां पडतो? त्याचं नेमकं कारण शोधायचा,आपण कधीच प्रयत्न करत नाही.आजच्या ब्लॉग मध्ये मात्र आपण याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सविस्तर:

का होतो आजार?

आपल्याला आजार का होतो, हा प्रश्न प्रत्येकालाच कधी ना कधी पडतो. त्याचे उत्तर आश्चर्यकारकपणे सोपे आहे,आपण आजार स्वतःहून स्वीकारतो, म्हणून ! हो आपण आजार स्वीकारतो म्हणून ! आपल्यामध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती आहे,जी आपल्या शरीराला आजारांपासून वाचवण्यासाठी अखंड काम करत असते. परंतु आपण आपल्या मनाच्या चुकीच्या धारणा, अंधश्रद्धा, आणि नकारात्मक विचारांमुळे या शक्तीला दुर्बळ करतो.

शरीराची नैसर्गिक क्षमता आणि मनाचे महत्त्व:

आपल्या शरीरात पाण्यावर तरंगण्याची नैसर्गिक क्षमता आहे.तरीही, माणसं पाण्यात बुडून मरतात, कारण त्यांनी स्वतःच्या मनाला पटवले असते की, "मला पोहता येत नाही." हत्ती, साप, आणि इतर प्राणी सहजपणे पाण्यात तरंगतात. कारण त्यांना त्यांच्या क्षमतेवर विश्वास आहे. याचप्रमाणे, आपल्या शरीरात एक नैसर्गिक प्रतिकारशक्ती आहे, जी आपल्याला बऱ्याच आजारांपासून वाचवते. पण आपण तिला काम करायची संधीच देत नाही. लहानशा तापासाठी औषधं घेऊन आपण शरीरावर अविश्वास दाखवतो.प्रतिकारशक्तीला काम करू द्यायचं सोडून आपण औषधोपचारांवर अवलंबून राहतो, जे शरीरावर अतीव ताण आणते.

अज्ञात मन: आपल्या आरोग्याचा खरा सूत्रधार:

अज्ञात मन (subconscious mind) आपल्या शरीराच्या आतल्या क्रियांवर नियंत्रण ठेवते.भिती, चिंता, आणि नकारात्मक विचार शरीरावर नकारात्मक परिणाम करतात.

उदाहरणार्थ:

·        परीक्षेचा ताण असल्यावर पोटात गोळा येतो.

·        भीती वाटल्यावर घशाला कोरड पडते.

·        सतत आनंदी राहणारे लोक क्वचितच आजारी पडतात.

याचा अर्थ आपले विचार आणि भावनिक स्थिती शरीराच्या कार्यावर थेट प्रभाव टाकतात.

विचारांमुळे होणारे आजार:

1. ब्लडप्रेशर आणि हृदयविकार:

ज्यांना सतत राग येतो, जे लोक नेहमीच रक्त खवळल्याच्या किंवा डोक्याचा स्फोट झाल्याच्या भावना व्यक्त करतात,त्यांना हृदयविकारांचा धोका जास्त असतो.त्यांचे विचार त्यांच्या रक्ताभिसरणावर नकारात्मक परिणाम करतात.

2. आतड्यांचे विकार:

स्वतःला नकारात्मकपणे पाहणाऱ्या किंवा स्वतःवर टीका करणाऱ्या लोकांना आतड्यांच्या विकारांचा सामना करावा लागतो. अशा व्यक्तींमध्ये लहान आतड्यांच्या कार्यामध्ये बिघाड होतो.

3. अपचन:

बालपणीच्या कडक शिस्तीचा मनावर परिणाम झाल्यामुळे,काही लोक मलविसर्जनाच्या नैसर्गिक प्रक्रियेवर नियंत्रण गमावतात. आर्थिक समस्या किंवा कंजुष वृत्ती असलेल्या लोकांमध्येही अपचन आणि मुळव्याध समस्या जास्त आढळतात.

4. डोकेदुखी:

"त्यानं किंवा तिनं माझं डोकं खाल्लं,यार " किंवा "माझं डोकं दुखतंय" असे सतत बोलत राहिल्याने अज्ञात मन डोकेदुखीची सवय लावते. मायग्रेनसारखे विकार यामुळे अधिक चिघळतात.

5. पाठदुखी आणि कंबरदुखी:

ज्यांना जबाबदाऱ्यांचे सतत ओझे वाटते, अशा लोकांना पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास होतो. हे शरीराच्या स्नायूंवर येणाऱ्या ताणामुळे घडते.

आजारांवर उपाय: स्वयंसुचना (Autosuggestions):

औषधोपचार चालू ठेवणं महत्त्वाचं आहे, पण आजारांपासून पूर्ण मुक्ती हवी असेल तर अज्ञात मनावर सकारात्मक परिणाम करणाऱ्या स्वयंसुचनांचा वापर करा.

उदाहरणार्थ  डोकेदुखी दूर करण्यासाठी तंद्रावस्थेत स्वतःला पुढील सूचना द्या:

"माझं डोकं हलकं होत आहे. रक्त सुरळीत वाहत आहे. माझ्या डोक्यातील ताण कमी होत आहे, आणि मला हलकं वाटत आहे." अशा स्वयंसुचना अज्ञात मनाला योग्य संदेश पोचवतात आणि शरीर नैसर्गिकरित्या बरे होण्याची प्रक्रिया सुरू करते.

भावनांचा मुक्त प्रवाह: एक गरज:

भावनांना दडपून ठेवणं हा रोगांचा उगम आहे. राग, दु:ख, किंवा अस्वस्थता व्यक्त केली नाही, तर त्या भावनांचा दाह शरीराला पोखरतो. भावनांना मुक्त करायचं असेल तर, त्या लिहून काढा आणि नंतर त्या नष्ट करा.

समारोप:

तुम्हाला नेहमी निरोगी जीवन व्यतीत करायचे असेल तर आरोग्यासाठी सकारात्मक जीवनशैली स्वीकारायला हवी.तसेच शरीराच्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीवर विश्वास ठेवा आणि मानसिक ताणतणाव दूर ठेवा. भावनांना मुक्त होऊ द्या. आपल्या अज्ञात मनावर सकारात्मक परिणाम करायचा असेल, तर योग्य विचारांची सवय लावा. "भावना अडवल्या तर रोग येतात, आणि व्यक्त केल्या तर मोकळं वाटतं." म्हणून भावना मनांत साठवून ठेवण्याऐवजी त्यांना मोकळं करा. यामुळे तुमचं शरीर आणि मन तंदुरुस्त राहील आणि तुम्ही निरोगी जीवन जगू  शकाल.

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, याविषयी कमेंट बॉक्स मधे जरूर लिहा. पुढील ब्लॉग येई पर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्वस्थ रहा, आनंदी रहा, मस्त जगा. 

 

 प्रसाद नातु.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...