Skip to main content

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

गीता जयंती आणि गीतेचे सार

 Blog No.2023/317.  

Date: -26th, December 2023. 

मित्रांनो,  

नुकतीच 3 दिवसांपूर्वी आपण  गीता जयंती साजरी केली.प्रथम ज्या भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली त्या भगवान श्रीकृष्णाला विनम्र अभिवादन करतो.त्याचा निस्सीमभक्त धनुर्धारी अर्जुनाला देखिल मी प्रणाम करतो.कारण त्याच्या सारख्या एका समृद्ध श्रोत्याने त्याच तोडीचे प्रश्न श्रीकृष्णाला विचारले.याच दिवशी म्हणजेच "मोक्षदा एकादशी"च्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली होती.गीतेत एकूण 700 श्लोक आहेत. त्यापैकी 574 श्रीकृष्णाचे, 85 अर्जुनाचे,1 धृतराष्ट्राचा आणि 40 संजयचे आहेत. गीतेत  एकदाही हिंदू हा शब्द वापरलेला नाही.गीता सर्वसमावेशक, सर्वव्यापी आणि सार्वजनिकही आहे. 

प्रास्ताविक

आपली संस्कृती किती महान आहे,जिथे फक्त मानवाचीच नाही तर ग्रंथांचीही जयंती साजरी केली जाते. इथे आपण गीतेच्या पानांची, मुखपृष्ठाची की बाईंडिंगची पूजा करतो का? नाही,आपण गीतेचे स्मरण करतो आणि त्यात दिलेल्या विचारांमुळे तिची पूजा करतो.त्या विचारांची पूजा म्हणजे गीतेची पूजा.मग गीता जयंती का साजरी केली जाते? गीता वाचून आपण नेहमी काहीतरी शिकतो.गीता जयंती आपल्याला मागील वर्षाच्या तुलनेत आपण अधिक शिकलो आहोत की नाही आणि आपण अधिक आत्मसात केले आहे का हे पाहण्याची संधी देते. विचार हे केवळ शास्त्राचे सौंदर्य वाढवण्यासाठीच असतात असे नाही, तर ते विचार आपण किती शिकू शकतो आणि किती आत्मसात करू शकतो हे लक्षात येते. हे महत्वाचे आहे .

आजचा ब्लॉग गीतेचे सार सांगण्यासाठी मी लिहीत आहे.अर्थातच मी किंवा कोणीही एका ब्लॉग मध्ये गीतेचे सार सांगण्यास सक्षम आहे का? हा प्रश्नच आहे.परंतु मी येथे गीतेमध्ये दिलेल्या महत्त्वाच्या कल्पनांचा थोडक्यात परामर्श घेणार आहे.गीतेत अध्यात्म आहे,व्यवस्थापन देखिल आहे आणि तत्त्वज्ञान सुद्धा.होय, आणि  मानसशास्त्र देखील.कोणी गीतेचा उपयोग आध्यात्मिक आनंद मिळवण्यासाठी,कोणी व्यवस्थापनाच्या कल्पना जाणून घेण्यासाठी, कोणी यश मिळविण्यासाठी,कोणी आपले जीवन चांगले करण्यासाठी करत असतो असे म्हणता येईल गीता सर्वांचे समाधान करते, प्रश्नांचे निराकरण करते.

गीतेत माझ्या मते जे 11 विचार मांडले आहेत, ते एकएक करून आपण बघूया.

1.       शरीर नश्वर किंवा नाशवंत आहे:- पण आत्मा अविनाशी आहे.गीतेत प्रामुख्याने हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपण धारण केलेले हे शरीर नश्वर आहे पण आत्मा अविनाशी आहे, अमर आहे.    

2.       या जगात काहीही चांगले किंवा वाईट कारणाशिवाय घडत नाही:- भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे की जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे कारण आहे.येथे विनाकारण कुठलीही गोष्ट घडत नसते.      

3.       जीवनाचे एकमेव सत्य म्हणजे मृत्यू:- मृत्यूच्या भीतीमुळे आपण आपला वर्तमान आनंद गमावून बसतो.

4.       आपण रागावू नये किंवा क्रोधित होऊ नये:- कारण क्रोधाने गोंधळ निर्माण होतो, गोंधळामुळे बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाला तर तर्काचा नाश होतो.

5.       तुम्ही कोणत्याही परिस्थितीत काम केल्याशिवाय राहू शकत नाही.आपण झोपलो तरी आपले विचार थांबत नाहीत,झोपेतही आपण विचार करत राहतो.आयुष्यभर आपण काही निरुपयोगी काम सुद्धा करत राहतो.

6.       स्वार्थी होऊ नका:-कारण स्वार्थीपणा आपल्याला इतरांपासून वेगळे करतो.जर आपण इतरांपासून अलिप्त झालो,तर दुःखाच्या परिस्थितीत एकटे पडू शकतो.कोणीही आपल्यासोबत आनंद वाटून घेण्यास येत नाही.जेव्हा आनंद इतरांसोबत शेअर केला जातो तेव्हा त्याचा अधिक आनंद होतो.

7.       एखाद्या कर्मापासून कधीही पळून जाऊ नये:-कारण कृतीपासून दूर पळणे हे माणसाचे खरे लक्षण नाही. कारण माणूस चांगला की वाईट हे त्याच्या कृतीवर अवलंबून असते.

8.       कोणतेही काम चांगले किंवा वाईट नसते:- ते काम करणाऱ्या व्यक्तीवर आणि त्याने ते काम कोणत्या विचारांनी केले यावर अवलंबून असते.कौरव आणि पांडव एकच युद्ध लढत होते.पण कौरव हे असत्यासाठी आणि पांडव सत्यासाठी लढणारे होते.

9.       निष्काम कर्मयोग:- "कर्मण्ये वाधिका रस्ते मा फलेषु कदाचन" असे सांगते की माणसाने आपले कार्य करत राहिले पाहिजे आणि परिणामांची इच्छा करू नये.याचा अर्थ असा की, जर एखादी व्यक्ती परिणामांचा विचार करत राहिली, तर त्याचे लक्ष कामावरून विचलित होईल आणि तो काम नीट करू शकणार नाही. म्हणूनच आपण आपल्या कामाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. काम नीट केले तर त्याचा परिणाम नक्कीच होतो.

10.  माणसाने वासना, क्रोध, लोभ, कामना यांवर नियंत्रण ठेवावे:- माणसाने वासना, क्रोध, लोभ, कामना यांच्या अधीन जाऊ नये. कारण यांच्या आधीन गेलेला माणूस सदसदविवेक बुद्धीचा वापर करू शकत नाही.               

11.  माणसाने स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे:- माणसाचा स्वतःवर विश्वास असेल तर तो कोणतेही काम यशस्वीपणे करू शकतो.त्यामुळे आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे.जगात असे कोणतेही काम नाही जे अशक्य आहे.

12.  आपण परस्परविषयी प्रेम,आदर,आपुलकी बाळगली पाहिजे:- कारण अर्जुनाच्या मनात हेच सारे काही होते म्हणून तो युद्ध करायला तयार नव्हता. तो घाबरला होता कां नाही. तर त्याचे गुरुजन,वरिष्ट सदस्यगण, बंधु,मामा आणि इतर परिजनांच्या होणाऱ्या वियोगाने तो कासावीस झाला होता.तसेच या सगळ्यांना मारून मी कुणावर राज्य करू, या कल्पनेने तो हतबल झाला होता.               

समारोप

            मी ब्लॉगच्या सुरुवातीला लिहिले आहे की गीतेवर बरेच काही लिहिता येईल.ती तुम्ही जितक्या वेळा वाचाल तेव्हा तुम्हाला तिच्यात काही नवे आढळेल.कारण आपले मन कधी कधी एखादे पुस्तक वाचतांना बऱ्याच वेळा त्या पुस्तकाला पूर्वग्रह ठेवून वाचत असतो.आणि मग आपल्याला त्या पुस्तकात त्याच गोष्टी आधी आढळतात.पण गीतेसारखा ग्रंथ वाचतांना मनात अगदी कुठल्याही कल्पना ठेवून वाचायला नको.असं मला वाटतं आणि म्हणूनच मी आता पुन्हा एकदा गीता वाचायला घेतो आहे.मग त्यावर एक ब्लॉग मी लिहिनच.

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

  

प्रसाद नातु, पुणे.

फोटो सौजन्य@ पांचजन्य   

Comments

  1. Superb thoughts nicely penned down

    ReplyDelete
  2. 🙏जय श्री कृष्ण 🌺🌺

    ReplyDelete
  3. गीतेचे तत्वज्ञान थोडक्यात पण छान समजावून सांगितले आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...