Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

भाऊबीज भावनिक नात्यांचे सुंदर प्रतीक .

ब्लाॅग नं.2025/298.
दिनांकः 23 ऑक्टोबर, 2025.

ब्लॉग नं.2025/298.

दिनांकः 23 ऑक्टोबर, 2025.

 

मित्रांनो,

भाऊबीजचे महत्व आणि साजरी करण्यामागील कारण

दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवातील शेवटचा आणि अतिशय भावनिक असा दिवस,म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण आणि भाऊ यांच्या प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ होते. महाराष्ट्रात तसेच भारतातील इतर अनेक भागात हा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.आजचा ब्लॉग याच विषयावर आहे.

🌸 भाऊबीजचे महत्व:

भाऊबीज हा केवळ सण नाही तर, बंधुभगिनीच्या नात्यातील ममत्व, स्नेह, आदर आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे.या दिवशी बहीण आपल्या भावाला घरी आमंत्रित करते.त्याला ओवाळते, त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करते. बदल्यात भाऊही बहिणीला भेटवस्तू किंवा रोख रक्कम देतो आणि तिच्या आनंदासाठी शुभेच्छा देतो. ही एक परंपरा आहे जी बहीण-भावाच्या नात्याला अधिक दृढ करते आणि एकमेकांबद्दलचे प्रेम वाढवते.

🕉️ भाऊबीज साजरी करण्यामागील कथा:

भाऊबीजेच्या साजरीकरणामागे अनेक कथा सांगितल्या जातात,त्यामधील एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते.

"एकदा भगवान यमराज, जो मृत्यूचा देव,त्याची बहीण यमुना हिने त्याला आपल्या घरी जेवणासाठी निमंत्रण दिले. खूप वर्षांपासून ती आपल्या भावाला भेटली नव्हती. भावाच्या स्वागतासाठी तिने सुंदर तयारी केली. जेवणानंतर तिने भावाला ओवाळले आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. यमराज खूप प्रसन्न झाला आणि म्हणाला, “ताई, आजपासून जो भाऊ   आपल्या बहिणीकडे जाईल आणि, त्याला तुझ्यासारखीच पूजा करेल,त्या भावाला दीर्घायुष्य आणि समृद्धी लाभेल.” त्याच दिवसापासून भाऊबीज साजरी करण्याची प्रथा सुरू झाली असे मानले जाते.

🌺 भाऊबीज साजरी करण्याची पद्धतः

1. बहिण भावाला घरी आमंत्रित करते.

2. भावाच्या कपाळावर चंदन, कुंकु आणि अक्षतांचा टिळा लावते.

3. त्यानंतर ती त्याला नमस्कार करते. आणि त्याला लाडू, चिवडा, चकली, शंकरपाळे इत्यादिचा फराळ देते.

4. भावाकडून बहिणीस गिफ्ट, पैसे किंवा वस्त्र दिले जाते.

5. हा दिवस प्रेम, कृतज्ञता आणि कौटुंबिक एकतेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो.

🌼 समारोपः

भाऊबीज आपल्याला शिकवते की,नात्यांतील जिव्हाळा जपावा. कौटुंबिक बंध अधिक घट्ट करावेत. बहिणीच्या सुरक्षिततेसाठी व भावाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी. या दिवशी भावंडे कितीही दूर असली तरी मनाने जवळ येतात. त्यामुळेच भाऊबीज हा सण केवळ पारंपरिक नाही तर भावनिक नात्यांचे एक सुंदर प्रतीक आहे. 💖

 

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

 

 

 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...