Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

 ब्लॉग नं. 2025/352.

दिनांक: 16 डिसेंबर, 2025.

मित्रांनो,

आजच्या गतिमान कॉर्पोरेट जगात कर्मचारी हे फक्त काम करणारी माणसे नसतात.ते आपल्या संस्थेचे भावनिक केंद्र (Emotional Core) असतात.त्यामुळे कॉर्पोरेट समग्र कल्याणाला (Corporate Wellbeing)  आता पर्याय नाही.ते प्रत्येक व्यवसायासाठी आता अत्यावश्यक झाले आहे. कॉर्पोरेट समग्र कल्याण (Corporate Wellbeing) म्हणजे काय? याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.    

सविस्तर:

आज काल प्रत्येक नियोक्त्याला (Employer) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे फक्त “गुड टू डू” गोष्ट नाही,तर ती त्यांच्या संस्थेच्या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक झाली  आहे.एक विश्वासार्ह, वैज्ञानिक आणि रचनाबद्ध कॉर्पोरेट,मेंटल हेल्थ प्रोग्राम अशा पद्धतीने बनविते की त्याचा, कर्मचारी टिकवून ठेवणे, उत्पादकता वाढवणे आणि संस्थेबद्दलची बांधिलकी (loyalty) मजबूत करण्यास मोठा

हातभार लागतो.

1) बर्नआउट: संस्थेत शांतपणे पसरत जाणारी आग:

गॅलपच्या 2024 च्या अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 40% लोक वारंवार बर्नआउट अनुभवतात. कामाचे दडपण, न संपणाऱ्या डेडलाईन्स, वर्क-लाइफ इम्पॅलन्स, सततचा ताण यामुळे मन थकलं की शरीरही थकते. याचा परिणाम कामगिरीवर, नात्यांवर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वासावर होतो.

➡️ कॉर्पोरेट वेलनेस प्रोग्रामद्वारे कर्मचारी भावनिक लवचिकता (emotional resilience) विकसित करू शकतात, coping mechanisms शिकतात आणि बर्नआउट मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतो.

2) अनुपस्थिती (Absenteeism): संस्थेसाठी अदृश्य पण मोठा खर्च:

डेलॉईट इंडिया (2022) च्या अहवालानुसार, जास्त तणावग्रस्त कर्मचारी 63% अधिक रजा घेतात. अशा रजांचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होण्यासोबतच, टीमची कामगिरी, प्रोजेक्ट टाइमलाईन आणि संस्थेचा आर्थिक भारही वाढतो.

➡️ समुपदेशन (Counselling), स्ट्रेस मॅनेजमेंट वर्कशॉप्स, मानसिक आरोग्य तपासणी,अशा सेवांचा अवलंब केल्यास कर्मचाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय वाढते आणि गमावलेला वेळ कमी होतो.

3) उत्पादकता: भारतीय कर्मचाऱ्यांचा नरम पडलेला उत्साह:

गॅलप 2024 नुसार,फक्त 14% भारतीय कर्मचारी “Thriving” म्हणजेच उत्कर्ष अनुभवत आहेत.बाकीचे कर्मचारी काम करतात… पण आनंदाने नाही.कमिटमेंट नसताना, कंटाळा आणि थकवा असताना, सर्जनशीलता आणि उत्पादकता कमी होतेच.

➡️ मेंटल हेल्थ सपोर्ट दिल्यास कर्मचारी अधिक फोकस्ड,ऊर्जा-पूर्ण आणि परिणामकेंद्रित होतात.
तणाव कमी होतो, उत्साह वाढतो, आणि त्याचा थेट फायदा संस्थेला मिळतो.

4) Psychological Safety: सुरक्षिततेची भावना म्हणजे नवोन्मेषाची पहिली पायरी:

एका सर्वेक्षणानुसार, 70% कर्मचारी कार्यस्थळी Psychological Safety Issues अनुभवतात. याचा अर्थ: मनातलं मोकळं करण्याची भीती, सुचविलेली आयडिया चुकली तर या भीतीमुळे आयडिया शेअर न करणे

टीम लीड्सकडून दबाव, अनावश्यक कामाचा ताण जाणवतो.जेव्हा मन असुरक्षित असते तेव्हा मानसिक आरोग्य खालावतं, टीममध्येही नकारात्मकता वाढते आणि संस्थेची “Innovation Power” पूर्णपणे कमी होते.

➡️ कॉर्पोरेट मेंटल हेल्थ प्रोग्राम्स हे अशा समस्यांचा अगोदरच प्रतिबंध करतात, संवाद सुधारतात, आणि सुरक्षित व आरोग्यदायी कार्यसंस्कृती तयार करतात.

मग उपाय काय?

कर्मचारी हे संस्थेची सर्वात महत्त्वाची संपत्ती असतात.त्यांचे मानसिक आरोग्य सुधारले तर अनेक गोष्टी घडतात. जसे की, उत्पादकता वाढते, उदासिनता कमी होते, निष्ठा (Loyalty) मजबूत होते, कार्य संस्कृती (Workplace Culture) सकारात्मक होते. संस्थेचा एकूण परफॉर्मन्स झपाट्याने वाढतो. म्हणूनच, कॉर्पोरेट वेलबीइंग आता ‘पर्याय’ राहिलेला नाही, तो तुमच्या व्यवसायाच्या यशाचा पाया आहे.

समारोप:

शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो.तो म्हणजे, आपली संस्था कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी नेमकी किती सज्ज आहे? कारण कर्मचाऱ्यांच्या आनंदातच संस्थेची प्रगती दडलेली आहे.हे ज्या नियोक्त्याला (Employer) कळेल,त्या संस्थेची प्रगती होणे,विकास होणे निश्चित आहे.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

  प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.   

Comments

  1. सध्या परिस्थितीला पूरक आणि उपयुक्त माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...