Skip to main content

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

हमको किसके ग़म ने मारा, ये कहानी फिर सही

ब्लॉग नं.2025/072

दिनांक:- 13 मार्च, 2025.

मित्रांनो,

            काल सहज मूड बदलावा म्हणून गज़ल ऐकत बसलो होतो.मला गुलाम अली यांच्या गज़ल खूप आवडतात.त्यांच्या आवाजात जी फिरत आहे आणि शब्दोच्चारामध्ये जी नजाकत आहे.ती अक्षरशः वेड लावते.मधे केव्हा कुठे एखादी सुरेल तान किंवा आलाप घेतील,ते देखील आपल्याला त्या धुंदीत ठेवूनच.अशीच एक गज़ल मसरूर अन्वर यांची, हमको किसके ग़म ने मारा, ये कहानी फिर सही”.ऐकता ऐकता मनात आलं, याच्यावर ब्लॉग लिहिता येईल.थोडा ब्लॉगवरचा विषय देखील चेंज होईल आणि म्हणतात की Change हा हवाच आणि तो चांगल्यासाठी असेल तर मग क्या बात है.     

सविस्तर:

या गझलच्या सुरुवातीला,एक छान सा शेर आहे.

गझलकार म्हणतो,,   

दिल की चोटों ने कभी चैन से रहने न दिया ।   

जब चली सर्द हवा मैंने तुझे याद किया ।

इसका रोना नहीं क्यूँ तुमने किया दिल बर्बाद ।

इसका ग़म है कि बहुत देर में बर्बाद किया ।

मराठी अर्थ;

मनाला झालेल्या वेदनांनी मला कधी स्वस्थ बसू दिले नाही.

म्हणूनच असेल की थंड हवा सुटली तशी तुझी आठवण आली. 

मला या गोष्टीचे वाईट वाटत नाही की,तू माझं मन मोडलंस,बेचिराख केलस

खेद या गोष्टीचा आहे की हे सारं तू फार उशिरा केलस. 

पुढे गझलकार म्हणतो,  

हमको किसके ग़म ने मारा, ये कहानी फिर सही ।

किसने तोड़ा दिल हमारा, ये कहानी फिर सही

मराठी अर्थ;

कुणी दिलेल्या दु:खामुळे मी दु:खी झालो.ही बाब अलहिदा.  

माझं हृदय कुणी तोडलं ही बाब अलहिदा..

पुढे गझलकार म्हणतो,

दिल के लूटने का सबब पूछो न सबके सामने ।

नाम आएगा तुम्हारा, ये कहानी फिर सही ।

मराठी अर्थ;

माझे हृदय कुणी चोरले हे सर्वांसमोर विचारू नकोस.

कारण तुझेच नाव घेतले जाईल, ही बाब अलहिदा.. 

पुढे गझलकार म्हणतो,

नफरतों के तीर खा कर, दोस्तों के शहर में । 

हमने किस किस को पुकारा, ये कहानी फिर सही ।

मराठी अर्थ;

 

मित्रांच्या शहरात असून देखिल टोचून बोलणी ऐकायला मिळाली.

तेव्हा मी कुणाकुणाला हाक दिली, ही बाब अलहिदा.  

पुढे गझलकार म्हणतो,

क्या बताएं प्यार की बाजी, वफ़ा की राह में ।

कौन जीता कौन हारा, ये कहानी फिर ।

मराठी अर्थ;

मी तर प्रेमात निष्ठेच्या मार्गानेच चाललो होतो.

यात जिंकले कोण आणि हरले ही बाब अलहिदा.

समारोप:

थोडक्यात काय तर,प्रेमभंग झालेला प्रेमी निराश आहे,उदास आहे, दु:खी आहे.पण तो दु:खी या गोष्टीमुळे नाही की त्याचा प्रेमभंग झाला आहे.तर त्याला खेळवलं गेलंय,त्याचा गेम केलाय,त्याला पुरत प्रेमाच्या अथांग सागरात आकंठ बुडवून मग सोडून दिल आहे.याचं दु:ख आहे.इतके झाल्यावर देखील तिचे नांव जमान्यासमोर येऊ नये ही त्याची इच्छा आहे.त्याच्या मित्रांच्या शहरात,त्याने कुणाकुणाला हाक मारली नाही.पण त्याला कुणाचा आधार मिळाला नाही,उलट टोचून बोलणी खावी लागली.ह्याचे दु:ख त्याला अधिक आहे.तो प्रेमात हरला की जिंकला याचे त्याला देणे घेणे नाही.निष्ठेच्या मार्गाने जाऊन देखील ही अवस्था आहे,याचे दु:ख अधिक आहे.   

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, याविषयी कमेंट बॉक्स मधे जरूर लिहा. पुढील ब्लॉग येई पर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्वस्थ रहा, आनंदी रहा, मस्त जगा.

 

 

प्रसाद नातु.                

Comments

  1. जबरदस्त, गझल मध्ये इतका सामर्थ्य असतं हे पहिल्यांदा समजलं. कारण पहिल्यांदाच गझल वाचली आणि समजून घेतली केवळ आपल्यामुळेच.खूप खूप धन्यवाद🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...