Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

महाराष्टातील सरकार स्थापनेतील गोंधळ

ब्लॉग नं. 2024/293.

दिनांक:4 डिसेंबर,2024.

मित्रांनो,

            महाराष्ट्रातील सरकार स्थापनेचा गोंधळ 10 दिवस होऊन गेले तरी संपला नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री इतरांची काळजी करण्याऐवजी स्वतःची काळजी घेण्यात मश्गुल आहेत. 2022 ला पाच वर्षे मुख्यमंत्री पद भूषविलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पार्टीच्या आदेशानुसार दुय्यम पद स्वीकारलं. आणि केवळ अडीच वर्षे मुख्यमंत्री पद भूषविलेल्या एकनाथ शिंदे यांना आता उपमुख्यमंत्री होणे अपमानास्पद वाटतंय.गंमत आहे ना. तिकडे विरोधी पक्ष जो पराभव झाला आहे,त्यातून अजून बाहेर पडायला तयार नाही.स्वीकारायला तयार नाही की आपला पराभव झाला आहे. ते EVM मध्येच अडकला आहे. या विषयावर आहे आजचा ब्लॉग.   

सविस्तर:

            2022 ला ध्यानीमनी नसतांना, आताचे काळजीवाहू मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.ते पूर्वीच्या शिवसेनेत असते. तर त्याना हे पद कधी मिळाले असते कां? हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारायला हवा. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस ज्यांनी 5 वर्षे मुख्यमंत्री पद भूषविले ते शिंदेच्या सरकारमध्ये. जे शिंदे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होते,त्यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री भूषवायला तयार झाले.मग आता भारतीय जनता पक्षाच्या 132 जागा निवडून आल्यावर मुख्यमंत्री त्याच पक्षाचा असेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार हे माहीत असतांना अजून देखिल अडून बसले आहेत.पदाची लालसा नाही आणि कॉमन मॅन आहे असे म्हणत म्हणत ते मुख्यमंत्री पदाची लालसा बाळगून बसलेच कसे? हा प्रश्न शाळेत जाणाऱ्या मुलाला देखिल कळू शकेल.एवढे प्रचंड बहुमत मिळवूनही जर सरकार स्थापन करायला वेळ लागतं असेल तर ही कुठल्या प्रकारची लोकशाही आहे.

            तिकडे महाराष्ट्रातील विरोधी पक्ष EVM यंत्रात गडबड म्हणून ओरडत आहे.कॉंग्रेसने कित्येक दिवसांत आत्मपरीक्षण केलेले नाही.स्वतःचा पक्ष जिंकला तर तो त्यांच्या कर्तृत्वावर आणि हरला तर EVM मुळे. स्वतःचे कुठे चुकले हे पहाण्याऐवजी EVM खराब म्हटलं की आपल्या दोषांवर पांघरूण घातले जाते. त्यामुळे एका वेळेस संपूर्ण भारतावर राज्य करणाऱ्या कॉंग्रेसवर ही वेळ आली आहे. बरं EVM मुळे सत्ता आली म्हटलं तर भारतीय जनता पक्षाने EVM कडून स्वतःच्याच पक्षाला 145 वर जागा कां निवडून आणल्या नाहीत? मविआकडे महायुतीवर,बऱ्याच वेळा वैयक्तिक टीका करण्याशिवाय काही केले नाही. त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या विकासाचा काही रोड मॅप नव्हता. लाडकी बहीण योजनेवर टीका करून एक प्रकारे विरोधी पक्षांनी महायुतीचा प्रचार केला.   

            संवैविधानिक पद्धतीने निवडणूका पार पडून सत्तेत आलेल्या पक्षाला धांदलीने विजय मिळविला असे म्हणणे हे लोकमताचा अनादर आहे.मतपत्रिकेच्या आधारावर निवडणूक घेणे म्हणजे, बूथ capturing वगैरे निवडणूक जिंकण्याची साधने आता वापरता येत नसल्याने EVM हटाव आणि मतपत्रिका लाव हा नारा देऊन, काही तरी करून, देशात गोंधळ निर्माण करायचा, एवढेच काम आता विरोधी पक्षाकडे उरले आहे.लोकसभेत विरोधी पक्षाचे 200 च्यावर सदस्य निवडून गेले तेव्हा EVM चांगले होते कां? हा प्रश्न विरोधी पक्षाने विचारून पहावा.

            महाराष्ट्रात यापूर्वी न झालेली स्थिती पाहायला मिळते आहे,ती ही एवढे प्रचंड बहुमत आल्यावर देखिल. जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीची अशी अवस्था आहे. आचारसंहितेमुळे कामाचे दिवस वाया जातात,म्हणून देशात “एक देश एक निवडणूक” चा प्रसार करणारे आपले पंतप्रधान देखिल यात काही हस्तक्षेप करत नाही,याचं आश्चर्य वाटतंय. भारतीय जनता पक्षाला देखिल गट नेता निवडीसाठी एवढा वेळ लागतो,याचं आश्चर्य वाटतं. त्यांना त्यांचा नेता निवडीसाठी कुणाची वाट पहायची गरज कां वाटावी. कारण हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे.गृहखाते मागच्या वेळेस उपमुख्यमंत्र्यांकडे होते म्हणून ते उपमुख्यमंत्र्याकडेच असावे असा परिपाठ नाही. 2022 ला देखिल भारतीय जनता पक्षाला 105 जागा होत्याच,त्यामुळे त्यांनी ते स्वतःकडे ठेवले होते,तर त्यात नवल ते काय?  

समारोप:

            जनतेचा कमावलेला विश्वास गमवायचा नसल्यास महाराष्ट्रात लवकरात लवकर स्थापन होणे गरजेचे आहे. तसेच निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांना EVM बद्दलच्या तक्रारींवर चर्चा करण्यासाठी बोलविले होते. त्यात काय झाले ते कळेलच. EVM ला इंटरनेट जोडले जाऊ शकत नाही, कुठलाही मोबाइल, डेटा किंवा वायफाय सुरू नसला की तो जसा hack करता येत नाही,तसेच EVM च आहे,असे आजपर्यंत खूप वेळा समजाविण्यात आले आहे. तरी देखिल ओरड सुरू आहे,कारण पराभव स्वीकारण्याची भीती हे कारण आहे, त्या ऐवजी विरोधी पक्षांनी आत्मपरीक्षण केले तर त्याचा फायदा त्यांनाच होईल.       

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

प्रसाद नातु,


Comments

  1. after all this is bloody politics. They never care about common man forget the nation

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...