ब्लॉग सं. 2025/229.
दिनांक: 19 ऑगस्ट, 2025.
मित्रांनो,
मधुमेह नियंत्रणासाठी 3 सोपे पण प्रभावी आहार घटक
मधुमेह हा
आजच्या काळातील एक महत्त्वाचा जीवनशैलीचा आजार आहे. तो शरीराच्या जवळजवळ सर्व
भागांवर परिणाम करतो.दीर्घकाळ रक्तातील साखरेची पातळी जास्त राहिल्यास,मूत्रपिंड, हृदय आणि मेंदू
यांवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.पण याबाबत घाबरण्याची गरज नाही, कारण हा आजार
पूर्णपणे उलट (Reverse) करणे कठीण असले तरी, योग्य आहार, औषधे आणि जीवनशैलीच्या मदतीने तो
प्रभावीपणे व्यवस्थापित करता येतो.मधुमेह नियंत्रणासाठी 3 सोपे पण प्रभावी आहार घटक,तुम्ही
जवळ बाळगलेत,तर त्याचा कसा उपयोग होतो,ते आपण आजच्या ब्लॉगमध्ये पहाणार आहोत.
सविस्तर:
मधुमेह कसा होतो?
जेव्हा
आपल्या शरीरात इन्सुलिन हार्मोनचे उत्पादन,योग्य प्रमाणात होत नाही किंवा शरीर
त्याचा योग्य वापर करू शकत नाही, तेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि मधुमेह निर्माण
होतो.मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारातील बदल खूप महत्त्वाचे आहेत.
तज्ज्ञांच्या मते, जर मधुमेहाच्या रुग्णांनी खालील 2 गोष्टी
आपल्या आहारात समाविष्ट केल्या तर त्याचा फायदा नक्कीच होतो.
1. दालचिनी
– नैसर्गिक रक्तशर्करा नियंत्रक:
आयुर्वेदिक
तज्ज्ञ डॉ. नील सावलिया यांच्या मते, नाश्त्यानंतर दालचिनीचा एक छोटा तुकडा खाणे
फायदेशीर ठरते.त्यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते याचा अर्थ,शरीरात निर्माण होणाऱ्या
इन्सुलिनचा पूर्णपणे वापर शरीर करू शकते.कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते,पचन
सुधारते, जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू देत नाही, त्यातील अँटी-ऑक्सिडंट
आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरतात आणि हार्मोन्स
संतुलित ठेवण्यास आणि वजन कमी करण्यास सहाय्यक ठरते.
2. वेलची किंवा वेलदोडा
– स्वाद आणि औषधी गुणधर्मांचा संगम
वेलदोडा किंवा वेलची ही औषधी गुणधर्मांनी भरलेली असून, आयुर्वेदात तिला हार्ट टॉनिक म्हटले जाते.इन्सुलिन संवेदनशीलता वाढवून मधुमेह नियंत्रित करण्यास मदत, दुपारच्या जेवणानंतर 1-2 वेलची चावल्याने पचन सुधारते, रक्तदाब संतुलित ठेवते, बद्धकोष्ठतेपासून मुक्तता देते, आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते. (डिटॉक्सिफिकेशन) हे सध्या मी करून पहात आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी दोन वेलदोडे घेतो,त्यामुळे माझे पचनाचा प्रश्न बऱ्या पैकी सुटला असे म्हणू शकतो.
3. लवंग –
इन्सुलिन स्राव वाढवणारे औषधी दाणे
रात्रीच्या
जेवणानंतर 1-2 लवंग खाल्ल्यास, इन्सुलिन स्राव वाढतो, रक्तातील साखरेची पातळी
नियंत्रित राहते, तोंडाचे आरोग्य सुधारते म्हणजे सकाळी उठल्यावर तोंडाला येणारा वास
येत नाही, संसर्गांपासून बचाव करते, पचनाच्या समस्या कमी होतात आणि लवंगातील नायजेरिसिन
नावाचे घटक इन्सुलिन संवेदनशीलता सुधारतात.
समारोप:
जर
तुम्हाला मधुमेह असेल तर योग्य आहार + जीवनशैली + डॉक्टरांनी सांगितलेली औषधे या
तिघांचा समतोल राखणे आवश्यक आहे.दालचिनी, वेलची आणि लवंग हे छोटेसे घटक जरी असले तरी,
त्यांचे नियमित सेवन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि
एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते.फक्त त्याचे अधिक मात्रेत सेवन केल्यास अॅसिडिटी
होऊ शकते. इन्सुलिन संवेदनशीलता या विषयावर एक संपूर्ण ब्लॉग लिहिण्याचे मनांत आहे. कारण इन्सुलिन
संवेदनशीलता म्हणजेच मधुमेह होय.
आजचा
ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट
बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि
आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
✍🏻 लेखक: प्रसाद नातु
(आरोग्य व
जीवनशैली विषयक लेखक)
📝 टीप: हा
लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी
संपर्क करावा.

अत्यंत उपयुक्त माहिती, धन्यवाद प्रसाद
ReplyDeleteमिलिंद निमदेव
दालचिनी,वेलदोडा आणि लवंग हे तिन्ही पदार्थ अत्यंत उपयुक्त आहे. रोगप्रतिकार व्यक्ती सुद्धा वाढवतात आणि प्रकृती चांगली ठेवतात. छान माहिती
ReplyDelete🙏RR
ReplyDelete