Skip to main content

ताटात भात आणि पोळी दोन्ही एकत्र असावे की नाही? 2106

  ब्लॉग नं. 2026/1 72.   दिनांक: 21 जून, 2026.   मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात,रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात एक चर्चा नेहमी रंगते, " मधुमेह ( Diabetes) असेल , तर ताटात भात आणि पोळी दोन्ही एकत्र असावे की नाही ?" आपल्या समाजात हा समज इतका घट्ट रूढ झाला आहे की , रक्तातील साखर वाढण्याच्या भीतीने,अनेक रुग्ण नाईलाजाने या दोन मुख्य पदार्थांपैकी एकाचीच निवड करतात. पण खरंच हा नियम वैद्यकीयदृष्ट्या योग्य आहे का ? चला , आजच्या ब्लॉगमध्ये,आपण यामागील वैज्ञानिक सत्य आणि योग्य पद्धत सविस्तरपणे जाणून घेऊया. सविस्तर: 🛑 समज की गैरसमज ? काय म्हणतात तज्ज्ञ ? ' जीव्हीके हेल्थकेअर ' चे वैद्यकीय संचालक आणि वरिष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ. एन. जी. शास्त्री यांच्या मते , भात आणि पोळी यांचे एकत्र सेवन करणे ही अजिबात समस्या नाही. हा एक मोठा गैरसमज आहे. डॉ. शास्त्री म्हणतात: " भात आणि पोळी हे दोन्ही कर्बोदकांचे ( Carbohydrates) स्रोत आहेत.जेव्हा आपण ते खातो , तेव्हा शरीर ऊर्जेसाठी त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते.खरी समस्या या दोन पदार्थांच्या संयोजनात ( Combinat...

टोमॅटो साॅसमधील भेसळ कशी ओळखाल?

ब्लाॅग सं. 2025/140

दिनांकः 21 मे, 2025.

मित्रांनो,

आजकाल अन्नपदार्थांमध्ये भेसळ ही एक गंभीर समस्या बनली आहे. पदार्थ अधिक चांगले दिसावेत, टिकावेत,आणि चविष्ट लागावेत म्हणून त्यात कृत्रिम रंग,स्वाद आणि रसायनांचा वापर केला जातो.यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम अधिकाधिक वाढले आहेत.याच पार्श्वभूमीवर, मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमधील औषध तज्ज्ञ डॉ. पुष्कर शिरकरखाने यांनी टोमॅटो सॉसमधील भेसळीबद्दल माहिती दिली आहे.आजच्या ब्लॉग मध्ये हिच माहिती मी शेअर करीत आहे.

सविस्तर:

            बाजारात गेलं की, आपल्याला विविध ब्रॅंडचे वेगवेगळे सॉस बघायला मिळतात.बऱ्याच वेळा आपण ज्याला ब्रॅंडेड सॉस विकत घेत असतो.पण काही वेळा          

भेसळयुक्त टोमॅटो सॉसचे धोके:

बनावट टोमॅटो सॉसमध्ये हानिकारक खाद्य रंग,कृत्रिम स्वाद,सिंथेटिक रंग, संरक्षकं आणि रसायने असतात.हे घटक तुमच्या शरीरासाठी,गंभीर आरोग्य समस्यांचे कारण ठरू शकतात.

प्रमुख आरोग्य समस्या:

  • अपचन आणि पोट फुगणे,
  • जुलाब आणि बद्धकोष्ठता,
  • अन्न विषबाधा,
  • दीर्घकाळ वापरल्याने शरीराच्या इतर भागांवर परिणाम होऊ शकतो.

टोमॅटो सॉसमधील भेसळ ओळखण्याची पद्धत:

तुमच्याकडे असलेल्या टोमॅटो सॉसची शुद्धता तपासण्यासाठी,खालील सोपी पद्धत वापरू शकता:

1.       एक ग्लासभर पाण्यात एक चमचा टोमॅटो सॉस टाका.

2.       जर पाणी लवकर लालसर झालं आणि सॉस पटकन विरघळलं,तर सॉसमध्ये भेसळ असण्याची शक्यता आहे.

3.       जर पाणी लालसर होण्यासाठी वेळ घेत असेल,तर सॉस शुद्ध.

सॉस खरेदी करताना घ्यावयाची काळजी:

सॉस किंवा कोणताही अन्नपदार्थ खरेदी करताना खालील गोष्टींची काळजी घ्या:

  • घटक वाचा: पॅकेजिंगवरील घटकांची यादी नीट वाचा.जर आक्षेपार्ह्य वाटले,तर ते सॉस विकत घेऊ नका.     
  • विश्वासार्ह ब्रँडची निवड: स्थानिक किंवा अप्रमाणित ब्रँडऐवजी,विश्वासार्ह्य आणि गुणवत्ता राखणाऱ्या ब्रँडचे उत्पादन निवडा.
  • घाईगडबडीत खरेदी टाळा: सॉस खरेदी करताना नेहमी हुशारीने निवड करा.

सावधगिरी आणि निरोगी जीवनशैली:

भेसळयुक्त पदार्थ टाळण्यासाठी सतर्कता बाळगा.अशा पदार्थांचा वारंवार वापर केल्याने तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात.म्हणूनच शुद्धता तपासून आणि गुणवत्ता राखून अन्नपदार्थांची निवड करणे गरजेचे आहे.

समारोप: :
            टोमॅटो सॉसमधील भेसळ ओळखण्यासाठी वर दिलेली पद्धत अवलंबा आणि तुमच्या आरोग्याचे संरक्षण करा.वर दिलेल्या आरोग्य समस्या उदभवू नयेत यासाठी,योग्य पदार्थ निवडून निरोगी जीवनशैलीकडे पाऊल टाका.

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर जरूर लिहा. पुनः भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

प्रसाद नातु, पुणे.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...