Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

पंकज उधास राह्यले नाहीत

 Blog No.2024/03. 

Date: -26th, February,2024. 

मित्रांनो,

            “चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल,एक तुही धनवान है गोरी बाकी सब कंगाल” म्हणणारे पंकज उधास आज आपल्यात नाहीत. गझल गायकीसाठी लागणारा आवाज त्यांच्याकडे होता. त्या जोरावर त्यांनी गझलला जरा वेगळ्या पद्धतीने पेश केलं.ते लोकांना आवडलं.आणि पहाता पहाता हा गायक प्रसिद्धीस पावला.आजच्या  ह्या ब्लॉगने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू या. 

सविस्तर

          मला ते दिवस आठवतात. मी नुकताच बँकेत जॉइन झालो होतो.आणि मी ज्या एका खोलीत (बॅचलर कॉटेज) रहात होतो,त्या घर मालकांच्या घरातून बाहेर जायला रस्ता होता.पंकज उधास यांची कॅसेट नुकतीच आली होती आणि त्यातील काही गाणी सुपर हीट झाली होती.मी सकाळी चहा पिण्यासाठी जात असे तेव्हा आमचे घर मालक त्यांच्या दुकानात बसलेले असायचे आणि सकाळी सकाळी “चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल” हे गाणं ऐकत बसलेले ऐकायचे.त्यांचे वय बरेच होते.आधी पंकज उधास यांच्या या कॅसेट मधील गाणी न ऐकलेल्या मला,त्यांना ती गाणी लावून ऐकतांना पाहून गंमत वाटायची.पण रोज रोज ऐकल्यावर ती गाणी सहज ओठांवर रुळावली. सुरेख चाल, सुंदर शब्द, वाद्यांची सुरेल साथ आणि पंकज उधास यांचा मदभरा आवाज. गाणी घर करून राहयली.                                      

चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल, झिलमे चाँद नजर आये, थोडी थोडी पिया करो, एक तरफ उसका घर ही त्यांची सुरुवातीची गाणी. त्या नंतर त्यांचा आवाज ऐकून चित्रपटात त्यांना गाणी मिळाली. आज फिर तुमपे प्यार आया है, ना कजरे की धार ,जिये तो जिये कैसे बिन आपके ही गाणी खूप हीट झाली. सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांनी “नाम” चित्रपटासाठी गाणे गाण्यास आमंत्रित केले.1986 मध्ये आलेल्या 'नाम' चित्रपटात पंकज उधास यांनी "चिठ्ठी आयी है, आयी है, चिठ्ठी आयी है, हे गाणे जबरदस्त हिट झाले. त्यानंतरही अनेक हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. 2006 मध्ये, पंकज उधास यांना पद्मश्री हा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.पंकज उधास यांचे दोन्ही भाऊ निर्मल उधास आणि मनहर उधास हे देखील गायक आहेत. 

मृत्यू

काल 26 फेब्रुवारी ला सकाळी 11 च्या सुमारास त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 72 वर्षाचे होते.  त्यांच्या मुलीने मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये कर्करोगामुळे त्यांच्या मृत्यूची दुःखद बातमी इंस्टाग्रामद्वारे शेअर केली. 

समारोप

          एक आणखी मोठा गायक काळाच्या पडद्याआड निघून गेला. त्यांच्या गझलच्या रूपाने ते आपल्यात असतीलही.पण माणसाचे असणं ही एक मोठी गोष्ट असते मग ते कार्यरत नसतील तरी ते आपल्यात आहेत,ही भावना नेहमीच सुखद असते.ही रुखरुख लावून पंकज उधास गेले. त्यांना माझ्या तर्फे आणि माझ्या ब्लॉगच्या असंख्य वाचक मित्रांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. 

 

प्रसाद नातु, पुणे

 

Comments

  1. Informative blog and apt tribute to the Ghazal Maestro

    ReplyDelete
  2. One more song was very popular that time viz. Sabko malum hai main sharabi nahi... Bhavpurna Shradhanjali to Pankaj Udhas.

    ReplyDelete

Post a Comment