Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप

 Blog No. 2024/ 057.   

Date:31st, March 2024.

मित्रांनो,

            भारताच्या अंतर्गत कारभाराबाबत टिपणी करणे,हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे? अशा थाटात अनेक गोष्टी नेहमीच अमेरिका असो, संयुक्त राष्ट्र संघ यांच्या कडून होत असतात. या मागे खोडसाळपणा तर असतोच,पण त्यामागे राजकीय हेतु  देखिल असतोच, हे लक्षात घ्यायला हवे.या विषयाला समर्पित आहे आजचा ब्लॉग. 

 सविस्तर

            दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी राष्ट्रीय निवडणुकांपूर्वी काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवल्याच्या पार्श्वभूमीवर 'भारतातील राजकीय अशांतता' या बाबीवर लक्ष वेधताना प्रवक्त्याने ही टिप्पणी केली.स्टीफन दुजारिक, महासचिवांचे प्रवक्ते, यांनी व्यक्तींच्या राजकीय आणि नागरी स्वातंत्र्यासह त्यांच्या अधिकारांचे रक्षण करणे आणि मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी अनुकूल वातावरण सुनिश्चित करणे आवश्यक आहे यावर त्यांनी जोर दिला.  

ते पुढे म्हणाले की जागतिक संस्था भारत आणि इतर राष्ट्रांमधील निवडणुकांदरम्यान लोकांच्या 'राजकीय आणि नागरी हक्कांचे' संरक्षण करण्याची आशा करते."आम्ही आशावादी आहोत की भारतात, कोणत्याही देशाप्रमाणेच ज्या देशात निवडणुका होत आहेत,त्यात राजकीय आणि नागरी हक्कांसह प्रत्येकाच्या अधिकारांचे संरक्षण केले जाईल आणि प्रत्येकजण मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात मतदान करण्यास सक्षम असेल," दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक आणि विरोधी काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवण्याबाबत अमेरिकेने देखिल अशीच टिपण्णी केली होती,हे येथे नमूद करावेसे वाटते.

            मला या गोष्टीचे आश्चर्य वाटते की मध्यंतरी आपला शेजारी देश पाकिस्तान असो,वा रशिया असो. तिथे निवडणूक काय संयुक्त राष्ट्र संघाच्या विचारानुरूप झाली होती कां? किंवा अमेरिकेतील मागील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक ती देखिल काय आदर्श निवडणूक होती कां? नाही.इतर देशात कुणा पक्षाची खाती गोठवली किंवा कुणा नेत्याला अटक झाल्यावर संयुक्त राष्ट्र संघ किंवा अमेरिका काही टिपण्णी करते कां? नाही.मग भारताच्या बाबतीत हे असे कां?

            माझ्या मतानुसार अन्य राष्ट्रातील विरोधी पक्ष हे देशांतर्गत गोष्टी या देशाबाहेर चव्हाट्यावर नेऊन मांडत नाही.भारतातील प्रमुख विरोधी पक्षाचे नेते हे नेहमीच भारतातील प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवत असतात,आणि त्यात त्यांना फार मोठेपणा वाटतो. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक आणि विरोधी काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवण्या ही सर्वस्वी भारताची अंतर्गत बाब आहे. त्यात ना संयुक्त राष्ट्र संघ किंवा अमेरिका यांना दखल द्यायचा काही अधिकार नाही. भारतात गेल्या 75 वर्षापासून लोकशाही नांदत आहे.इथे निवडणुका या खुल्या आणि मुक्त वातावरणात संपन्न होतात. निवडणूक आहे म्हणून कायदा आपले काम थांबवतो असे होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिकेस भारतात काही ही शांततापूर्ण रित्या होत आहे हे आवडत नसावे.आणि हे आजचे अमेरिकेचे धोरण नाही. 

समारोप

भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने,उत्तरादाखल असे म्हटले आहे की स्वतंत्र आणि मजबूत लोकशाही संस्थांबाबत देशाची बांधिलकी आहे आणि निवडणूक आणि कायदेशीर व्यवस्थेमध्ये कोणताही बाह्य हस्तक्षेप सहन केला जाणार नसल्याचे सांगितले. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने भारतातील काही कायदेशीर कार्यवाहींबाबत केलेल्या टिप्पण्यांवर भारत सरकारने तीव्र आक्षेप घेतला आहे आणि आपल्या न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य आणि अखंडतेचे प्रतिपादन केले.

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु, पुणे.

Comments

  1. खरे आहे
    दादागिरी खपवुन घ्यायची गरज नाही

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...