Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

गुरु शिष्य एक आगळे नाते



 Blog No. 2023/85      

Date: 6th,April 2023


 

मित्रांनो,

            मी नुकतीच श्री ज्ञानेश्वरी वाचायला घेतली.सध्या तरी चाळलीच आहे,म्हणावे लागेल.श्री ज्ञानेश्वरी ही भगवत गीतेवरील टीका आहे.अर्थात सोप्या शब्दांत म्हणायचे झाल्यास,श्री ज्ञानेश्वरी गीतेवर आधारित ग्रंथ आहे.भगवत गीता हा गुरु आणि शिष्यामधील संवाद आहे.भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली असे आपण नेहमी म्हणतो.पण श्री ज्ञानेश्वरी चाळतांना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली.ती म्हणजे इथे गुरु म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत.पण त्यांचा शिष्य अर्जुनाने,जे प्रश्न श्रीकृष्णाला विचारले आहेत.त्याच्या उत्तरात अखिल ब्रम्हाण्डचे सार भगवान श्रीकृष्णाने कथन केले आहे.म्हणजेच ते प्रश्न विचारणारा शिष्योत्तम अर्जुन हा सुद्धा विद्वान होता. हे जाणवते. 

 गुरु शिष्य नाते

            गुरु हा कितीही अष्टावधानी असला तरी शिष्य देखिल तेवढाच ताकदीचा असणे गरजेचे असते.असे गुरु शिष्य एकमेकांस भेटले की किंवा तरच भगवत गीते सारख्या ग्रंथाची निर्मिती होते.हेच खरे.सुधीर मोघे यांनी एका गीतात म्हटले आहे की “घनतमात जणू दीप चेतवी, तनमनात चैतन्य जागवी,कणकणात जणू प्राण डोलवी,जे अरुप  त्या देई रूप, करी मूर्त तो अमूर्ता.” समजावयास अतिशय सोपे असले तरी आशयघन असे हे गीत आहे.आपले मूल ज्यावेळेस शाळेत जाते,त्यावेळेस त्याला काही ज्ञान नसते.म्हणजे ते शाडू मातीसारखे अरूप असते.त्या अरुपाला नुसते रूप नाही तर स्वरूप देण्याचे काम गुरु करीत असतो.ज्ञानाने अमूर्त अशा त्या मुलास ज्ञानाने मूर्त करण्याचे काम गुरु करीत असतो. अखिल विश्वात गुरु शिष्य हे नाते हे अनोखे असते. लहानपणी मुलाला बाजारात घेऊन गेलो असतांना,अचानक टीचरचे भेटणे,त्या वेळी त्या चिमूकल्याचा आनंद जेव्हा पाहण्यासारखा असतो. तेवढेच निर्मळ हे मोठेपणी गुरु भेटल्यावर होणारे सुख असते.अगदी खूप मोठ्या पदावर पोहोचल्यावर देखिल गुरु दिसताच आपण नतमस्तक होतो.       

 शिष्य कसा असावा

            समर्थ रामदास स्वामी म्हणतात केवळ गुरु अष्टावधानी असून होत नाही,तर शिष्य हा हुशार असला,तल्लख बुद्धीचा असला गुरूला एक वेगळा आनंद मिळतो. गुरुकडे असणारा ज्ञानाचा साठा त्याला शिष्यास द्यावयाचा असतो. कारण गुरूचा जीवनाचा उद्देशच तो असतो. समर्थ रामदास म्हणतात त्याप्रमाणे “जे जे  आपणासी ठावे ते इतरांसी सांगावे,शहाणे करून सोडावे सकल जन” गुरु आपले कार्य करीत असतो.शिष्य देखिल प्रज्ञावंत असावा,तो ज्ञान अर्जन करण्यास उत्सुक असावा,तो चौकस असावा. त्याने प्रश्न विचारण्यास संकोच करु नये किंवा संकोची नसावा.खरं तरं समर्थ रामदास स्वामींनी श्री दासबोधात गुरुलक्षण आणि शिष्यलक्षण यांचे वर्णन केले आहे.अर्थात ते सर्व आदर्श या प्रकारात मोडणारे आहेत.तसे गुरु आणि शिष्य मिळणे आज कठीणच असले. तरी आजच्या गुरूंना मी कमी लेखणार नाही. आजकालच्या मुलांमध्ये लहानपणीच असलेली अफाट बुद्धिमत्ता पहाता, त्या मुलांना सामोरे जाणे हे देखिल मोठे काम आहे. गुरुला देखिल असे आव्हानात्मक शिष्य आवडतात.कारण गुरूंच्या बुद्धिमत्तेचा यात कस तर लागतोच पण अशा विद्यार्थ्याला शिकविण्याची मजा किंवा आनंद काही वेगळा असतो. 


            त्याच सोबत शिश्याच्या मनात गुरुविषयी आदरभाव असणे गरजेचे आहे.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥ हे नेहमी शिश्याच्या मनात असले पाहिजे.गुरुची भक्ति कां करावी कारण चातुर्य हे अंगात असते.पण चातुर्याला शहाणपण लाभते ते गुरुमुळे.त्याच प्रमाणे संत एकनाथ आपल्या एका अभंगात म्हणतात की “गुरु परमात्मा परेशु. ऐसा ज्याचा दृढ विश्वासू !!” ज्या वेळेस शिष्याचा गुरु हा परमात्मा आहे आणि तोच ईश्वर आहे. आणि तो आपल्याला योग्य मार्गाने घेऊन जाईलच असा दृढ विश्वास असतो. तेव्हाच तो आपल्या गुरुरुपी ज्ञानसाठयातून ज्ञानार्जन करु शकतो, हेच खरे.


प्रसाद नातु,पुणे 



Comments

  1. अप्रतिम, आज गुरुपौर्णिमा असल्यासारखेच वाटले

    ReplyDelete
  2. ,great! You too are a serious Shishya!

    ReplyDelete
  3. Very well write up. Bhavana Natoo.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...