ब्लॉग नं. 2026/045 . दिनांक: 14 फेब्रुवारी , 2026 . मित्रांनो , “ सर , मेटाबॉलिझम वाढवायचं म्हणजे नेमकं काय करायचं ?” हा प्रश्न आज जवळजवळ प्रत्येक जण विचारतो.कोणी पावडर शोधतो , कोणी डिटॉक्स ड्रिंक , तर कोणी फॅट बर्नर . पण सत्य थोडं वेगळं आहे. मेटाबॉलिझम वेगळं ‘बूस्ट’ करायचं नसतं. ते ठीक केलं , की ते आपोआप सुधरतं. आणि ते ठीक करण्याची सुरुवात होते लिव्हरपासून.कारण मेटाबॉलिझम आणि लिव्हर यांचा खोल संबंध आहे. आजच्या ब्लॉगमध्ये हेच जाणून घेऊ. सविस्तर: आपल्या शरीरात फॅट बर्निंग, शुगर कंट्रोल, कोलेस्टेरॉलचं नियमन हे सगळं लिव्हरमध्येच होतं असतं . म्हणूनच , जर लिव्हर थकलेले असेल , फॅटी किंवा ओव्हरलोड असेल तर तर मेटाबॉलिझम “स्लो” होतं. मेटाबॉलिझम सुधारायचं असेल , तर ‘ लिव्हर रिसेट’ करण्यापासून सुरुवात करावी लागते. मेटाबॉलिझम कसं सुधारतं ? विज्ञानावर आधारित 10 उपाय खाली देत आहे. 1️ ⃣ साखर आणि फ्रुक्टोज आधी कमी करा: फ्रुक्टोज थेट लिव्हरमध्ये जाऊन फॅटमध्ये रूपांतरित होते.कोल्ड ड्रिंक्स, ...
ब्लॉग नं: 2025/038. दिनांक: 7 फेब्रूवारी, 2026. मित्रांनो, मधुमेह उपचार : इन्सुलिन विरुद्ध गोळ्या ( Tablets) आज मधुमेह ( Diabetes) हा केवळ एक आजार न राहता जीवनशैलीचा भाग बनला आहे. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी, डॉक्टर दोन प्रमुख उपचार पद्धती सुचवतात, गोळ्या ( Oral Antidiabetic Drugs) आणि इन्सुलिन ( Insulin) . पण रुग्णांच्या मनात नेहमी प्रश्न असतो — “ गोळ्या चांगल्या की इन्सुलिन ?” चला , हा गोंधळ व्यवस्थित समजून घेऊया. सविस्तर: मधुमेह म्हणजे नेमके काय ? मधुमेह म्हणजे शरीरात इन्सुलिनची कमतरता किंवा इन्सुलिन नीट काम न करणे , ज्यामुळे रक्तातील साखर वाढते. 1️ ⃣ गोळ्या ( Diabetes Tablets) – कशा काम करतात ? गोळ्या प्रामुख्याने Type 2 Diabetes मध्ये वापरल्या जातात. गोळ्यांचे मुख्य कार्य : गोळ्या सामान्यतः हे कार्य करतात. शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवणे,यकृतातून साखरेचेउत्पादन कमी करणे, आतड्यांतून साखरेचे शोषण कमी करणे आणि स्वादुपिंडाला अधिक इन्सुलिन तयार करण्यास मदत करणे ...