Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

भारतातील वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे

 Blog No. 2023/21 

Date,27th,  January 2023.


मित्रांनो,

            दिवसेंदिवस जसजसे मनुष्याचे सरासरी आयुर्मान वाढत चालले आहे. तसतसे वृद्ध लोकांची संख्या वाढत चालली आहे. 2011 च्या जनगणनेनुसार भारतात 10 कोटी 40 लाख वृद्ध व्यक्ती (वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक होत्या. त्यातील 5 कोटी 30 लाख महिला आणि 5 कोटी 10 लाख पुरुष होते. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड आणि हेल्पएज इंडियाच्या अहवालानुसार 2026 पर्यन्त वृद्ध लोकांची संख्या 17 कोटी 30 लाख पर्यन्त वाढण्याची शक्यता आहे. सध्या शहरी भागात राहाणारे वृद्ध एकूण लोकसंख्येच्या 71% एवढे आहे तर 29% वृद्ध ग्रामीण भागात रहातात.    

 वृद्ध पालकांच्या समस्या 

बदलत्या काळानुसार, चांगले जीवनमान जगण्यासाठी मुले शहरांमध्ये किंवा इतर प्रदेशांत किवा परदेशात देखिल जातात.काही पालक त्यांच्या मुलांसोबत जाण्यास तयारी दर्शवितात.तर काही वेळेस पालक वृद्ध झाले की मुलांना त्यांचे ओझे होते.त्यातून त्यांना मुक्ती हवी असते.म्हणून ते स्वतःच्या पालकांना त्यांच्या गावांत सोडून निघून जातात.काही वेळा मुले स्वतःच पालकांना वृद्धाश्रमात सोडून निघून जातात.तर कधी कधी वृद्धांच्या दयनीय अवस्था लक्षांत आल्याने धर्मादायी संस्था त्यांना वृद्धाश्रमात नेऊन सोडतात.              

भारतातील वृद्धाश्रमांची संख्या

सध्या भारतात 728 वृद्धाश्रम आहेत547 वृद्धाश्रमांची माहिती उपलब्ध आहेत्यापैकी 325 वृद्धाश्रमांमधे वृद्धांना मोफत राहण्याची सोय आहेतर इतर 95 वृद्धाश्रमांमधे निवासासाठी शुल्क आकारले जाते,तर जवळपास 110 इतर वृद्धाश्रमांमधे मोफत तसेच सशुल्क राहण्याची सुविधा उपलब्ध आहे. भारतातील सर्वाधिक साक्षरता दर असलेल्या  केरळ राज्यात सर्वाधिक म्हणजे २७८ वृद्धाश्रम असल्याची नोंद आहे.

भारत हे उच्च परंपरा आणि संस्कृति जोपासणारे राष्ट्र असल्याने आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडणे आणि त्यांच्या उतार वयांत त्यांची काळजी न घेणे, हा अपमान समजला जातो. तरी देखिल काही मुले वाढत्या वयामुळे शारीरिक क्षमता कमकुवत झालेल्या पालकांना सांभाळणे हा जबरदस्तीचा रामराम समजतात.ते आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात नेऊन सोडतात. वृद्धाश्रमांची आणि वृद्धाश्रमातील वृद्धांची संख्या सतत वाढत चाललेली आहे,ही चिंतेची बाब आहे.   

 “प्रायवसी” आणि “स्पेस”

पूर्वी भारतात एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती,तेव्हा ही समस्या नव्हती.आता मुलांना आणि त्यांच्या बायकांना न्यूक्लियर फॅमिली गरजेची वाटायला लागली आहे. “प्रायवसी” आणि “स्पेस” ह्या दोन फॉरेन शब्दांनी सध्या धुमाकूळ घातलाय. अगदी 2 किंवा 3 बीएचके फ्लॅटमधे देखिल “प्रायवसी” आणि “स्पेस” चा इश्यू येतो.ह्याला बरीच कारणे आहेत.केवळ मुलांना दोष देऊन चालणार नाही.तर दोन्ही बाजूकडील म्हणजे नवऱ्याकडील आणि बायकोकडील आई वडिलांचा नको तितका हस्तक्षेप.मुलींना त्यांच्या भावाने त्यांच्या आई वडिलांना सांभाळायला हवे आहे.पण त्यांना नवऱ्याचे आई वडील नको असतात.

            आई वडील खरं आपल्या मुलांपेक्षा अनुभवाने अधिक अमृद्ध असतात.पण त्यांच्या कडून देखिल कधी कधी काही गोष्टींचा नको तितका आग्रह दिसून येतो.तसेच मुलं देखिल आपल्या आई वडिलांनी जग पाहिले आहे हे विसरुन जातात.वृद्ध आणि तरुण यांच्यातील पिढीचे अंतर, वृद्धांना त्यांच्या मुलांच्या काही निवडी स्वीकारण्याची परवानगी देत ​​नाहीजसे की अनेकांना अजूनही स्वतंत्रपणे काम करणाऱ्या सूनेबद्दल आक्षेप आहे.या समस्यांमुळे कौटुंबिक कलह निर्माण होतो आणि पालकांना घराबाहेर काढण्याशिवाय पर्याय राहत नाही.मुले त्यांच्या पालकांनी त्यांच्या म्हातारपणासाठी जमा केलेली पुंजी,त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी,त्यांच्या पालकांकडून घेण्यास कधीच लाजत नाहीत आणि मध्यमवर्गीय कुटुंबात पालकांना जवळ राहण्यासाठी दुसरी जागा परवडत नाही.त्यामुळे त्यांची परवड होते.अशी काही भयानक प्रकरणे नोंदवली गेली आहेत जिथे मुले त्यांच्या पालकांना तीर्थयात्रेला किंवा इतर कोणत्याही शहरात पाठवण्याच्या बहाण्याने सोडून देतात.असे घडण्याचे कारण म्हणजे तरुण पिढी त्यांच्या मर्यादित शारीरिक क्षमतेमुळे क्रूर आणि वाईट वागून मोठ्या लोकांशी जुळवून घेण्यास नकार देते.अशा वेळी येजा करणारे त्यांना वृद्धाश्रमात सोडतात.काही ठिकाणी तर आई वडिलांना मानसन्मानाने जगता येईल एवढी धनसंपदा त्यांच्याकडे नसल्यामुळे आणि मुलानी जबाबदारी झटकल्यामुळे,अशांच्या नशिबी जन्मभर खस्ता खाल्यानंतर देखिल अपमानास्पद जीवन येते.    

 वृद्धाश्रमातील परिस्थिती तरी चांगली असते कां?

अनेक वृद्धाश्रमांमध्ये  राहण्याच्या चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध असतात,तर काही ठिकाणी  शिळे आणि अपुरे अन्न उपलब्ध करून दिले जाते.पैसे घेऊनही योग्य ती वैद्यकीय सेवा दिली जात नाही.वृद्धाश्रमातील हिंसाचाराची देखिल उदाहरणे आहेत.असेच एक उदाहरण म्हणजे एका ठिकाणी एका वृद्धाला जेवणाचे प्रमाण आणि गुणवत्तेबद्दल तक्रार केल्याबद्दल व्यवस्थापनाकडून मारहाण करण्यात आली असे समजते.वृद्धाश्रमातील लोक कुठेच आनंदी असतात.ते नेहमी मुलांची वाट पहात असतात.पण पालकांना सांभाळणे ही ज्यांची जबाबदारी आहे,ते प्रत्येक सुट्टीला येण्याची खोटी आशा देऊनही कधीच येत नाहीत.काही ठिकाणी असेही घडल्याचे कळते की मुले त्यांच्या पालकांच्या मृत्यूनंतरही येत नाहीत आणि शेजाऱ्यांनी अंत्यसंस्कार करावेत,अशी त्यांची इच्छा असते.भारतात 70 नंतर हेल्थ इन्शुरेंस बऱ्याच कंपनीकडून मिळत नाही. हेल्थ इन्शुरेंसचे वाढलेले चार्जेस हे देखिल वृद्ध लोकांसाठी एक समस्या बनली आहे.      

सारांश 

खरं तर हे दुष्टचक्र आहे "जसे पेराल तसेच उगवेल" ह्या न्यायाने,त्या मुलांना सुद्धा एक दिवस वृद्धापकाळ येणार आणि त्यांच्या मुलांनी त्यांना अशीच वागणूक दिली तर त्यांना त्याचा पश्चाताप होईल.पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल.म्हणून दोन्ही बाजूंनी जर सामंजस्याची भूमिका घेतली.तर ही समस्या अधिक गंभीर स्वरूप धारण करणार नाही.आता आपला संसार आटोपला आहे.जसा आपल्याला कुणाचा हस्तक्षेप चालायचा नाही,तसाच मुलालाही चालत नसेल.कारण शेवटी तो तुमचाच मुलगा आणि तुमचेच रक्त आहे.हे आई वडिलांनी लक्षात घ्यावे आणि आपण आज जिथे कुठे आहोत.त्या मागे कुणाचे तरी श्रम,मेहेनत, वेळ आणि आयुष्य खर्ची पडले आहे,ह्याचा मुलांनी देखिल विसर पडू देऊ नये. असे मला वाटते.

            सरकारने देखिल वृद्ध लोकसंख्येसाठी काही तरी ठोस करायला हवे,कारण राष्ट्रांच्या उभारणीत एके काळी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले आहे.त्यांना मदत करणे गरजेचे आहे.आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कृपया कमेन्ट बॉक्स मधे लिहायला विसरू नका.

 

                                                                                    प्रसाद नातु,पुणे          

 

Comments

  1. The problem is more severe in case of elderly males who cannot cook and have to depend more on others . In case of single elderly ladies it's the other way around. They have neither enough money nor adequate financial knowledge.
    All the blogs were beautifully written and enjoyed it.

    ReplyDelete
  2. छान माहिती.

    ReplyDelete
  3. अनिल जोगळेकर, आजचा ब्लॉग वाचला. सध्याच्या परिस्थिती चे यथार्थ वर्णन केले आहे.

    ReplyDelete
  4. This is very real current situation of old age. It can be balanced by both elders as well as youngers. Very nice information to think on it.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...