Skip to main content

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

माझा विदर्भाचा फेरफटका

Blog No.2023/002

Date:- 6th, January 2023 



मित्रांनो,

            नुकताच मी माझ्या जन्मभूमीत आणि कर्मभूमीत जाऊन सफर करून आलो.नोकरीतून निवृत्ती होईपर्यन्त कुणाकडे,अगदी जवळच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन राहिलो,असा निवांत मिळाला नव्हता.मार्च,2020 ला जेंव्हा सेवानिवृत्त होणार होतो, तेव्हा खरं तर मनोमन हे ठरविलेले की 15 एप्रिल 2020 पासून छान दौरा काढायचा. अगदी अहमदनगर पासून ते गोंदिया पर्यन्तच्या सगळ्या नातेवाईकांकडे आणि जिवलग मित्रांकडे जाऊन रहायचे, पण कोविड 19 ने माझा सगळा प्लान चौपट केला.त्या नंतर वेळ मिळाला तो आता डिसेंबर 2022 मधे.

            समृद्धी महामार्ग नुकताच सुरु झाला होता.त्याने नागपूरला सफर करायची इच्छा होती.ती या निमित्ताने सफल झाली.जवळपास 16 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलो.राजुरा खरं तरं नातेवाईक कुणी नाही असे म्हणताच येणार नाही एवढा प्रचंड जिव्हाळा,प्रेम आणि आपुलकी अनुभवावयास मिळाली. वर्ध्यात ट्रेड फेअरचे आयोजन भावाच्या घरासमोरील मैदानात आयोजित केले होते. तिथे सहज पाहायला गेलो, पुण्यात रहात असल्याने विकत काही घ्यायचे नव्हते.एक मजा म्हणून गेलो.एका दुकानात,नारळ पाऊडर छोट्याश्या पाउचमधे विकत मिळत होते.मी सहज डोकावलो अन आश्चर्य त्या स्टॉलच्या मालकाने मला विचारले, “आप बँकमे थे क्या?” मी हो म्हटलं त्यांनी ‘अनिल गुप्ता’ नावं सांगितल्यावर ओळख पटली.आम्ही एकमेकांना 25-30 वर्षाने भेटत असू. मी बँक ऑफ इंडिया,वर्धा शाखेत असतांना स्टेट बँक मधे clearing साठी जात असे. तेव्हाची आमची भेट.खूप गप्पा झाल्या. मग मी अनिलला म्हटले, “एक सेल्फी हो जाये. ये याद हम कॅमेरेमे बंद करना चाहते है.” त्याला खूप आनंद झाला आणि मलाही.

            त्या नंतर बँक ऑफ इंडिया पेंशनर आणि सेवानिवृत्तांच्या संघटनेकडून,नागपूर येथे परवाना भवन येथे, माझा बँकेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर केलेल्या साहित्य सेवेबद्दल सत्कार करण्यात आला.आपल्या माणसांकडून झालेले कौतुक खरच खूप सुखावह असं असतं.बँक ऑफ इंडिया परिवारातले खूप सारे सोबती बऱ्याच वर्षानंतर भेटले.बँक ऑफ इंडिया परिवार ही खरोखरीच एक अनोखी कल्पना.त्या परिवारातले पुनः एकदा भेटले.प्रत्येकाच्या तोंडी ‘गेले ते दिवस’ ही भावना होती.मदतीला भले ही कम्प्युटर नव्हते,यांत्रिकीकरण नव्हते,पण मित्र होते,एक कुटुंब होते, एक परिवार होता.एकमेकांच्या सुखदु:खामधे एकमेकांच्या सोबत होते,आपुलकी होती,जिव्हाळा होता. तो आधुनिक बँकिंगने गमावल्याची खंत प्रत्येकाच्या मनांत जाणवली आणि ओठावरही आली.

            विदर्भाचा फेरफटका सोळा दिवसांचा होता.एका ब्लॉगमधे कसं सामावणार,तेव्हा भेटूया,पुढील भागात. जास्त नाही फक्त एक दिवसाचा विराम.

 

                                                                                                                        प्रसाद नातु, पुणे                                                                                                       

Comments

  1. खूप छान सुरुवात. पुढचे सर्व भाग वाचायला खूप आवडेल.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...