ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026. मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये. आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...
Blog No. 2023/24 Date ,30th, January 2023 . मित्रांनो, परदेशांत आलेली मंदी आणि मोठ्या टेक कंपन्यांमध्ये आलेली नोकरी कपात.ह्याच्या वार्ता आजकाल मोठ्या प्रमाणात ऐकायला येत असतांना एक गोष्ट काळजी लावणारी आहे. ती म्हणजे ही कपात करतांना एखादा कर्मचारी सक्षम आणि निष्ठावंत आहे.त्याला ही नोकरीतून कमी केले जात आहे.भारतात मंदी नाही आणि भारतात अशी परिस्थिति नसली तरी, परदेशातील घडणाऱ्या गोष्टींचे अंधानुकरण करीत,ते जे करीत असतात,त्या मागे काही उदात्त हेतु आहे.असे मानणाऱ्यांची खुळचट लोकांची संख्या आपल्या देशात कमी नाही.म्हणून काळजी वाटते. Experience Quotient ( EQ ) देखिल महत्वाचा वरिष्ठ कर्मचाऱ्यांना कमी करून त्यांच्या जागी तेवढ्या पगारात 2 ते 3 नवीन कर्मचारी ठेवता येतील,अशी ही कृती देखिल अशीच बिनडोक पणाची आहे. कारण intelligent quotient ( IQ ) सोबत तेवढाच Experience Quotient ( EQ ) देखिल महत्वाचा आहे.विशेषतः जिथे decision making चा प्रश्न ...