Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

शरीराचे जैविक घड्याळ जाणून घ्या

ब्लॉग नं. 2025/030.

दिनांक: 30 जानेवारी, 2026.

                                           

मित्रांनो,

शरीराचे जैविक घड्याळ (Body’s Biological Clock)

तुम्हाला माहित असेलच की,आपल्या शरीरात एक नैसर्गिक वेळापत्रक असतेज्याला जैविक घड्याळ किंवा Circadian Rhythm (सर्केडियन रिदम) असे म्हणतात.हे जैविक घड्याळ 24 तास चालणारी अंतर्गत प्रणाली आहेजी शरीराला पुढील गोष्टी सांगत असतं, कधी झोपायचे, कधी उठायचे, कधी पचन करायचे, कधी शरीराची दुरुस्ती व शुद्धीकरण (Detox) करायचे आणि कधी हार्मोन्स स्रवायचे. जेव्हा आपण या घड्याळानुसार जगतोतेव्हा शरीर आपोआप बरे होते.जेव्हा आपण याच्या विरुद्ध जगतो (उशीरा झोपणेअनियमित आहार)तेव्हा शरीराचे शुद्धीकरण बिघडते.शरीर या घड्याळाच्या नुसार,शरीराच्या विविध अंगांचे/अवयवांचे केंव्हा शुद्धीकरण करतं,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघू या.

सविस्तर:

शरीर कधी डिटॉक्स करते?

एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, शरीर 24 तास डिटॉक्स करत असतंपण काही अवयव ठराविक वेळेला अधिक सक्रिय असतात — विशेषतः झोपेत.

रात्री 9 ते 11:

रोगप्रतिकारशक्ती व लिम्फॅटिक सिस्टीम:

शरीर दुरुस्तीच्या तयारीत असतं. या काळात मेलाटोनिन हार्मोन वाढू लागते.

रात्री 11 ते 1:

यकृत (Liver) शुद्धीकरणाचा सर्वोच्च काळ:

या काळात यकृत पुढील कार्य करत असते. विषारी घटक निष्क्रिय करणे, औषधे व मद्याचे विघटन करणे, रक्तातील साखरेचे नियंत्रण करणे, पेशींची दुरुस्ती करणे. या वेळेत जर तुम्ही जागे असाल, काही खात असाल किंवा ताणतणावात असाल तर, यकृताचे डिटॉक्स कार्य बाधित होते. म्हणून रात्री 10.30 पूर्वी झोपणे अत्यंत आवश्यक आहे.

रात्री 1 ते 3:

यकृत व पित्ताशय दुरुस्ती:

ही दुरुस्ती अतिशय खोल पातळीवर डिटॉक्स करून केली जाते. यात चरबीचे चयापचय तसेच राग व चिडचिडीशी संबंधित प्रक्रिया केल्या जातात. या वेळेत वारंवार जाग येण्याने यकृतावर ताण येतो.  

पहाटे 3 ते 5:

फुफ्फुसे (Lungs)

या वेळेत फुफ्फुसांचे  शुद्धीकरण केले जाते. यावेळी रक्तातील ऑक्सिजन वाढतो,श्वासावाटे विषारी घटक बाहेर पडतात.सकाळी खोकला येणे याच वेळेशी संबंधित असतो.  

पहाटे 5 ते 7:

आतडी / कोलन (Colon)

या वेळेत आतडी / कोलन (Colon) चे शुद्धीकरण केले जाते.ही वॉशरूमला जाण्याची सर्वोत्तम वेळ असते. या काळात शरीर कचरा बाहेर टाकते. शौचाची इच्छा दाबल्यास विष पुन्हा शरीरात शोषले जातात,

सकाळी 7 ते 9:

पोटाचे (Stomach) शुद्धीकरण:

या वेळेत पचनशक्ती तीव्र असते आणि ही वेळ नाश्त्यासाठी योग्य वेळ आहे.नाश्ता टाळल्यास स्वादुपिंडावर ताण येऊ शकतो.  

सकाळी 9 ते 11:

स्वादुपिंड (Pancreas) व प्लीहाचे शुद्धीकरण:

यावेळेत साखर नियंत्रण केले जाते. तसेच पोषणद्रव्यांचे शोषण होते.  

दुपारी 11 ते 1:

हृदय व रक्ताभिसरणाचे शुद्धीकरण:  

या वेळेत रक्तप्रवाह सर्वाधिक प्रवाही असतो. ही एकाग्रतेसाठी योग्य वेळ असते.  

दुपारी 1 ते 3:

लहान आतडयाचे शुद्धीकरण:

या वेळेत पोषण शोषणाचे कार्य होत असतं. तसेच हलकी झोप येणे स्वाभाविक आहे.

दुपारी 3 ते 5:

मूत्रपिंडाचे (Kidneys) शुद्धीकरण:

या वेळेत रक्त गाळण्याचे कार्य होत असते. तसेच क्षार व पाणी संतुलन साधले जाते. या वेळेत पाणी पिणे फायदेशीर असते.  

संध्याकाळी 5 ते 7:

मूत्रपिंड व मूत्राशयाचे शुद्धीकरण:

या वेळेत कचरा बाहेर टाकणे. या काळात हलके चालणे (walk) उपयुक्त असते.  

रात्री 7 ते 9:

हार्मोनल शांतता:

या वेळेत शरीर झोपेसाठी तयार होत असते. तसेच या काळात पचन मंदावते. जड जेवण केल्यास रात्रीचे डिटॉक्स थांबते.

समारोप:

            अशा रितीने शरीर 24 तास वेगवेगळ्या अवयवांचे शुद्धीकरण करत असतं. हे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी आपण आपल्या सवयी बदलायला हव्यात. जर शरीराला विरोध न करता जगलात तर प्रकृती खराब होणार नाही आणि झालीच तर शरीरच बरं करेल.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

Comments

  1. छान माहिती दिलीत, पण लक्षात ठेवणे जरा कठीणच वाटते
    मिलिंद निमदेव

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...