ब्लॉग नं. 2026/04 4 दिनांक:1 3 फेब्रुवारी, 2026. मित्रांनो, व्यायाम फक्त किती करतो यापेक्षा कसा करतो , हे अधिक महत्त्वाचं आहे आपण नेहमी ऐकतो ,“ दररोज ३० मिनिटं चालणं आवश्यक आहे.” जानेवारी 2026 मध्ये BMJ Medicine मध्ये प्रकाशित झालेल्या एका महत्त्वाच्या अभ्यासानं हा सल्ला अपूर्ण असल्याचं स्पष्ट केलं आहे. हा अभ्यास Nurses’ Health Study आणि Health Professionals Follow-up Study (HPFS) या दीर्घकालीन संशोधनांवर आधारित असून , लाखो लोकांचा डेटा यात समाविष्ट आहे. या अभ्यासाचा मुख्य निष्कर्ष असा आहे की , व्यायामाचं प्रमाण महत्त्वाचं आहेच , पण व्यायामातील विविधता ( Exercise Variety) हा स्वतंत्रपणे आयुष्य वाढवणारा घटक आहे.आजच्या ब्लॉगमध्ये याविषयी सविस्तर जाणून घेऊ. सविस्तर: 1. थोडासा व्यायामही आयुष्य वाचवतो/वाढवतो: (Something is better than nothing) या अभ्यासानुसार , शून्य व्यायाम करणाऱ्यांच्या तुलनेत,अगदी थोडाफार व्यायाम करणाऱ्यांमध्येही मृत्यूचा धोका लक्षणीयरीत्या कमी दिसतो.महत्त्वाची गोष्ट म्हणजे , जसा व्याया...
ब्लॉग नं: 2025/038. दिनांक: 7 फेब्रूवारी, 2026. मित्रांनो, मधुमेह उपचार : इन्सुलिन विरुद्ध गोळ्या ( Tablets) आज मधुमेह ( Diabetes) हा केवळ एक आजार न राहता जीवनशैलीचा भाग बनला आहे. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी, डॉक्टर दोन प्रमुख उपचार पद्धती सुचवतात, गोळ्या ( Oral Antidiabetic Drugs) आणि इन्सुलिन ( Insulin) . पण रुग्णांच्या मनात नेहमी प्रश्न असतो — “ गोळ्या चांगल्या की इन्सुलिन ?” चला , हा गोंधळ व्यवस्थित समजून घेऊया. सविस्तर: मधुमेह म्हणजे नेमके काय ? मधुमेह म्हणजे शरीरात इन्सुलिनची कमतरता किंवा इन्सुलिन नीट काम न करणे , ज्यामुळे रक्तातील साखर वाढते. 1️ ⃣ गोळ्या ( Diabetes Tablets) – कशा काम करतात ? गोळ्या प्रामुख्याने Type 2 Diabetes मध्ये वापरल्या जातात. गोळ्यांचे मुख्य कार्य : गोळ्या सामान्यतः हे कार्य करतात. शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवणे,यकृतातून साखरेचेउत्पादन कमी करणे, आतड्यांतून साखरेचे शोषण कमी करणे आणि स्वादुपिंडाला अधिक इन्सुलिन तयार करण्यास मदत करणे ...