ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025. मित्रांनो, माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर: लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...
नानासाहेब नुकतेच एका सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते.सेवानिवृत्तीच्या वेळेस ते चीफ इंजीनियर , पाटबंधारे विभाग,पश्चिम महाराष्ट्र विभाग होते.सेवानिवृत्त झाल्यावर provident फंड, अर्जित सुटयांचे रोखीकरण आणि ग्रॅच्युटी मिळून जवळपास एक करोंड एवढी रक्कम मिळाली होती.त्यांच्या वडिलांची जयसिंगपूर जवळ 17 एकर शेती होती.उस हे रोखीचे पीक.नानासाहेबांना एकच बहीण होती.तिचे पती संजय हे एका साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर होते.त्यामुळे शेतीचे उत्पन्न सगळे नानासाहेबांच्या खाती जमा होत असे. त्यांचा मुलगा अमर एका एम.एन.सी, आय.टी.कंपनीत नोकरीला होता. त्यालाही तगडा पगार. त्याचे लग्न झाले होते.त्याची बायको अपूर्वा देखील एका एम.एन.सी आय.टी.कंपनीत नोकरीला. मुलीचे प्राचीचे मिस्टर सौरव हे डिस्ट्रिक्ट कलेक्टर होते.जबलपूरला. ही सर्व पार्श्वभूमी सांगायचे कारण हेच की त्यांच्या पैशाला कुणी दावेदार नव्हता.ना ते कुणावर अवलंबून.त्यांच्या पत्नीची,विद्याताईंची परदेश वारीची इच्छा होती. ती त्यांनी पहिल्याच महिन्यात पूर्ण केली.मोठ्या पदावर होते.त्याचा फायदा घेऊन त्यांनी पासपोर्ट,व्हिसा अगदी सगळे जमवून आण...