Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

ईव्हीएम विरुद्धची 41 वी याचिका फेटाळली

ब्लॉग नं.2024/286

दिनांक:- 27 नोव्हेंबर, 2024. 

मित्रांनो,

निवडणुकीत विजय मिळाला की,ईव्हीएम हा शब्द तोंडातून उच्चारायचा देखिल नाही आणि पराभव झाला की,ईव्हीएमचा उध्दार करत सुटायचं,हा आजकाल ट्रेंड किंवा फॅशन झाली आहे.अशा वेळेस काही राजकीय पक्ष स्वतः याचिका दाखल करत नाहीत, तर कुणाला तरी उभे करुन देतात आणि “तुम लढो हम कपडे संभालो” असं म्हणत मजा पहात असतात.अशीच एक केस याचिकाकर्ते के ए पॉल यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली.यांचा ईव्हीएमशी,एक मतदार म्हणून असलेल्या नात्याशिवाय दुरान्वयाने संबंध नाही.त्यांनी कां बरे ही याचिका दाखल केली असावी,आजचा ब्लॉग या संबंधी आहे.

सविस्तर:

देशातील निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान करण्याची पध्दत पुन्हा सुरु करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. "जेव्हा तुम्ही निवडणूक जिंकता तेव्हा ईव्हीएममध्ये (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन) छेडछाड केली जात नाही.तुम्ही निवडणूक हरता तेव्हा, ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाते," अशी टिप्पणी न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि पी बी वराळे यांच्या खंडपीठाने केली.

बॅलेट पेपर मतदानाव्यतिरिक्त, या याचिकेत मतदानादरम्यान मतदारांना पैसे, दारू किंवा इतर साहित्य प्रलोभन वाटप केल्याबद्दल दोषी आढळल्यास उमेदवारांना किमान पाच वर्षांसाठी अपात्र ठरवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्देशासह अनेक निर्देशांची मागणी केली होती. जेव्हा याचिकाकर्ते के ए पॉल यांनी सांगितले की मी जनहित याचिका दाखल केली आहे.तेव्हा खंडपीठाने म्हटले, "तुमच्याकडे मनोरंजक जनहित याचिका आहेत. तुम्हाला या उत्कृष्ट कल्पना कशा येतात?".

याचिकाकर्त्याने म्हटले आहे की ते एका संस्थेचे अध्यक्ष आहे, ज्या संस्थेने तीन लाख अनाथ आणि 40 लाख विधवांची जांचातून सुटका केली आहे.तेव्हा कोर्टाने विचारले की,  "तुम्ही या राजकीय क्षेत्रात का उतरत आहात? तुमचे कार्यक्षेत्र खूप वेगळे आहे," असे खंडपीठाने उत्तर दिले. तेव्हा पॉलने तो 150 हून अधिक देशांमध्ये गेल्याचे उघड केल्यानंतर, खंडपीठाने त्याला विचारले की त्या प्रत्येक राष्ट्रात बॅलेट पेपरने मतदान करण्याची पध्दत आहे की इलेक्ट्रॉनिक मतदान पध्दतीने मतदान केले जाते. त्यावर याचिकाकर्त्याने म्हटले की, परदेशी देशांनी बॅलेट पेपर मतदानाचा अवलंब केला आहे आणि भारताने त्याचे पालन केले पाहिजे.तेव्हा खंडपीठाने विचारले की, "तुम्हाला इतर जगापेक्षा वेगळे का व्हायचे नाही?”

या प्रश्नाचे उत्तर न देता,याचिकाकर्त्याने प्रतिक्रिया दिली की, "लोकसभा निवडणुकीचे वेळी भ्रष्टाचार झाला होता आणि या वर्षी (2024) जूनमध्ये निवडणूक आयोगाने जाहीर केले की त्यांनी 9,000 कोटी रुपये जप्त केले आहेत." तेव्हा कोर्टाने विचारणा केली, "पण तुम्ही इथे दावा करत असलेल्या बॅलेट पेपर पध्दतीने मतदान सुरु करण्याने यातून दिलासा कसा मिळेल?" यापुढे  खंडपीठाने विचारले, "तुम्ही पुन्हा प्रत्यक्ष मतपत्रिकेकडे वळलात तर भ्रष्टाचार होणार आहे का?".

तेव्हा पॉल यांनी दावा केला की टेस्लाचे सीईओ आणि सह-संस्थापक इलॉन मस्क यांनी सांगितले की ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाऊ शकते आणि टीडीपीचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू, आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी दावा केला होता की ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाऊ शकते.

तेव्हा कोर्ट म्हणाले की,  "जेव्हा चंद्राबाबू नायडू हरले, तेव्हा ते म्हणाले की ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाऊ शकते. आता यावेळी जगन मोहन रेड्डी हरले, ते म्हणाले की ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाऊ शकते," याचाच अर्थ हा की आता कोर्टाच्या लक्षात आले आहे की निवडणूक हरली की ईव्हीएमच्या विरुद्ध याचिका दाखल होतात.     

“निवडणुकांमध्ये पैसे वाटले जातात हे सर्वांना माहीत आहे”, असे याचिकाकर्त्याने सांगितल्यावर खंडपीठाने ‘आम्हाला कोणत्याही निवडणुकीसाठी कधीही पैसे मिळाले नाहीत’, अशी टिप्पणी केली. याचिकाकर्त्याने सांगितले की त्याच्या याचिकेतील आणखी एक प्रार्थना म्हणजे “निवडणूक प्रचारादरम्यान पैसे आणि दारूच्या वापराचे नियमन करण्यासाठी एक व्यापक फ्रेमवर्क तयार करणे आणि कायद्यानुसार अशा पद्धती प्रतिबंधित आणि दंडनीय असल्याची खात्री करणे.तसेच जनजागृती आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्याचे महत्त्व वाढविण्यासाठी व्यापक मतदार शिक्षण मोहिमेला अनिवार्य करण्याचे निर्देश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे”.

"आज 32 टक्के सुशिक्षित लोक मतदान करत नाहीत. ही किती मोठी शोकांतिका आहे. जर लोकशाही अशीच मरत असेल आणि आपण काहीच करू शकणार नाही, तर पुढच्या काही वर्षांत काय होईल," असेही याचिकाकर्त्याने म्हटले आहे. 

 समारोप:- 

ही बातमी वाचल्यावर मला हे कळलेच नाही की,याचिकाकर्त्याचे याचिका दाखल करण्यामागचे प्रयोजन काय होते.याचिकाकर्त्याला ईव्हीएम मतदान प्रणाली बद्दल आक्षेप होता,की एकंदर निवडणूक प्रणालीबद्दल. कारण त्याने ईव्हीएम पद्धत बदलून बॅलेट पेपर कडे परतण्याची मागणी केली, भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला, सुशिक्षित लोक मतदान करत नाहीत हा मुद्दा उपस्थित केला, पैसा आणि दारु वाटली जाते हे देखिल सांगितले. थोडक्यात हा कुणी तरी उभा केलेला याचिकाकर्ता होता असाच निष्कर्ष काढता येईल आणि अशा रीतीने ईव्हीएम विरुध्दची याचिका 41 व्यांदा फेटाळली गेली.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

प्रसाद नातु,


Comments

  1. These sort of similar cases should be dismissed at the base level itself

    ReplyDelete
  2. माननीय कोर्टाची अत्यंत योग्य कारवाई. वस्तुतः अशा याचिका दाखल करणाऱ्यांना योग्य तो दंड आकारला पाहिजे. विनाकारण कोर्टाचा बहुमूल्य वेळ खर्ची केल्याबद्दल

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...