Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

महाराष्ट्रातील निवडणूक निकाल (Maharashtra Election Results)

ब्लॉग नं. 2024/284

दिनांक: 24 नोव्हेंबर, 2024  

मित्रांनो

            महाराष्ट्रातील महायुतीच्या महाविजयाने,गेल्या दोन अडीच वर्षात कानावर पडणारे खोका, मिंद्धे सरकार, गद्दार, बाप चोरला,चिन्ह चोरले इत्यादि इत्यादि, हे यापूर्वी कधीही न ऐकलेले शब्द यापुढे कानावर पडणार नाहीत अशी आशा आहे.महाराष्ट्रातील जनतेने,जी या पाच वर्षात झालेल्या घटनांमुळे जेरीस आली होती. या वेळेस महायुतीला ऐतिहासिक कौल देऊन त्या अस्थिरतेचा सोक्षमोक्ष लावला आहे.या विषयावर आहे आजचा हा दूसरा ब्लॉग.

सविस्तर:

            मी शेवटची बातमी वाचली तेव्हा महायुती 221 आणि भारतीय जनता पक्षाला 132, शिवसेना 57 आणि राष्ट्रवादी पक्षाला (अजित पवार) 50 जागा अशी स्थिती होती. भारतीय जनता पक्षाला आजवरच्या सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. अपक्षांना विशेष जागा मिळाल्या नाहीत. भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या जागांत विदर्भाचा वाटा मोठा आहे.महाविकास आघाडीतल्या एकाही विरोधी पक्ष नेता पद मिळेल, एवढ्या सुद्धा जागा मिळविता आल्या नाही. विरोधी पक्ष नेता पद मिळविण्यासाठी,विरोधी पक्षाला, विधानसभेतील एकूण जागा 288 आहेत,त्याच्या दहा टक्के एवढ्या जागा मिळवाव्या लागतात. म्हणजेच 29 जागा हव्यात, तेवढ्याही जागा कॉंग्रेस,शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी पक्ष (शरद पवार) गट यांना मिळविता आल्या नाहीत. इतकी नामुष्की या तीन पक्षांच्या वाटेला आली आहे.

            महाविकास आघाडीतील पक्षांनी नेहमी प्रमाणे एव्हीएमला शिव्या शाप देणे सुरू केले आहे. यापूर्वी 40 वेळा एव्हीएमला चॅलेंज केले गेले आणि प्रत्येक वेळी एव्हीएम यातून तावून सुलाखून बाहेर पडले आहे. तरी देखिल हा विषय पुनः पुनः कां चघळला जातो आहे? असा विचार मनात येतो. त्यामागचे कारण हे की दुसरे कुठले कारण त्यांना सापडत नाही.पण मग विरोधी पक्षांच्या पराभवाची कारणे नेमकी काय हे जाणून घेऊ या. अंतर्गत धुसफूस: महायुतीत सर्व आलबेल होते असे नाही,पण त्यांचे वाद चव्हाट्यावर आले नाहीत. मुख्यमंत्री कोण असावा,या वरुन कॉंग्रेस आणि शिवसेना उबाठा यांच्यातील वाद,नाना पटोले यांच्यातील वाद, कित्येक ठिकाणी जागा कुणी लढवायची यावर झालेला वाद असे अनेक प्रसंग सांगता येतील.

1.       अतिशय बेताल भाषणे: महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी आपला ताल आणि तोल सोडून केलेली भाषणे.याचा विपरीत परिणाम झाला.

2.       महायुतीचा अप्रत्यक्ष प्रचार: महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीचे कार्यक्रम हे आपले लक्ष ठरविले आणि वारंवार तेच केल्यामुळे महायुतीचा अप्रत्यक्ष प्रचार झाला.

3.       योग्य असा जाहीरनामा नव्हता :- महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपला जाहीरनामा आणल्या नंतर तो भाषणांमधून पुढे मांडण्याऐवजी महायुतीच्या जाहीरनाम्यावर भाषणे देऊन वेळ घालविला.

4.       महायुतीचा योजनाबद्ध प्रचार: महायुतीतील नेत्यांनी खूप सुसूत्र प्रचार केला. पंतप्रधान मोदी, अमित शहा,राजनाथ सिंह,नितीन गडकरी,जे. पी. नड्डा, योगी आदित्यनाथ आदि बिनीचे नेते प्रचारासाठी उतरविले होते.कॉंग्रेसकडे राहूल गांधी यांच्याशिवाय कुणी मोठा नेता,कॉंग्रेसकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आला नव्हता.     

5.       महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव: महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला.त्यांनी आघाडीतील आपल्या सहयोगी पक्षाच्या सभा घेतल्याचे अभावानेच आढळले.

6.       भूतकाळातील कामांचा अभाव: महाविकास आघाडीकडे भूतकाळात त्यांनी केलेले कुठलेही काम सांगण्यासारखे नव्हते. कोविड 19 हा काळ जनतेने अनुभवला होता आणि त्याच्या कडू आठवणी जनतेच्या चांगल्याच लक्षात होत्या.      

7.       मनोज जरांगे यांचे आंदोलन:    1977 ला सत्तेतील जनता पक्षातील लोकांनी इंदिरा गांधी यांना टार्गेट केलं, त्याचा विपरीत परिणाम होऊन इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. त्याप्रमाणे मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून त्यांच्या वर अतिशय विखारी प्रचार केला,याचा उलट परिणाम झाला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला सगळ्यात जास्त जागा मिळाल्या.

8.       एक है तो सेफ है ला उत्तर नव्हते:    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला नारा “एक है तो सेफ है” ला काऊंटर करणे महाविकास आघाडीतील नेत्यांना जमले नाही.

समारोप:

            विविध वाहिन्यांनी मुख्यमंत्री पदावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात कलह लावण्याचा भरपूर प्रयत्न करून पाहिला,पण महायुतीतील नेत्यांनी अतिशय संयम बाळगत हा विषय सहज टोलविला. महाराष्ट्रात पुढील पाच वर्षे स्थिरता राहील आणि एवढा मोठा mandate दिला आहे तर जनतेच्या हिताची कामे करतील अशी अपेक्षा आणि आशा आहे.  

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु,      


Comments

  1. मोजक्या शब्दात संपूर्ण विश्लेषण. मला जाणवलेले अजून एक कारण, हिंदुत्व. हिंदुत्व म्हणजे अन्य धर्मियांचा द्वेष नव्हे. महाआघाडीतील काही हिंदु नेते, गोल टोप्या घालून, मुस्लिमांच्या अयोग्य मागण्या मान्य करण्याच्या भाषा करतात, तेव्हा हिंदु नाराज होणे स्वाभाविक आहे.

    ReplyDelete
  2. One of the important reason is increase in voting percentage .
    RRJ

    ReplyDelete
  3. लाडक्या बहिणीने भावाला मस्त सपोर्ट केला.

    ReplyDelete
  4. अत्यंत योग्य विश्लेषण. मला वाटते महविकास आघाडी कधीही जिंकण्यासाठी लढत नव्हती. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास स्वतःला जाणते राजे, पुरोगमी, महाराष्ट्राचा तारणहार समजणारे शरद पवार यांचा प्रचारसभा मधून ह्याला पदा, त्याला पदा अशा विखारी प्रचार जनतेला रीचल्स नाही. याउलट देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी केलेली विकास कदम, पुढील पाच वर्षातील मशारश्ट्रचे व्हिजन लोकांसमोर ठेवले.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...