Skip to main content

मानसिक आजार हे वेड नाही

  ब्लॉग नं. 2026/039. दिनांक: 8 फेब्रुवारी, 2026.   मित्रांनो, मानसिक आजार म्हणजे वेड नाही             मानसिक आजारांवर दर रविवारी एक ब्लॉग लिहायचं ठरवलं आहे.त्याच उपक्रमातील हा दूसरा ब्लॉग. आज आपण मानसिक आजार म्हणजे काय? आणि त्यासंबंधीचे जे गैरसमज आहेत, त्यावर जाणून घेऊ या. सविस्तर: “ तो वेडा झाला आहे.” किंवा   “ तिला मानसोपचाराची गरज आहे,म्हणजे काहीतरी बिनसलंय.” अशी वाक्ये आजही आपल्या समाजात सहज ऐकायला मिळतात.पण यामागे एक मोठा गैरसमज दडलेला आहे आणि तो म्हणजे मानसिक आजार म्हणजे वेड पण यांत अजिबात तथ्य नाही.   मग मानसिक आजार म्हणजे काय ? मानसिक आजार म्हणजे, विचार करण्याची पद्धत बदलणे किंवा भावना नियंत्रणाबाहेर जाणे आणि वागण्यात बदल होणे. जसं शरीराला ताप , मधुमेह , रक्तदाब होतो, तसंच मनालाही आजार होतात.याचं एक वास्तववादी उदाहरण खालील दिले आहे.   स्मिता एक सुशिक्षित , जबाबदार आई आहे. ती घर सांभाळते , नोकरी करते , सगळ्यांची काळजी घेते. पण काही महिन्यांपासून-- तिला झोप येत नाही--लहानसहान गोष्...

मानसिक आजार हे वेड नाही

 ब्लॉग नं. 2026/039.

दिनांक: 8 फेब्रुवारी, 2026. 

मित्रांनो,

मानसिक आजार म्हणजे वेड नाही

            मानसिक आजारांवर दर रविवारी एक ब्लॉग लिहायचं ठरवलं आहे.त्याच उपक्रमातील हा दूसरा ब्लॉग. आज आपण मानसिक आजार म्हणजे काय? आणि त्यासंबंधीचे जे गैरसमज आहेत, त्यावर जाणून घेऊ या.

सविस्तर:

तो वेडा झाला आहे.” किंवा  तिला मानसोपचाराची गरज आहे,म्हणजे काहीतरी बिनसलंय.” अशी वाक्ये आजही आपल्या समाजात सहज ऐकायला मिळतात.पण यामागे एक मोठा गैरसमज दडलेला आहे आणि तो म्हणजे मानसिक आजार म्हणजे वेड पण यांत अजिबात तथ्य नाही.  

मग मानसिक आजार म्हणजे काय?

मानसिक आजार म्हणजे, विचार करण्याची पद्धत बदलणे किंवा भावना नियंत्रणाबाहेर जाणे आणि वागण्यात बदल होणे. जसं शरीराला ताप, मधुमेह, रक्तदाब होतो, तसंच मनालाही आजार होतात.याचं एक वास्तववादी उदाहरण खालील दिले आहे.  

स्मिता एक सुशिक्षित, जबाबदार आई आहे. ती घर सांभाळते, नोकरी करते, सगळ्यांची काळजी घेते.

पण काही महिन्यांपासून-- तिला झोप येत नाही--लहानसहान गोष्टींवर ती रडते-तिला सतत अपराधी वाटते आणि तिच्या मनांत मी काहीच करू शकत नाही” असे विचार येतात. तिचं कुटुंब म्हणते,“इतकं सगळं असूनही का रडतेस? वेडी होत चाललीस का?”

पण सत्य हे आहे की, स्मिता वेडी नाही तर ती नैराश्याने ग्रस्त आहे. मानसिक आजाराबद्दल जे सामान्य गैरसमज आहेत ते सविस्तर जाणून घेऊ.  

सामान्य गैरसमज (Myths):

गैरसमज 1: मानसिक आजार म्हणजे वेडेपणा:

वास्तव, बहुतांश मानसिक आजारात व्यक्ती- ही वास्तव ओळखू शकते-आपली नोकरी, घर सांभाळू शकते तसेच फक्त आतून त्रास सहन करत असते

गैरसमज 2: सुदृढ माणसांना मानसिक आजार होत नाही:

वास्तव-  मानसिक आजार हा हुशार लोकांना होतो, यशस्वी लोकांना देखिल होतो तसेच तो श्रीमंत–गरीब सर्वांना होऊ शकतो,मानसिक आजार आणि भावनिक ताकद याचा याच्याशी संबंध नसतो.

गैरसमज 3: मानसिक आजार औषधांशिवाय बरा होत नाही:

वास्तव- अनेक मानसिक आजार समुपदेशनाने बरे होतात, औषधे गरजेपुरती आणि तात्पुरती असतात तसेच योग्य उपचारांनी पूर्ण बरे होणे शक्य आहे

गैरसमज 4: मानसोपचार म्हणजे वेड्यांचा दवाखाना:

वास्तव-  मानसोपचारतज्ज्ञ म्हणजे, मनाचे डॉक्टर, सगळं ऐकून घेणारे आणि आजारावर उपाय सांगणारे तज्ज्ञ

तिथे जाणे म्हणजे स्वतःची काळजी घेणे.

मानसिक आजारांची काही उदाहरणे:

·        नैराश्य (Depression),

·        चिंता विकार (Anxiety Disorder),

·        पॅनिक अटॅक,

·        ओसीडी (Obsessive Compulsive Disorder),

·        पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD),

महत्वाचे यापैकी एकही आजार म्हणजे वेडेपणा नाही.मानसिक आजारांवर उपचार उपलब्ध आहेत. औषधे सुरक्षित आहेत आणि रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात. फक्त गरज आहे, सत्य स्वीकार करण्याची आणि मदत घेण्याची.

समारोप:

मानसिक आजारासंबंधात सांगायचे म्हणजे, समाज म्हणून आपली भूमिका सहानुभूतीची असली पाहिले, रुग्णाला दोष देऊ नका, बोलतांना वेडा” हा शब्द टाळा, ऐकून घ्या, समजून घ्या आणि गरज असल्यास तज्ज्ञांकडे घेऊन जा. कधी कधी समजून घेणेच सर्वात मोठा उपचार ठरतो. मानसिक आजार म्हणजे वेड नाही

तसेच ती कमजोरी/कमतरता नाही आणि तो लाजेचा विषय तर अजिबातच नाही. असेल तो उपचाराचा विषय आहे. जसं शरीर आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातो, तसंच मन आजारी पडल्यावर मानसोपचारतज्ज्ञाकडे जाणे, हेच खरे शहाणपण आहे.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 

प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

अस्वीकरण: हा लेख केवळ माहितीवर आणि या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांवर आधारित आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

Comments

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...