Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

प्रणव मुखर्जी पंतप्रधान झाले असते तर?

ब्लॉग नं. 2024/306 

दिनांक:- 16 डिसेंबर, 2024.

मित्रांनो,
            मराठीमध्ये एक म्हण आहे, “आत्याबाईला मिशा असत्या  तर काका म्हटलं असतं.” काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांना एक सवय आहे,म्हणण्यापेक्षा खोड आहे,जुन्या जुन्या गोष्टी उकरून काढून ते असं झालं असतं तर तसं झालं नसतं,अशी विधान करून ते चर्चेत राहतात.इतक्यात त्यांनी असेच एक विधान केले आहे,आजच्या ब्लॉगमध्ये त्यावर चर्चा करूया.

सविस्तर:                        

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी म्हटले आहे की, 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल, ज्यात भाजपने सत्ता मिळवली होती,कॉंग्रेसने UPA-2 सरकारच्या काळात, प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान बनवले असते आणि डॉ. मनमोहन सिंग यांना राष्ट्रपती बनवले असते,तर कदाचित चित्र वेगळे असते. त्यांच्या 'अ मॅव्हरिक इन पॉलिटिक्स' या नवीन पुस्तकावर चर्चा करताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत,जेव्हा कॉँग्रेस पक्षाला फक्त 44 जागा मिळाल्या होत्या,त्या निवडणुकीतील काँग्रेसच्या विनाशकारी कामगिरीवर आपले मत व्यक्त करताना,अय्यर यांनी 2013 मध्ये झालेल्या पराभवाचे खापर "नो गव्हर्नन्स" ला दिले आहे.त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 2012 मध्ये प्रमुख नेत्यांच्या आरोग्याच्या समस्यांमुळे हे झाले.त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 2012 मध्ये कॉंग्रेसवर दोन संकटे आली,एक म्हणजे सोनिया गांधी खूप आजारी पडल्या आणि दुसरी म्हणजे डॉ मनमोहन सिंग यांच्या सहा बायपास सर्जरी झाल्या.त्यामुळे सरकार आणि कॉँग्रेस पक्ष दुबळा झाला.पण तेव्हा देखिल एक व्यक्ती अशी होती,जी उर्जेने भरलेली होती, विचारांनी परिपूर्ण होती,तिच्याकडे करिष्मा होता आणि ती पक्ष किंवा सरकार किंवा दोन्हीही चालवू शकली असती आणि ती व्यक्ती म्हणजे प्रणव मुखर्जी होते,” असे अय्यर पुढे म्हणाले.

"जर डॉ. मनमोहन सिंग राष्ट्रपती झाले असते आणि प्रणव मुखर्जी पंतप्रधान झाले असते, तर मला अजूनही वाटते की आम्ही 2014 मध्ये हरलो असतो, परंतु इतक्या मोठ्या अपमानास्पद पराभवाने हरलो नसतो," असे अय्यर यांनी पीटीआयला सांगितले. डिसेंबर 1984 मध्ये 414 जागांवर असलेला पक्ष 2014 पर्यंत 44 जागांवर घसरला होता.त्याचे कारण म्हणजे 2013 मध्ये कोणताही कारभार होत नव्हता, प्रत्येकजण आजारातून बरा होत होता, आमच्यावर असे अनेक आरोप लावण्यात आले होते जे कधीही न्यायालयामध्ये स्थापित झाले नाहीत. 2G प्रकरणात, जिथे (डीएमके नेते) ए राजा आणि के कनिमोझी यांनी तिहार तुरुंगात एक वर्ष नजरकैदेत घालवले, पण काहीही बाहेर आले नाही, ”तो पुढे म्हणाला.

अय्यर पुढे म्हणाले की मुखर्जींचा व्यापक अनुभव आणि त्यांची उर्जा सरकारला अधिक प्रभावीपणे चालवू शकले असते आणि कमीतकमी 44 जागांवर पडणे टाळता आले असते. “प्रणव मुखर्जी यांनी शासन केले असते तर,त्यांचा कारभार आम्हाला वाचवण्यासाठी पुरेसा झाला नसता,पण निदान आम्ही 44 जागांपर्यंत खाली आलो नसतो; आम्ही 140 जागांपर्यन्त पोहोचलो असतो,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

पीटीआयच्या म्हणण्यानुसार, अय्यर यांनी त्यांच्या पुस्तकात UPA-II सरकारच्या पडझडीचे एक ज्वलंत चित्र रेखाटले आहे,त्यांची पत्नी सुनीत यांनी सतत भ्रष्टाचाराच्या आरोपांवर निराशा व्यक्त केली,तो वैयक्तिक क्षण देखिल कथन केला आहे.विरोधकांच्या आरोपांचा आम्ही प्रभावीपणे सामना करू शकलो नाही याबद्दल त्यांनी सरकारवर टीकाही केली,आणि त्याचे त्यांनी "शासनाचा लकवा" असे वर्णन केले. अण्णा हजारे यांच्या "इंडिया अगेन्स्ट करप्शन" आंदोलनाची हाताळणी,चुकीच्या पद्धतीने झाल्याचे ते म्हणतात आणि कॉमनवेल्थ गेम्समधील घोटाळ्याचा परिणाम देखिल UPA-II सरकारवर झाला. "2014 ची सार्वत्रिक निवडणुक तर आम्ही  अक्षरशः  उपविजेते आहोत या मानसिकतेतच लढविली," असे अय्यर यांनी नमूद केले.

अय्यर यांनी असा युक्तिवाद केला की,प्रणवदांच्या डाव्या विचारसरणीमुळे त्यांना पंतप्रधान बनवले असते तर व्यापारी समुदाय आणि अमेरिकन लोक नाराज झाले असते.परंतु त्यांच्यासारखा अनुभवी नेता कुणीही नव्हता.जुगरनॉटने प्रकाशित केलेल्या राजकारणातील मावेरीकमध्ये अय्यर यांचा राजकीय प्रवास, काँग्रेसमधील त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते UPA-I मध्ये मंत्री होण्यापर्यंतचा काळ आणि पक्षाच्या अधःपतनावर पडलेल्या त्यांच्या प्रतिबिंबांचा इतिहास आहे.

“कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यांसमोर सरकारचा चेहरा काळवंडण्यातही हातभार लावला," असे अय्यर पुढे म्हणतात. "कदाचित, यूपीए सरकारच्या निवडणुकीच्या संभाव्यतेला अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन,आणि 'इंडिया अगेन्स्ट' आंदोलन,चुकीच्या पद्धतीने हाताळले गेल्याने शिक्कामोर्तब झाले.”अण्णा हजारे यांच्या “भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला” सुरुवातीला रामलीला मैदानात उपोषण करण्यास परवानगी नाकारणारे गृहमंत्री पी.चिदंबरम हे शेवटी त्यातच गुरफटले गेले आणि रामलीला मैदान एका बहुचर्चित आंदोलनासाठी 'ग्राउंड झिरो' झाले.असे अय्यर म्हणतात.   

समारोप:

            जरा सखोल विचार केला तर,जरी मी “आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं.” असं  सुरुवातीला लिहिलं आहे,पण मणिशंकर अय्यर यांच्या म्हणण्यात मला काही प्रमाणात तथ्य वाटतं.कारण प्रणवदादांच्या कर्तृत्वाबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही.पण आता या गोष्टी बोलण्यात काही अर्थ नाही. जरी प्रणवदादा पंतप्रधान झाले असते तर चित्र निश्चितपणे काही वेगळच असते.        

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

  

प्रसाद नातु.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...