Skip to main content

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

आहार विचार भाग 12 कांदा Onion

 Blog No.2023/222            

Date:- 24th, August 2023.

 

मित्रांनो,

            काल मी चांद्रयान-3 वर ब्लॉग लिहिला होता आणि 6.15 च्या सुमारास चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने चंद्रावर लॅंडींग केले.भारतीयांसाठी कालचा दिवस खूप मोठा दिवस होता.कारण 2019 ला आपण चंद्रावर पोहोचू शकलो नव्हतो.त्यावेळेस भरपूर टीका सरकारवर होत होती.पण कालचे श्रेय मात्र सरकारचं नव्हतं.असो.यालाच राजकारण म्हणतात.मी माझ्यावतीने त्या सगळ्या शास्त्रज्ञांचे,माझ्या ब्लॉगच्या समस्त वाचकांचे आणि या देशातील जनतेचे अभिनंदन करतो.

            पावसाळा सुरू आहे.जरी मध्यंतरी त्याने दडी मारली असली,तरी तो पुन्हा येईलच कारण त्याची कुणाशीही युती नाही आणि पावसाळ्यात खाल्ला जाणारा आवडीचा पदार्थ म्हणजे “कांदा भजी” आणि त्यातही खेकडा भजी.सिंहगडावर पहिल्यांदा काही वर्षापूर्वी मी आस्वाद घेतला होता. जेव्हा मी पुणेवासी नव्हतो.त्यानंतर कोल्हापूरकडून पुण्याला येतांना खंबाटकी बोगद्याच्या अलीकडे काही अंतरावर “आराम हॉटेल”ला खूप स्वादिष्ट “खेकडा भजी” खायला मिळाली. एव्हाना तुम्हाला लक्षात आलं असेल की मी आज आहार विचार मध्ये कांदा या भाजीवर सविस्तर लिहिणार आहे.

 कांदा मूळचा कुठला?

            कांदा मूळचा इराणमधला. सुमारे 3000 हून जास्त वर्षापूर्वी कांदा तिथे वापरला जायचा असं समजतं. भारतात देखिल गरुड पुराणात कांद्याचा उल्लेख आहे. आज मात्र जगभरात सर्वत्र पिकविला जातो आणि चीन,स्पेन आदि देशात तर कांद्याशिवाय स्वयंपाक पूर्ण होत नाही असं म्हणतात. अर्थात ते भारताला देखिल मोठ्या प्रमाणात लागू पडतं.

            कांदा हा बरेच दिवस टिकतो आणि तो वाळवल्यास अधिक टिकतो.आपल्याकडील नासिक जिल्ह्यातील दोन तालुके निफाड आणि लासलगांव, कांदा  उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.महाराष्ट्रातील एकूण कांदा उत्पादनाच्या 65% उत्पादन या दोन तालुक्यात घेतले जाते. देशातील एकूण कांदा उत्पादनाच्या 40% उत्पादन महाराष्ट्रात घेतले जाते.म्हणजेच देशातील एकूण कांदा उत्पादनाच्या 26% एवढे उत्पादन हे निफाड आणि लासलगाव मध्ये घेतले जाते.

 कांद्यात जीवनसत्वे, खनिजांचे प्रमाण

 100 ग्राम कांद्यात जवळपास 11 मिलिग्राम एवढे विटामीन सी असते. कॅल्शियम 47 मिलिग्राम असते आणि फास्फरस 40 मिलिग्राम असते.

 कांद्याचा औषधी उपयोग                   

1.    दातांच्या तक्रारीवर प्रभावी:- कांदा रोज कच्चा खावा.खातांना थोडा वेळ तोंडात ठेवल्यास दातांच्या तक्रारी उद्भवत नाहीत,असे संशोधनात आढळून आले.

2.       हृदयरोगापासून दूर ठेवतो:- त्रिवेंद्रम मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. राधाकृष्णन आणि डॉ. के. माधवन यांनी केलेल्या संशोधनानुसार हृदयरोग आणि रक्तदाब यापासून सुटका हवी असल्यास रोज 100 ग्राम कांदा खायला हवा. कांदा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल संतुलित रहाते आणि रक्तात गुठल्या होतं नाहीत असे निष्पन्न त्याच्या संशोधनात आढळून आले आहे.

3.       त्वचारोग:- विविध त्वचा रोगांत कांदा हा परिणामकारक सिद्ध झाला आहे. जसे जखमा, खरचटणे किंवा अंगाची आग आग होणे इत्यादि.

4.       किडनीसंबंधीच्या तक्रारी:- किडनीसंबंधीच्या तक्रारी असल्यास त्या देखिल कांद्याचे सेवन केल्याने दूर होऊ शकतात असे दिसून आले आहे.

5.       याशिवाय श्वसनाच्या तक्रारी,कानाच्या तक्रारी, सर्दी,खोकला आणि फ्लू अशा रोगांवर सुद्धा कांदा गुणकारी असल्याचे सांगितले जाते.

 सारांश        

कांद्याचे औषधी गुणधर्म किंवा उपयोग याविषयी अॅलोपॅथीचे डॉक्टर सहमत असतील असे नाही. त्यामुळे कांद्याचे जे उपयोग हे तुमची नेहमीची औषधे तुम्ही घेत आहात,त्यासोबत करून बघावेत.कारण हे उपयोग केल्याने झाला तर फायदा होईल,नुकसान होणार नाही.बाकी कांदा भजी, कांद्याच्या पातीचा झुणका,कांदा बटाटा रस्सा भाजी,कांद्याची दहयातली कोशिंबीर,कांदेभात,कांद्याची थालीपीठ, कांदा परतून चिवड्यात टाकल्यास चिवड्याला एक वेगळीच चव येते, या गोष्टींचा आनंद घेण्यास काही हरकत नाही. अगदी मधुमेही देखिल माफक प्रमाणात या सर्व पदार्थांचा आनंद लुटू शकतात.    

                                            खेकडा भजी बनविण्याची रेसिपी सौजन्य :- मधूराज रेसिपी 

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 प्रसाद नातु,पुणे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...