Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

पंकज उधास राह्यले नाहीत

 Blog No.2024/03. 

Date: -26th, February,2024. 

मित्रांनो,

            “चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल,एक तुही धनवान है गोरी बाकी सब कंगाल” म्हणणारे पंकज उधास आज आपल्यात नाहीत. गझल गायकीसाठी लागणारा आवाज त्यांच्याकडे होता. त्या जोरावर त्यांनी गझलला जरा वेगळ्या पद्धतीने पेश केलं.ते लोकांना आवडलं.आणि पहाता पहाता हा गायक प्रसिद्धीस पावला.आजच्या  ह्या ब्लॉगने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू या. 

सविस्तर

          मला ते दिवस आठवतात. मी नुकताच बँकेत जॉइन झालो होतो.आणि मी ज्या एका खोलीत (बॅचलर कॉटेज) रहात होतो,त्या घर मालकांच्या घरातून बाहेर जायला रस्ता होता.पंकज उधास यांची कॅसेट नुकतीच आली होती आणि त्यातील काही गाणी सुपर हीट झाली होती.मी सकाळी चहा पिण्यासाठी जात असे तेव्हा आमचे घर मालक त्यांच्या दुकानात बसलेले असायचे आणि सकाळी सकाळी “चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल” हे गाणं ऐकत बसलेले ऐकायचे.त्यांचे वय बरेच होते.आधी पंकज उधास यांच्या या कॅसेट मधील गाणी न ऐकलेल्या मला,त्यांना ती गाणी लावून ऐकतांना पाहून गंमत वाटायची.पण रोज रोज ऐकल्यावर ती गाणी सहज ओठांवर रुळावली. सुरेख चाल, सुंदर शब्द, वाद्यांची सुरेल साथ आणि पंकज उधास यांचा मदभरा आवाज. गाणी घर करून राहयली.                                      

चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल, झिलमे चाँद नजर आये, थोडी थोडी पिया करो, एक तरफ उसका घर ही त्यांची सुरुवातीची गाणी. त्या नंतर त्यांचा आवाज ऐकून चित्रपटात त्यांना गाणी मिळाली. आज फिर तुमपे प्यार आया है, ना कजरे की धार ,जिये तो जिये कैसे बिन आपके ही गाणी खूप हीट झाली. सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांनी “नाम” चित्रपटासाठी गाणे गाण्यास आमंत्रित केले.1986 मध्ये आलेल्या 'नाम' चित्रपटात पंकज उधास यांनी "चिठ्ठी आयी है, आयी है, चिठ्ठी आयी है, हे गाणे जबरदस्त हिट झाले. त्यानंतरही अनेक हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. 2006 मध्ये, पंकज उधास यांना पद्मश्री हा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.पंकज उधास यांचे दोन्ही भाऊ निर्मल उधास आणि मनहर उधास हे देखील गायक आहेत. 

मृत्यू

काल 26 फेब्रुवारी ला सकाळी 11 च्या सुमारास त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 72 वर्षाचे होते.  त्यांच्या मुलीने मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये कर्करोगामुळे त्यांच्या मृत्यूची दुःखद बातमी इंस्टाग्रामद्वारे शेअर केली. 

समारोप

          एक आणखी मोठा गायक काळाच्या पडद्याआड निघून गेला. त्यांच्या गझलच्या रूपाने ते आपल्यात असतीलही.पण माणसाचे असणं ही एक मोठी गोष्ट असते मग ते कार्यरत नसतील तरी ते आपल्यात आहेत,ही भावना नेहमीच सुखद असते.ही रुखरुख लावून पंकज उधास गेले. त्यांना माझ्या तर्फे आणि माझ्या ब्लॉगच्या असंख्य वाचक मित्रांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. 

 

प्रसाद नातु, पुणे

 

Comments

  1. Informative blog and apt tribute to the Ghazal Maestro

    ReplyDelete
  2. One more song was very popular that time viz. Sabko malum hai main sharabi nahi... Bhavpurna Shradhanjali to Pankaj Udhas.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...