Skip to main content

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

उदंड झाली स्मारके

Blog No. 2023/19 

Dated 22nd, January 2024.  

 


मित्रांनो, 

            भारत हा पुतळ्यांचा आणि स्मारकांचा देश आहे, असे वर्णन जरी कुणी केले तरी ते वावगे ठरू नये, इतके भारतात पुतळे आणि स्मारकं आहेत. तुम्ही जर दिल्लीला गेलात तर दोन तीन दिवस,तुम्हाला नुसती स्मारकं बघायला लागतील.इथे महात्मा गांधी,जवाहरलाल नेहरू,लाल बहादूर शास्त्री,ग्यानी झेलसिंग, शंकर दयाळ शर्मा, इंदिरा गांधी, राजीव गांधी,अटल बिहारी वाजपेयी, के.आर.नारायणन, चंद्रशेखर,चौधरी चरण सिंग,जगजीवनराम, आय.के.गुजराल यांची स्मारकं आहेत.ही सारी स्मारकं भूतपूर्व राष्ट्रपती,भूतपूर्व पंतप्रधान,भूतपूर्व उप-पंतप्रधान यांची आहेत.तरी यांत डॉ.राजेंद्रप्रसाद,डॉ.राधाकृष्णन,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,स्व. मोरारजी देसाई,स्व.यशवंतराव चव्हाण, स्व.पी.व्ही.नरसिंहराव,चौधरी देवीलाल ह्यांचा समावेश नाही,हे महत्वाचे आहे.

स्मारकं उभारण्याचे कारण आणि उद्दिष्टे

            ही स्मारकं उभारण्याचे कारण आणि उद्दिष्टे काय आहेत.हे आपण समजावून घेतले पाहिजे.माझ्या माहिती प्रमाणे ह्या सगळ्या महान व्यक्तींचे विचार,लोकांपर्यंत पोहोचावेत एवढेच नव्हे तर ,त्यांच्या पासून पिढ्यानपिढ्यानी प्रेरणा घ्यावी किंवा ह्या स्मारकांना भेट देऊन प्रेरणा मिळावी.हा ह्या मागचा उद्देश असावा.पण प्रत्यक्षात असे होतांना दिसत नाही.प्रत्यक्षात ह्या स्मारकांना लोक भेट तर देतात,पण तो साइट सीइंगचा एक भाग असतो.मग प्रेरणा ती काय मिळणार.जिथे इतर काही पाहण्यासारखे नाही,फक्त महान व्यक्तींचे स्मारक आहे,अशा ठिकाणी किती लोक फक्त ह्या स्मारकांना भेट द्यायला जातात,हा संशोधनाचा विषय आहे.

            हा सर्व विषय आज ब्लॉग मधे लिहायचे कारण म्हणजे आमच्या “पुस्तकप्रेमी” समूहावर प्रसिद्ध लेखक रवींद्र पिंगे ह्यांच्या “दुसरी पौर्णिमा” ह्या पुस्तकाचा परिचय करून देण्यात आला.त्यांनी “सेवाग्राम गांधी आश्रमातील  सायंकाळ” या लेखात असे म्हटले आहे की,आज तुम्हाला ही भूमी ओस पडलेली दिसते.हा त्यांचा अनुभव बऱ्याच वर्षापूर्वीचा आहे.आज तर गांधीजींचे अनुयायी देखिल तिथे राहिलेले नाहीत.मला आठवते आहे स्व. इंदिरा गांधी होत्या तेव्हा त्या नागपूरला आल्या की त्यांचा सेवाग्रामला भेट देण्याचा कार्यक्रम ठरलेला असे.पवनारच्या विनोबा आश्रमाची आता हीच स्थिति आहे.हे आश्रमास भेट दिल्यावर लक्षात आले.   

त्यांचे विचार कुणी सांगेल कां?

आज ह्या साऱ्या थोर नेत्यांच्या विचारांविषयी बोलतांना दिलेली भाषणे सामान्यपणे अशी असतात. “अमुक अमुक नेत्यांचे विचार हे देशाला पुढे नेण्यास मार्गदर्शक आहेत.” “अमुक अमुक नेत्यांचे विचार हेच देशात शांतता प्रस्थापित करण्यास मार्गदर्शक ठरू शकतात.” “देशाची सर्वांगीण प्रगती व्हायला हवी असेल तर अमुक अमुक नेत्यांचे विचार अंगीकारायला हवेत.” “अमुक अमुक नेत्यांचे विचार हे देशाला तंत्रज्ञानात पुढे नेऊ शकतात.” वगैरे वगैरे. पण हे कुणीच त्यांनी नांव घेतलेल्या विचाराबद्दल काहीच बोलतांना दिसत नाही.ह्यात दोन गोष्टी असू शकतात. एक तर त्या थोर नेत्याचे विचार ह्या भाषणे देणाऱ्यांना माहित नसावेत किंवा त्या नेत्यांचे विचार सांगितले,तर आपले स्वतःचे वर्तन तसे नसल्याने,आपली पोल खोल होऊ शकते,म्हणून सांगत नसावेत असे वाटून जाते.जसे पूर्वी लोकमान्य टिळक ह्यांच्या वर शाळेत भाषण करायला सांगितले,की मुले फक्त त्यांच्या मी शेंगा खाल्या नाहीत,मी टरफले उचलणार नाही ही,एकच गोष्ट सांगत जणू त्यांच्या चरित्रात दुसरे काहीच नव्हते की काय.     

           

ह्यावर उपाय काय?

खरं तर हे सारे बघितल्यावर मन विषण्ण होतं.भौतिक विकास हाच देशाचा सर्वांगीण विकास नसून त्या सोबत देशातील नागरिकांचे विचार देखिल प्रगल्भ व्हायला हवेत. विचारांचा विकास व्हायला हवा असेल तर ह्या साऱ्या नेत्यांचे विचार हे राजकीय अभिनिवेश बाजूला ठेऊन पुढे आणावयास हवेत.ह्यासाठी देशातील थोर व्यक्ती,त्यांची चरित्रे आणि त्यांचे विचार ह्याचा अभ्यास नागरिक शास्त्र ह्या विषयाचा एक वेगळा भाग करून पाठयक्रमात त्याचा समावेश व्हायला हवा असे मला वाटते. अन्यथा असेच म्हणावे लागेल “उदंड झालीत स्मारके पण विचारांचा दुष्काळ.”      


प्रसाद नातु, पुणे. 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...