ब्लॉग नं. 2026/1 99. दिनांक: 18 जुलै, 2026. मित्रांनो , बटाटा खरंच आरोग्याचा शत्रू आहे का ? अनेक वर्षांपासून बटाट्याला वजन वाढवणारा , मधुमेह वाढवणारा आणि आरोग्यासाठी अपायकारक असा शिक्का मारला गेला आहे.पण आतड्यांच्या आरोग्याच्या तज्ज्ञ परिधी गर्ग यांचे मत यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. त्या म्हणतात , " बटाट्याने तुम्हाला निराश केले नाही , त्याच्याभोवती निर्माण झालेल्या गैरसमजांनी तुम्हाला निराश केलं आहे." योग्य पद्धतीने तयार केलेला आणि खाल्लेला बटाटा हा पौष्टिक आहाराचा महत्त्वाचा भाग ठरू शकतो. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयावर सविस्तर जाणून घेऊ. सविस्तर: बटाटा पौष्टिक का आहे ? बटाटा हा केवळ स्टार्चचा स्रोत नसून , त्यामध्ये फायबर , प्रथिने , पोटॅशियम , व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B6 आणि लोह यांसारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात.त्यामुळे बटाट्याकडे फक्त कार्बोहायड्रेट म्हणून पाहणे योग्य नाही. ' शिजवून थंड करण्याची ' युक्ती काय आहे ? परिधी गर्ग यांच्या मते , बटाटे उकडून किंवा शिजवून काही तास थंड केल्यावर , त्...
ब्लाॅग नं.2026/194. दिनांकः 13 जुलै, 2026. मित्रांनो , मला जेव्हा जेव्हा कुठे जेवायला जायचा किंवा परिवारसोडून इतरांच्या सोबत हॉटेलमधे जायचा किंवा हॉटेलातील पदार्थ खायचा प्रसंग येतो , तेव्हा तेव्हा मिरची खात जा , डायबेटिस दूर होईल किंवा आम्ही पहा , आम्ही तिखट खातो , आम्हाला नाही डायबेटिस असं मला सांगितलं जातं.अगदी इथे नाही एकाने अगदी उटीला (तामिळनाडू) देखिल सांगितलं , तेव्हापासून विचार करत होतो , याचा मागोवा घ्यावा आणि मग एक ब्लाॅग लिहावा म्हणून आज हा ब्लॉग लिहीला , याच विषयावर. सविस्तरः आपल्या भारतीय स्वयंपाकघरात,हिरवी मिरची नसलेला बेत शोधूनही सापडणार नाही.जेवणाला झणझणीत चव आणण्यासोबतच , हिरव्या मिरचीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत , यावर अनेकदा चर्चा होते. अलिकडच्या काळात सोशल मीडिया आणि घरगुती संभाषणांमध्ये,एक नवीन समज पसरत आहे, "हिरवी मिरची मधुमेह ( Diabetes) नियंत्रित करते , आणि जे लोक जास्त तिखट खातात , त्यांना मधुमेह होतच नाही." पण या दाव्यात किती तथ्य आहे ? विज्ञान आणि वैद्यकीय शास्त्र ( Medical Science) याबद्दल काय सांगते ? चला जाणून घेऊया. हिरवी मि...