Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

सुसंस्कृत राजकारणी

Blog No. 2023/62      

Date: 12th, March 2023.



मित्रांनो. 

वर्ष 2023 ला मी नियमितपणे ब्लॉग लिहावयांस सुरुवात केली,तेव्हा एक गोष्ट कटाक्षाने ठरविली होती की राजकारणावर लिहायचे नाही आणि राजकारण्यांवर लिहायचे नाही.पण आज एका राजकारणी नेत्याचा जन्मदिवस आहे, त्यांना केवळ राजकारणी म्हणून मला टाळता येणार नाही.महाराष्ट्राचे मुत्सद्दी राजकारणी, अर्थतज्ञ, सुसंस्कृत,साहित्यिक नेतृत्व म्हणजे भारताचे माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण. 


स्व.यशवंतराव चव्हाण यांचे बद्दल थोडेसे           

स्व. यशवंतराव चव्हाण. यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे येथे झाला.त्यांना एकूण तीन भावंडे होती. चव्हाण लहानपणीच पोरके झाले, कारण त्यांच्या वडिलांचे यशवंतराव लहान असतांनाच निधन झाले. त्यांच्या आईने त्यांना स्वावलंबन आणि देशभक्तीची शिकवण दिली.स्वतंत्रता चळवळीबद्दल त्यांच्या मनात लहानपणापासून आकर्षण होते. 1930 साली कराड येथे शाळेत असतांना असहकार चळवळीत सहभाग घेतल्याबद्दल त्यांना दंड झाला होता. 1932 साली साताऱ्यात भारताचा ध्वज फडकविल्याबद्दल त्यांना 18 महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. 

1934 ला टिळक हायस्कूल कराड येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर,त्यांनी कोल्हापूर येथील राजाराम कॉलेज येथून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. बी.ए. झाल्यावर त्यांनी तत्कालीन बॉम्बे यूनिवर्सिटी मधून एलएलबी पूर्ण केले. 1942 ला त्यांनी कराड येथे वकिलीस सुरुवात केली.त्यांचा विवाह फलटण येथे वेणूताई यांचेशी झाला. महाविद्यालयीन जीवनात ते जवाहरलाल नेहरू,सरदार वल्लभभाई पटेल यांच्या संपर्कात आले.  1942 च्या चले जाव चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना दोन वर्षाची शिक्षा झाली. 


राजकीय कारकीर्द

1946 साली मुंबई राज्याच्या विधानसभेचे सभासद झाले. त्या नंतर ते 1957 साली कराड येथून निवडून गेले होते.त्यांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती, 1 मे 1960 ला ते महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले तेव्हा पासून .त्यांच्या कार्यकाळातच कृषि जमीन धारणा कायदा पारित करण्यात आला. 1962 मध्ये चीनने भारतावर हल्ला केल्यानंतर,भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री कृष्ण मेनन ह्यांनी राजीनामा दिल्यावर,त्यांना तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी, त्यांना संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी सोपविली.1966 ते 1970 ह्या काळात ते गृहमंत्री होते. 26 जून,1970 ला तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांना अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपविली. 1974 ते 1977 ह्या काळात त्यांनी परराष्ट्रमंत्री पद देखिल भूषविले.त्या नंतर मात्र कॉंग्रेस मध्ये जेव्हा फुट पडली. तेव्हा त्यांनी श्रीमती इंदिरा गांधी यांना पाठिंबा न देणे त्यांना महागात पडले.1979 ते 1980 या काळात ते भारताचे उप- पंतप्रधान देखिल होते. भारताचे गृहमंत्री,अर्थमंत्री,संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री आणि उप- पंतप्रधान इतकी सारी वरिष्ठ पदे सांभाळणारे ते  एकमेव महाराष्ट्रीयन. 


साहित्यिक संपदा 

मी आधीच लिहिल्याप्रमाणे स्व. यशवंतराव चव्हाण हे साहित्यिक होते. त्यांनी खालील पुस्तके लिहिली. 

1. आपले नवे मुंबई राज्य 

2. ऋणानुबंध (ललित लेख)

3. कृष्णाकाठ हे त्यांचे आत्मचरित्र आहे. 

4. भूमिका 

5. विदेश दर्शन 

6. सह्याद्रीचे वारे (भाषण संग्रह)

7. युगांतर 

8. तसेच त्यांचे भाषण संग्रह पुस्तिका देखिल आहेत. 


            स्व. यशवंतराव चव्हाण हे साहेब या नावाने प्रसिद्ध होते. त्यांच्या काळातील राजकारण हे द्वेष विरहित राजकारण होते. राजकारणात सुद्धा सुशिक्षित आणि महत्वाचे म्हणजे सुसंस्कृत नेते मंडळी होती.कुणावर वैयक्तिक टीका होत नसे. काही व्यक्ती शब्दांत सामावत नाहीत.साहेब त्यापैकीच एक पण ब्लॉग किती मोठा असावा हे देखिल बघावे लागणार,  


मृत्यु:-

असे हे थोर मुत्सद्दी राजकारणी,अर्थतज्ञ, उदारमतवादी, साहित्यिक, कलोपासक असे स्व. यशवंतराव चव्हाण 25 नोव्हेंबर, 1984 ला आपल्याला सोडून गेले. नवी दिल्ली येथे त्यांचे हृदय विकाराचा झटका आल्याने निधन झाले. मृत्युसमयी ते 71 वर्षाचे होते. 



स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांना त्यांच्या 114 जयंती निमित्त माझा प्रणाम.असा राजकारणी होणे नाही हेच खरे.  


                                                                                                                                        प्रसाद नातु,पुणे.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...