Skip to main content

Posts

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

  ब्लॉग नं. 2025/35 2 . दिनांक: 1 6 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आजच्या गतिमान कॉर्पोरेट जगात कर्मचारी हे फक्त काम करणारी माणसे नसतात.ते आपल्या संस्थेचे भावनिक केंद्र ( Emotional Core) असतात.त्यामुळे कॉर्पोरेट समग्र कल्याणाला ( Corporate Wellbeing )  आता पर्याय नाही.ते प्रत्येक व्यवसायासाठी आता अत्यावश्यक झाले आहे. कॉर्पोरेट समग्र कल्याण ( Corporate Wellbeing ) म्हणजे काय? याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.     सविस्तर: आज काल प्रत्येक नियोक्त्याला ( Employer ) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे फक्त “गुड टू डू” गोष्ट नाही , तर ती त्यांच्या संस्थेच्या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक झाली  आहे.एक विश्वासार्ह , वैज्ञानिक आणि रचनाबद्ध कॉर्पोरेट,मेंटल हेल्थ प्रोग्राम अशा पद्धतीने बनविते की त्याचा, कर्मचारी टिकवून ठेवणे , उत्पादकता वाढवणे आणि संस्थेबद्दलची बांधिलकी ( loyalty) मजबूत करण्यास मोठा हातभार लागतो. 1) बर्नआउट: संस्थेत शांतपणे पसरत जाणारी आग: गॅलपच्या 2024 च्या अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांपैक...

किशोरावस्थेतील काही प्रसंग

मित्रांनो    चाळीसगाव सुटलं. तसा मी ही आपला प्रवास किशोरवस्थेकडे सुरू केला होता.आमच्या ध्यानी मानी नसतांना आबासाहेबांना सिकंदराबादच्या   डी.बीआर.मिल्स कडून नोकरीची ऑफर आली.ते इंटरव्ह्यु साठी गेले अन तिकडे कामावर रुजू झाले.आबासाहेब आता डी.बीआर.मिल्स, सिकंदराबाद येथे नोकरीला लागले होते.1970 साली रु.1200/-पगाराची नोकरी म्हणजे गंमत नव्हती.हैदराबाद आणि सिकंदराबादच्या मधोमध, टॅंक बंद रोडच्या समोर, डी.बीआर.मिल्स अर्थात दिवाण बहादूर रामगोपाल मिल्स. विस्तीर्ण पसरलेला हुसैन सागर अगदी समोर होता.त्यात एक रोटरी पार्क होता. डी.बीआर.मिल्स.ही सिकंदराबाद आणि हैदराबादच्या सीमा रेषेवर होती. कवाडीगुडा हे त्या भागाचे नांव जिथे ही मिल होती.घरातून टॅंक बंद रोडची ट्राफिक दिसत असे.               चाळीसगाव सारख्या लहान गावातून एकदम हैदराबाद-सिकंदराबाद सारख्या मोठ्या गावात रहायला जाणे.एक चॅलेंज होतं हे. हैदराबाद आता इतके मोठे नसले तरी जवळपास 350 वर्षाचा इतिहास आणि एकेकाळी निझामाची राजधानी असलेले शहर होते.हैदराबाद आणि सिकंदराबाद ही जु...

माझं बालपण भाग 3 रा

मित्रांनो  चाळीसगाव जरी सुटलं तरी आठवणी सुटल्या नव्हत्या.आमच्या चाळीसगाव मुक्कामातच माझ्या मोठ्या बहिणीचे,सुनंदा ताईचे लग्न झाले.1965 साली तिचे लग्न झाले,ती लहान होती तेव्हा.मी तर अवघ्या 5 वर्षाचा होतो.माझा जन्म झाल्यापासूनचे ते पहिले लग्न.मला जेवढे आठवते त्या प्रमाणे तिचे लग्नही नगर पालिकेच्या शाळेत झाले होते.त्या नंतर 1967 साली नगर पालिकेच्या शाळेत एकदम दोन लग्ने अनुभवायला मिळाली.एक माझ्या मोठ्या मामाचे अनिल मामाचे आणि सुधा मावशीचे.ह्या खरं तर पूर्णतः कौटुंबिक घटना, पण सांगतोय यासाठी की,त्या वेळेसची लग्न ही खरोखर मंगल विवाह असायची, त्यांत पावित्र्य असायचं.जपलं जायचं.आज काल लग्न हा एक इवेंट असतो.                            माझ्या मामा आणि मावशीच्या लग्नातलं आठवतंय.कुणाचे विशेष लक्ष मेनू काय वगैरे याकडे नव्हते.लग्न सकाळी लागलं.त्यानंतर विधी आणि मग पंगतीच जेवण.कुणाला काय आवडतं आहे,काय हवे आहे त्याची दखल घेतली जात होती.सर्व विधी होईपर्यंत वऱ्हाडी मंडळी नवरदेव...

माझं बालपण भाग 2 रा

मित्रांनो,             चाळीसगावला पहिली ते पाचवी,अशी पाच वर्षे शिकलो.ह्याच काळांत बऱ्याच घटना घडल्या.त्यातील एक म्हणजे,माझा धाकटा बंधु श्रीनिवासचा जन्म झाला.त्या वेळी सुतिका गृह वगैरेच्या सोयी लहान गावात नसायच्या.घरीच सुईणीला बोलावून घेत असतं.दुसरी महत्वाची घटना म्हणजे, कोयना नगरचा भूकंप.आधी दारांना कड्या असायच्या,त्या कड्या कोंडयात अडकवून त्याला कुलूप लावले जाई.11 डिसेंबर 1967 च्या पहाटे अचानक दाराच्या कड्या अचानक वाजू लागल्या.माझे वडील आबासाहेब,सर्वात आधी उठले आणि दरवाज्याकडे धावले.चोर असेल का? अशी शंका त्यांच्या मनाला शिवली देखील नव्हती.तर त्यांच्या डिपार्टमेंटला काही प्रॉब्लेम झाला तर नसेल ना,म्हणून कुणी बोलवायला आले असेल.बराच वेळ कड्या वाजलेल्या मी ऐकल्या आणि पाहिल्या.स्वयंपाकघरांत कपाटांत लावून ठेवलेले डब्बे,भांडी सारेच खाली पडले होते.आता सारखी त्या वेळेस प्रसार माध्यमे नव्हती. प्रसार माध्यम एकच तो म्हणजे रेडियो.आबासाहेबांनी मला ऑर्डर केली.“राजा, पटकन रेडियो लाव. रेडियोवर न्यूज सुरू होत्या.       ...

माझे बालपण

                       मित्रांनो , माझं लहानपण म्हणजे 50 वर्षापूर्वीच जग. मी पहिली ते चौथी , चाळीसगांवच्या सरस्वती विद्या मंदिरमधे शिकलो. चाळीसगांव ते धुळे मार्गावर , रेल्वे लाईनच्या , मुंबई-हावरा हा रेल्वे मार्ग , अलिकडेच माझी शाळा. केळकर मावशी , माझ्या आईची दूरची बहिण , शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. पण मला काही वेगळी ट्रीटमेंट मिळायची अशातली गोष्ट नव्हती. त्या एक कडक मुख्याध्यापिका होत्या.                     माझे वडील आबासाहेब , तेव्हा चाळीसगांव ला छगनलाल टेक्सटाईल मिल ह्या कापड गिरणीत ऑफिसर होते , त्यांची पोस्ट डाईंग ॲड प्रिटींग मास्टर अशी होती. सकाळी 6.00 वाजता पहिला भोंगा होत असे. त्या वेळेस घडाळ्यापेक्षा भोंग्यावर दिनचर्या अवलंबून असायची. 6.30 ला पुन्हा एक भोंगा व्हायचा. चाळीसगांव फारस मोठ नव्हतं   तेव्हा. भोंग्याचा आवाज साऱ्या चाळीसगांवात ऐकू जात असे. मिल पासून दूर रहाणाऱ्या कापड गिरणी कामगारांसाठी हा इशारा असतं असे की वेळेत पोहोचायचे आहे ना मग चला ...

हौसेला मोल नसतं.

नानासाहेब नुकतेच एका सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते.सेवानिवृत्तीच्या वेळेस ते चीफ इंजीनियर , पाटबंधारे विभाग,पश्चिम महाराष्ट्र विभाग होते.सेवानिवृत्त झाल्यावर provident फंड, अर्जित सुटयांचे रोखीकरण आणि ग्रॅच्युटी मिळून जवळपास एक करोंड एवढी रक्कम मिळाली होती.त्यांच्या वडिलांची जयसिंगपूर जवळ 17 एकर शेती होती.उस हे रोखीचे पीक.नानासाहेबांना एकच बहीण होती.तिचे पती संजय हे एका साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर होते.त्यामुळे शेतीचे उत्पन्न सगळे नानासाहेबांच्या खाती जमा होत असे. त्यांचा मुलगा अमर एका एम.एन.सी, आय.टी.कंपनीत नोकरीला होता. त्यालाही तगडा पगार. त्याचे लग्न झाले होते.त्याची बायको अपूर्वा देखील एका एम.एन.सी आय.टी.कंपनीत नोकरीला. मुलीचे प्राचीचे मिस्टर सौरव हे डिस्ट्रिक्ट कलेक्टर होते.जबलपूरला.   ही सर्व पार्श्वभूमी सांगायचे कारण हेच की त्यांच्या पैशाला कुणी दावेदार नव्हता.ना ते कुणावर अवलंबून.त्यांच्या पत्नीची,विद्याताईंची परदेश वारीची इच्छा होती. ती त्यांनी पहिल्याच महिन्यात पूर्ण केली.मोठ्या पदावर होते.त्याचा फायदा घेऊन त्यांनी पासपोर्ट,व्हिसा अगदी सगळे जमवून आण...

कोविड 19 , एम.एस एम. ई.उद्योग आणि वारश्याचे नियोजन (Succession Planning )

  मित्रांनो ,  आपण सगळेच जाणता आहात कि , कोविड 19 ने अखिल जगताला कसे आणि किती नुकसान पोहोचवले आहे.जीवित हानी तर झालीच. पण अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत.जागतिक अर्थव्यवस्थेला ह्याचा खूप मोठा धक्का बसला.आपला भारत देश ह्या जगाचाच हिस्सा किंवा भाग आहे.त्यामुळे भारताची देखील अपरिमित हानी झाली.अर्थ व्यवस्थेला खीळ बसली.भारत हा सामान्यतः सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योगांनी व्यापलेला देश.   भारताच्या एकूण जी डी पी च्या 36.9%  इतके योगदान सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योगांचे (उत्पादन क्षेत्र ) 2020-21 ह्या कालखंडाचा विचार करता होते.तेच निर्यातीत ह्याच कालखंडात 49.5% सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योगांचे राहिले आहे.जवळपास 15 करोंड लोकांना सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योगांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.(सौजन्य सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय , केंद्र सरकार) ह्याच कालखंडात मजुरांच्या   स्थलांतरांचा विषय ऐरणीवर आला.हे    स्थलांतर केलेले मजूर आपल्या गांवी परतले.पण नंतर सगळे कामावर हजर झाले नाहीत किंवा ते अनेक कौटुंबिक समस्यांमुळे कामावर परतू शकले नाहीत.जसे घराकडील...

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ

  नमस्कार मित्रांनो ,  कधी कधी आपल्याला एखादे गाणं म्हणा ,  गझल म्हणा खूप आवडतं असतं. आपल्याला गाण्याचे थोडे जरी अंग असेल तर आपण ते गाणं म्हणून पहातो किंवा नेहमी म्हणत असतो. हिन्दी किंवा मराठी गाणी तशी समजायला सोपी असतात. एखादेच काव्य दुरबोध असेल तर ते थोडेसे समजायला कठीण असतं. पण असं फार कमी वेळा होतं. पण हिन्दी गझल मधे कधी कधी उर्दू शब्द असतात आणि ते आपण समजून न घेता ,  गायकाचा आवाज  , चाल  , ताल  , लय ऐकून त्या गझल मधील त्या शब्दांचा अर्थ समजावून घेण्याच्या भानगडीत पडत नाही.   आज आपण एका अशाच गझलचा अर्थ समजावून घेणार आहोत. ती गझल आहे. "रंजीश ही  सही दिलही दुखाने के लिए आ" ह्या गझलचा अर्थ समजावून घेऊ या.   मी दोन ओळी आणि त्या नंतर त्याचा मराठीत अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. माणसाला जन्माला आल्यावर , जवळपास सगळ्याच गोष्टींची पहिल्यांदा सुरुवात करावीच लागते.नंतर ती अंगवळणी पडत असते. तर पाहू या.   रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ आ फिर से मुझे छोड के जाने के लिए आ   आपल्यात शत्रुत्व असो तरी म...