ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025. मित्रांनो, माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर: लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...
ब्लॉग नं: 2025/274. दिनांक: 30 ऑक्टोबर , 2025. मित्रांनो , 40 नंतर मधुमेह व उच्च रक्तदाबावर नियंत्रण हवे आहे ? पोषणतज्ज्ञ सांगतात – ‘सुरण’ खा! 40 वर्षांनंतर आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे ठरते. मधुमेह (डायबेटीस) , उच्च रक्तदाब (हाय बीपी) आणि वजनवाढ , ही या वयात अनेकांना भेडसावणारी प्रमुख आरोग्याची आव्हाने आहेत. अशा वेळी संतुलित आहार ही औषधाइतकीच प्रभावी ठरते .आजच्या ब्लॉग मध्ये आपण या संबंधी सविस्तर जाणून घेणार आहोत. सविस्तर : पोषणतज्ज्ञ लीना महाजन यांनी अलीकडेच त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये एक साधी पण प्रभावी भाजी सुचवली आहे – सुरण (जिमीकंद/याम्स). दिसायला साधं वाटणारं हे कंदमुळ आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे उपयोगी आहे. सुरण खाण्याचे फायदे : लीना महाजन यांच्या मते , सुरणाचे नियमित सेवन केल्यास खालील आरोग्यदायी लाभ मिळू शकतात: 1. रक्तातील साखर संतुलित ठेवते – मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी विशेषतः उपयुक्त. 2. हृदयाचे आरोग्य सुधारते – पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. 3. पचनासाठी फायदेशीर – फायबरमुळे बद्ध...