Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

"अभिमान" ची पन्नास वर्ष

 Blog No.2023/196       

Date:- 28th,July, 2023. 

मित्रांनो,

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा एक सर्वांगसुंदर चित्रपट अभिमान.” आज हा चित्रपट रिलीज होऊन 50 वर्षे झाली. 27 जुलै,1973 या तारखेला हा चित्रपट रिलीज झाला.त्याला व्यावसायिक यश सर्वसाधारण मिळालं, जे अपेक्षित होतं.कारण गल्लाभरु क्राऊड किंवा तेव्हाच्या थर्ड क्लास मध्ये बसणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट नव्हताच. एक साधी,सोपी,सरळ कहाणी होती. ना मारामारी, ना हिंसक दृश्ये, ना उत्तान नृत्ये हे काहीच नव्हतं.माझ्या काही टॉप चित्रपटाच्या यादीतील वरच्या नंबरचा हा चित्रपट.त्यामुळे आजचा ब्लॉग या चित्रपटाला समर्पित.  

प्रास्ताविक             

मी या चित्रपटास सर्वांगसुंदर चित्रपट यासाठी म्हटलं की अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा सुरेख अभिनय,त्यांना असरानी,बिंदु,डेव्हिड, दुर्गा खोटे, ए के हंगल आणि ललिता कुमारी यांनी दिलेली सुंदर साथ. हृषिकेश मुखर्जी यांची सुरेख कथा त्यातील राजेंद्रसिंह बेदी यांचे लाजवाब संवाद,हृषीकेश मुखर्जी यांचे अप्रतिम दिग्दर्शन,नेत्रदिपक छायाचित्रण जयवंत पाठारे यांच, मजरूह सुलतानपुरी यांची सुरेल गाणी, सचिन देव बर्मन यांच सुश्राव्य संगीत दिग्दर्शन आणि ती तितक्याच प्रभावीपणे सादर केली ती गायकांची मांदियाळी अर्थात किशोर कुमार, लता मंगेशकर, मोहम्मद रफी, मनहर उधास, सचिन देव बर्मन, अनुराधा पौडवाल.आता सांगा बरं चित्रपट निर्मितीतील कुठलं अंग सुटलं. हा चित्रपट सितार वादक रविशंकर आणि अन्नपूर्णा देवी यांच्यातील अडचणीत आलेल्या विवाहावर आधारित आहे असं म्हटल जातं.पण लेखक राजू भारतन यांच्या मते, हृषीदांनी सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार आणि त्यांची पहिली पत्नी रुमा घोष यांच्या जीवनावर चित्रपटाची कथा लिहिली आहे. कुठतरी या चिटपटास हिंदी भाषेतील संगीत नाटक चित्रपट आहे असं म्हटले असल्याचं वाचलं.चित्रपटाची कथा थोडक्यात पाहू.

चित्रपटाची कथा      

सुबीर कुमार (अमिताभ बच्चन) हा एक व्यावसायिक गायक आहे जो प्रसिद्धीच्या मार्गावर आहे.उमा (जया भादुरी) ला भेटेपर्यंत त्याला तिच्याशी लग्न होईल याची कल्पना नसते. उमा गावात दुर्गा मौसी (दुर्गा खोटे) सोबत राहत असते. तिच्याशी लग्न करून सुबीर कुमार तिला मुंबईला घेऊन येतो. तिची गायनाची कारकीर्द सुरू करण्यासाठी तो स्वतः प्रयत्न करतो. दरम्यान सुबीर कुमारला मिळणारी प्रसिद्धी कमी होते आणि उमाला खूप प्रसिद्धी मिळू लागते आणि तिच्या पतीपेक्षाही ती अधिक प्रसिद्ध गायिका बनते. यामुळे सुबीर उमाचा तिरस्कार करू लागतो आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होतो.पुढे भावनिक वळणात, उमा गर्भवती असते आणि नवीन जीवांच्या आगमनाची चाहूल त्यांना जवळ आणते कां? “तेरे मेरे मिलन की ये रैना ह्या गाण्यामुळे   शेवटी दोघांचे भावनिक पुनर्मिलन होते कां? हे खरोखर पहाण्यासारखे होते.

 चित्रपटातील गाणी

1. "अब तो है तुमसे हर खुशी अपनी" (लता मंगेशकर)

2. "तेरी बिंदिया रे" लता मंगेशकर, मोहम्मद रफी

3. "तेरे मेरे मिलन की ये रैना" किशोर कुमार, लता मंगेशकर

4. "नदियाँ किनारा" लता मंगेशकर

5. लता मंगेशकर यांचे "पिया बिना पिया बिना"

6. किशोर कुमारचे "रे मित ना मिला रे मनका".

7. "लुटे कोई मन का नगर" लता मंगेशकर, मनोहर उधास

नामांकन आणि पुरस्कार

1974 सचिन देव बर्मन फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट संगीत संयोजक पुरस्कार जिंकला.

जया बच्चन यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

असरानी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता.

सारांश

            हा चित्रपट मी पहिल्यांदा पाह्यला तेव्हा मी केवळ नववीत होतो.अमिताभ सोबत त्यावेळेस सचिन देव बर्मन यांची गाणी, त्यातील माझा फेवरीट गायक किशोर कुमारची गाणी यासाठी चित्रपट पाहिला होता.त्यानंतर टीव्हीवर हा चित्रपट जेव्हा जेव्हा दाखवला गेला.तेव्हा तेव्हा मी पाहिला.आज या ब्लॉगमधे कुठल्या गाण्याचा अंतर्भाव करावा हे माझं निश्चित होत नव्हतं. मग “पिया बिना बसेरा” ही लता मंगेशकर यांच गाणं आणि "मित ना मिला रे मनका " हे किशोर कुमार यांनी गायलेले गाणं निवडलं ते ऐका.  


आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

प्रसाद नातु,पुणे

Comments

  1. Top class picture wigh yop class songs. Apla blog pan top class

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...