Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

माझे बालपण


    
 

            मित्रांनो, माझं लहानपण म्हणजे 50 वर्षापूर्वीच जग. मी पहिली ते चौथी, चाळीसगांवच्या सरस्वती विद्या मंदिरमधे शिकलो. चाळीसगांव ते धुळे मार्गावर, रेल्वे लाईनच्या, मुंबई-हावरा हा रेल्वे मार्ग, अलिकडेच माझी शाळा. केळकर मावशी, माझ्या आईची दूरची बहिण, शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. पण मला काही वेगळी ट्रीटमेंट मिळायची अशातली गोष्ट नव्हती. त्या एक कडक मुख्याध्यापिका होत्या.

                माझे वडील आबासाहेब,तेव्हा चाळीसगांव ला छगनलाल टेक्सटाईल मिल ह्या कापड गिरणीत ऑफिसर होते, त्यांची पोस्ट डाईंग ॲड प्रिटींग मास्टर अशी होती. सकाळी 6.00 वाजता पहिला भोंगा होत असे. त्या वेळेस घडाळ्यापेक्षा भोंग्यावर दिनचर्या अवलंबून असायची. 6.30 ला पुन्हा एक भोंगा व्हायचा. चाळीसगांव फारस मोठ नव्हतं  तेव्हा. भोंग्याचा आवाज साऱ्या चाळीसगांवात ऐकू जात असे. मिल पासून दूर रहाणाऱ्या कापड गिरणी कामगारांसाठी हा इशारा असतं असे की वेळेत पोहोचायचे आहे ना मग चला घरुन निघा. माझे वडील आबासाहेब सांगत की तेव्हा लेट लतिफांचे प्रमाण हे नगण्यच असायचं. म्हणजे काही ना तितकेच महत्वाचे कारण असल्याशिवाय उशीरा येणे किंवा अनुपस्थित रहाणे नगण्यच. सातला पाच मिनीटे कमी असतांना ते स्यतः निघायचे, मिल घरापासून दूर असली की 6.30 वाजताच घरुन निघायचे. वक्तशीरणाचे बाळकडू मला मिळाले ते आबासाहेबांकडून. ते मला राजा म्हणत. राजा, एक गोष्ट लक्षांत ठेव. वेळ पाळणे ही जगातली सर्वात सोपी गोष्ट. कारण ती पाळण आपल्या हातात असतं. कुठल्याही कामासाठी निघायचं असेल तर निघायची वेळ ठरवायची आणि त्या वेळेच्या 15 मिनीटे आधी तयार होऊन बसायचं. तुझ्या आयुष्यात तू वेळेसाठी कधी ही बोलणी खाणार नाही आहेस.मग मी बॅकेत काम करतांना हे जीवनभर जपलं. माझी सौ आणि भाऊ , फलाना फलाना, माझ्याच बॅकेतला बाजूला रहाणारा, मी बॅकेत गेल्या नंतर कसा 15 मिनीटाने  जातो  हे सांगत असतं ,पण मी मात्र माझी वेळ सोडली नाही. जीवनांत चांगल-वाईट, खरं-खोटे, चूक-बरोबर असं खूप लोक सांगत असतात. त्यातलं  नेमके काय घ्यायचं ते आपण ठरवायचं. कारण जीवन आपल्याला  जगायचं असतं. असो.

                  तर भोंग्याभोवती दिनचर्या फिरत असे. माझी दुपारची शाळा असल्याने, दुपारचे भोंगे किती किती वाजता होतात, हे फक्त सुट्टीच्या दिवशी कळायचं.शाळेत जायला सायकल रिक्षा यायची. समोर रिक्षाचालक  आणि पाठीमागे एक चौकोनी डब्बा असायचा. त्यात तीघं चौघं जण बसत असू. त्या दिड किमी च्या सफरीला तोड नाही.कुणी अगदी लहान मुलं रिक्षात असली की ती शाळेपर्यत रडत असतं. माझ्या वडिलांच्या नोकरीमुळे, म्हणजे एका ठिकाणची सोडून दुसरीकडे जाण्यामुळे, माझे एक वर्ष वाया जाणार होते. तेव्हा पहिल्या वर्गात  वयाची 5 वर्षे पूर्ण झाल्यावर प्रवेश मिळत असे. मला 6 पूर्ण झाल्यावर पहिलीत प्रवेश घ्यावा लागला. पण त्यावेळेस उड्डान परिक्षा नावाची संकल्पना होती. मी पहिलीची आणि दुसरीची परिक्षा (उड्डान) परिक्षा दिली आणि पहिली नंतर तिसरीत बसलो. मी दुसरीत शिकलोच नाही. यामुळेच असेल कदाचित, दोन नंबरची कामं मला आयुष्यात कधी जमली नाहीत म्हणा, ईच्छाही झाली नाही. असो.

                  त्या वेळेस खेळ वेगळेच होते. बहुतेक मैदानी खेळ असतं. विटी दांडू किंवा गिल्ली डंडा ही म्हणतं, लगोऱ्या, चोर पोलीस, कबड्डी, पाऊस आला की खुपसणीचा खेळ खेळत असू. अरे हां आणि काचेच्या गोट्याचे खेळ रंगत असतं. माझी उंची इतरांपेक्षा जास्त असल्याने काही खेळात माझ्या उंचीचा फायदा होत असे.

                  चाळीसगांवच्या मिल कंपाऊंड मधे खुप जागा होती. एका बाजूला पूर्व पश्चिम अशी मोठी चाळ होती. त्यात ऑफिसर, क्लर्क यांना आपापल्या हुद्द्यानुसार कमी जास्त आकाराची घरं होती. बैठी चाळ होती. चाळीच्या पश्चिम टोकाला एक दुमजली म्युनिसीपालटीच्या शाळेची इमारत होती. त्याच्या पलीकडे एक आयताकृती मैदान होतं. तिथे आम्ही क्रिकेट खेळत असू. त्या काळीही क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ होता. भारताने मॅच जिंकली की समोरच्या पानावर बातमी येत असे. मोठ्या अक्षरात अगदी पाऊण अंकी फाॅट मधे भारताचा वेस्ट इंडीजवर दणदणीत विजय अशी बातमी यायची आणि त्या खाली विजयाच्या शिल्पकारांचे फोटो. त्यावेळेस चंद्रा, बेदी आणि प्रसन्नानी अक्षरक्षः धुमाकूळ घातला होता. तो होता लिटील मास्टर   सुनिल गावस्करच्या उदयाचा काळ. पहिल्याच मालिकेत गावस्करने 700 च्या वर धावा कुटल्या होत्या. फारुख इंजिनियरचे मला खुप आकर्षण होते त्याच्या लांब कल्ल्यांमुळे.अजित वाडेकर हे वेस्ट इंडीज विरुध्द विजय मिळवणारे भारताचे कर्णधार होते. वर्तमान पत्रातील येणारे फोटो कापून, एखाद्या मागच्या वर्षीच्या जुन्या वहीत चिटकवून ठेवण्याचा मला छंद जडला होता. असाच एक छंद आगपेटीच्या डबीची वरची कव्हर्स जमा करण्याचाही होता. त्या साठी आगपेटी आणायची म्हटली की ती किराणा दुकानातून केव्हाही आणायला मी तयार असे. दर वेळेस मग वेगळ्याच दुकानातून आणत असे. मग ते कितीही दूर असू दे. मग देवाजवळ किवा तुळशीजवळ आई दिवा लावायची तेव्हा तो एकाच काडीत लागू नये अशी ईच्छा करित असू आम्ही.(आम्ही म्हणजे मी आणि माझचा भाऊ मिलींद.) कारण काड्या जास्त लागल्या तर माचिस लवकर संपत असे.

           लोकसत्ता वाचायला सुरुवात केली ती 1967 साली, म्हणजे वयाच्या सातव्या वर्षी, आजही माझ्या घरी लोकसत्ताच येतो. (मधला पॅन्डेमिकचा काळ सोडल्यास , अविरत) पण लोकसत्ताच्या दर्ज्यात या 55 वर्षात खुप फरक पडला, दर्जा घसरला हे खेदाने म्हणावेसे वाटते.

            मिल कंपाऊंडच्या बाहेर पडल्यावर चाळीसगांव पाचोरा रस्ता ओलांडल्यावर, उत्तरेला मारुतीचे मंदिर होते. तिथे शनिवारी खुप गर्दी होत असे. आम्ही आवर्जून जात असू.एक होत मित्रांनो त्यावेळी जातीपातीचा विषय कुणी काढत नसे. एकमेकांनी कधी जातं विचारली नाही आणि ते जाणून घ्यायचा प्रयत्नही केला नाही.

अशा आज अनोख्या वाटणाऱ्या,जगात मी लहानाचा मोठा झालो. पण हे अनोखे आयुष्य मी माझ्या मुलांना देऊ शकलो नाही आणि नातवांना शक्यच नाही याची खंत कुठेतरी मनाला असते. हा ताण सायकाॅलाॅजीत डिफाईन करण्या सारखा ताण नक्कीच नाही.कारण तो ताण नाही मित्रांनो, ती सल आहे, बोचतच रहाणार.

                                                                                                                                                प्रसाद नातु     


क्रमशः 

Comments

  1. Sir,apla likhan hey nehmi hrudayatun kagadavar alyasarkhe vatte. Enjoyed reading it. Aplya lahanpanichya athvaninshi sagle Jan nakkich enjoy kartil. 1960 pasun ataparyantchya kalkhandhat vegveglya tappyavar vegvegle badal hot gele. Apan nakkich yavar Chan lihu shakal Asa vatta. Please do write.
    Raman Kamble

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...