✍️ ब्लॉग क्र. 2025/267.
दिनांकः 23 सप्टेंबर, 2025
मित्रांनो,
जगात ज्यांचे पोट साफ – ते जीवनात जास्त काळ सुखी राहतात 🌿
असं म्हटलं जातं की, “सुखाचा मार्ग पोटातून जातो” याचा अर्थ चांगले,चविष्ट आणि पोटभर जेवण मिळाल्यावर माणूस सुखी आणि समाधानी होतो.पण फक्त जेवण चांगलं आणि चविष्ट असून चालत नाही,तर त्यासाठी पोट साफ असणे आवश्यक आहे. “पोट साफ असेल तर मन प्रसन्न, आणि मन प्रसन्न असेल तर जीवन सुखी.” ही आपल्याकडे पिढ्यानपिढ्या सांगितली जाणारी जुनी म्हण आहे. खरं तर, शरीराचं आणि मनाचं आरोग्य हे थेट पचनसंस्थेशी निगडित आहे. आतडं निरोगी नसेल तर कितीही पौष्टिक आहार घेतला तरी त्याचा उपयोग शरीराला होत नाही. आजचा ब्लॉग या विषयावर आहे.
समारोप:
🌱 जेवतांना खायच्या गोष्टी:
रोज जेवताना शेंगदाणा किंवा तीळाची चटणी अवश्य खावी.तसेच हिरवी मिरची, लसूण आणि मीठ घालून केलेला ठेचा पचन सुधारतो.काकडी, बीट, पानकोबीची कोशिंबीर खाल्ल्याने पोट हलके राहते.आणि जेवणानंतर बडीशोप, ओवा, तीळ युक्त मिश्रण चर्वण केल्याने ढेकर, जळजळ, गॅसेस कमी होतात.
🌿 पोट साफ रहाण्यासाठी घरगुती उपाय
पोट साफ रहाण्यासाठी,त्रिफळा चूर्ण (1 चमचा कोमट पाण्यासह) किंवा पतंजली दिव्या उदरकल्प चूर्ण.
तसेच ओवा थोडे चावून खा. भाकरी खातांना भाकरीवर लाल चटणी आणि तेल टाकून खावी.किंवा आठवड्यातून एकदा लहान चमचा एरंडेल तेल रात्री झोपताना घ्यावे. रोज सकाळी उठल्यावर कच्चा लसूण (1-2 पाकळ्या कोमट पाण्यासोबत घेणे फायद्याचे ठरते. सकाळी पाव लिंबू, मीठ टाकून कोमट पाणी पिल्याने पोट लगेच साफ होते.यापैकी तुम्ही कुठलाही उपाय करून पाहू शकता.
🥛 ताक – पृथ्वीवरील अमृत:
रोज जेवणानंतर एक ग्लास ताजं ताक घ्या.त्यात जिरेपूड, धनेपूड, काळं मीठ घातल्यास मल नरम राहतो, गॅसेस कमी होतात आणि ढेकर येणं थांबतं.केवळ ताकावर काही दिवस राहिलं तरी शरीराला पंचकर्मासारखा फायदा होतो. त्वचेला तेज येतं आणि मन प्रसन्न राहतं.
💪 जीवनशैलीतील बदल:
पालेभाज्या, कच्च्या कोशिंबिरी, नाचणीच्या भाकऱ्या आहारात सामावून घ्या. दिवसातून 8-10 ग्लास पाणी प्या.तसेच जमल्यास सफरचंद व केळी ही दोन फळं रोज खा.व्यायाम दररोज 45 निटं करा. यांत चालणं, सायकलिंग, एरोबिक्स किंवा जिने चढणं,या सारखे व्यायाम करू शकता. योगासनं नियमित केल्याने पचनसंस्था तंदुरुस्त राहते. रात्री झोपताना देशी गायीचं दूध आणि एक चमचा तुप घ्यावे.
🌟 आतड्यांची काळजी का घ्यावी?
तुम्ही लक्षात घ्या की,शरीराच्या 70% रोगप्रतिकारक पेशी आतड्यांमध्ये असतात. चुकीचा आहार, ताणतणाव, पर्यावरणातील प्रदूषण यामुळे पचनसंस्था कमजोर होते. त्यामुळे आपल्या आहारात फायबरयुक्त पदार्थ, पाणी आणि ताक यांचा समावेश करणं अत्यावश्यक आहे.
🌿 समारोप 🌿
पोट हे आपल्या आरोग्याचं मूळ आहे. निरोगी पोट म्हणजे उत्साही शरीर आणि आनंदी मन. लहानसहान घरगुती उपाय, साधे आहारातील बदल आणि नियमित व्यायाम यामुळे पोट हलकं राहतं, पचन सुधारतं आणि आयुष्य अधिक निरामय होतं.म्हणूनच लक्षात ठेवा. पोट स्वच्छ, तर जीवन सुखी.
👉 या सोप्या आणि नैसर्गिक उपायांचा अंगीकार करा आणि आपल्या आयुष्याला द्या निरोगीपणाचं आणि समाधानाचं वरदान. 🌸
आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
✍🏻 लेखक: प्रसाद नातु
(आरोग्य व जीवनशैली विषयक लेखक)
📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.

अत्यंत उपयुक्त माहिती, धन्यवाद
ReplyDeleteमिलिंद निमदेव
🙏RR
ReplyDeleteउपयुक्त माहिती
ReplyDelete