ब्लॉग नं. 2026/046 . दिनांक: 15 फेब्रुवारी, 2026 . मित्रांनो , मेंदूतला एक ‘स्विच’ आणि बदललेलं आयुष्य “ सर , आता वय झालंय…माझ्याकडून नाही होणार.”ही वाक्यं आपण किती वेळा बोलतो ? आणि त्याहून महत्त्वाचं , किती वेळा मनापासून मानतो ? पण एक गोष्ट सांगतो की,कधी कधी शरीराचं वय बदलायला औषध , शस्त्रक्रिया किंवा सप्लिमेंट लागत नाहीत. फक्त मेंदूतला एक छोटासा स्विच ‘ऑन’ करावा लागतो.म्हणजे नेमकं काय ते जाणून घेऊ या,आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: 1979 सालचा एक अविश्वसनीय प्रयोग 1979 मध्ये , हार्वर्ड विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ डॉ. एलेन लॅंगर यांनी एक धाडसी प्रयोग केला.त्यांना टाइम ट्रॅव्हल करायचं होतं (म्हणजे एका काळातून दुसऱ्या काळांत जाणे) ,पण कोणत्याही मशीनशिवाय.त्यांनी जवळजवळ 80 वर्षांचे आठ वृद्ध पुरुष निवडले.कुणी काठीशिवाय चालू शकत नव्हतं , कुणाच हात थरथरत होता, कोणाला मोतीबिंदू झालेला तर कोणाला स्वतःचं नावही नीट आठवत नव्हतं. त्यांच्या कुटुंबीयांना वाटलं, “ वडिलांना वृद्धाश्रमात पाठवत आहेत.” पण खरं तर, त्यांना पाठवलं जात होतं…1959 सालात, हो 1959 या वर्षात. ...
ब्लॉग नं. 2026/040. दिनांक: 9 फेब्रुवारी, 2026. मित्रांनो, 🌴 खारिक आणि खजूर : काय फरक आहे? भारतीय संस्कृतीत खारिक आणि खजूर यांना केवळ सुकामेवा म्हणूनच नव्हे , तर ऊर्जा , आरोग्य आणि औषधी गुणधर्मांचा स्रोत म्हणून विशेष महत्त्व आहे. उपवास , सण , आजारपणातून सावरणे , तसेच वृद्ध व लहान मुलांच्या आहारात हे दोन्ही पदार्थ आवर्जून वापरले जातात.पण खारिक आणि खजूर यामध्ये नेमका फरक काय ? त्यांचा उगम कुठे आहे ? आणि ते शरीरासाठी इतके फायदेशीर का मानले जातात ? हे सर्व आपण सविस्तर पाहूया आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: उत्पत्ती आणि इतिहास खजूर ( Dates) : खजुराचे झाड Phoenix dactylifera या नावाने ओळखले जाते. · उत्पत्ती साधारणतः मध्य पूर्व (इराक , इराण , सौदी अरेबिया) तील आहे. खजुराला इतिहास सुमारे 6000 वर्षांपूर्वीचा,तेव्हापासून खजूर मानवाच्या आहारात आहे.इस्लाम , आयुर्वेद आणि युनानी वैद्यकशास्त्रात खजुराला विशेष स्थान खारिक ( Dry Dates) : खारिक म्हणजे पूर्णपणे वाळवलेला खजूर : भारतात विशेषतः गुजरात , राजस्थान , महाराष्ट्र...