Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

पुरुष आणि महिलांच्या मेंदूंमध्ये काही फरक असतो

ब्लॉग नं. 2025/120.

दिनांक: 21 एप्रिल, 2025. 

मित्रांनो,

 आजकाल महिलांना त्यांच्या बुद्धीवरुन टार्गेट करणं कमी झालं असलं तरी,बऱ्याचदा लोकांच्या सामूहिक गप्पांमध्ये हा टिंगल टवाळीचा विषय असतो.छोट्या छोट्या जोक्स मधून हा विषय चर्चिला जातो. खरं तर असं व्हायला नको.बरेच लोक आपल्या बायकोबद्दल बोलतांना देखिल अशा प्रकारची विधाने करतांना आढळतात की तिला डोकं असतं तर असं केलं असतं कां तिने किंवा अशी वागली असती कां ती? माझी आई लेखिका तर होतीच पण ती 1947-48 ची बी.ए. इन इंग्लिश,अतिशय विद्वान स्त्री. साहजिकच माझ्या मनावर लहानपणा पासून स्त्री ही पुरुषाइतकी किंवा काही वेळेस अधिक बुद्धिमान असू शकते हे आपोआप रुजलं. काल मी सहजच या गोष्टीचा शोध घ्यायचं ठरविलं आणि शोधलं त्याचाच उतारा म्हणजे आजचा ब्लॉग.

सविस्तर:
मी हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला की पुरुष आणि महिलांच्या मेंदूंमध्ये काही फरक असतो आणि त्याबद्दलचे सत्य आणि समज.पुरुष आणि महिलांच्या मेंदूंमध्ये काही फरक असतात, परंतु हे फरक सूक्ष्म स्वरूपाचे असतात आणि जीवशास्त्र, पर्यावरण, व संस्कृतीच्या घटकांनी प्रभावित होतात.पण याचा बुद्धिमत्तेशी काही ही संबंध नसतो. यामधील महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा घेऊया.

जैविक आणि संरचनात्मक फरक:

1. मेंदूचा आकार:

पुरुषांचे मेंदू महिलांच्या मेंदूंपेक्षा सुमारे 10% मोठे असतात.कारण पुरूषांचे डोके बहुतांशी स्त्रियांपेक्षा मोठे असते.पण याचा संबंध बुद्धिमत्तेशी नसतो.

2. राखाडी आणि पांढरे पदार्थ:

महिलांच्या मेंदूमध्ये जास्त प्रमाणात राखाडी पदार्थ असतो, जो माहिती प्रक्रियेवर परिणाम करतो. पुरुषांच्या मेंदूमध्ये पांढऱ्या पदार्थांचे प्रमाण अधिक असते, जे मेंदूच्या विविध भागांमधील संवाद साधण्यासाठी उपयुक्त ठरते.

3. कॉर्पस कॅलोसम:

मेंदूच्या दोन गोलार्धांना जोडणारी ही रचना महिलांमध्ये तुलनेने मोठी असते.त्यामुळे आंतर-गोलार्ध संवाद अधिक प्रभावी होतो.

4. हिप्पोकॅम्पस:

स्मृती आणि भावनिक नियमनासाठी महत्त्वाचा मानला जाणारा हिप्पोकॅम्पस महिलांमध्ये तुलनेने मोठा असतो.

कार्यात्मक फरक:

1. भाषा प्रक्रिया:

महिला भाषेशी संबंधित कार्यांसाठी दोन्ही गोलार्धांचा वापर करतात, तर पुरुष मुख्यतः डाव्या गोलार्धावर अवलंबून असतात.

2. भावना:

महिलांच्या मेंदूमध्ये भावना आणि सामाजिक प्रक्रियेशी संबंधित क्षेत्रांमध्ये मजबूत संबंध आढळतात. यामुळे त्या अधिक सहानुभूतीशील आणि सामाजिकदृष्ट्या अंतर्ज्ञानी बनतात.

3. अवकाशीय कौशल्ये:

पुरुष अवकाशीय नेव्हिगेशन आणि दृष्टिकोन आवश्यक असलेल्या कामांमध्ये अधिक प्रवीण असतात.मॅप आणि दिशा यासंबंधी पुरूषांचे ज्ञान अधिक चांगले दिसून येते कारण,त्याचा संबंध पॅरिएटल कॉर्टेक्समधील फरकांशी असतो.

हार्मोनल प्रभाव:

टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन सारखे लैंगिक संप्रेरक मेंदूच्या विकासावर आणि कार्यावर परिणाम करतात. यामुळे वर्तन, आकलनशक्ती आणि भावनिक प्रतिसादांवर फरक पडतो.

सांस्कृतिक आणि पर्यावरणीय घटक:

समाजीकरण आणि सांस्कृतिक अपेक्षा यांचा क्षमता आणि वर्तनातील फरकांवर मोठा प्रभाव पडतो. लहान जैविक फरक सांस्कृतिक प्रभावांमुळे मोठे दिसू शकतात.

समारोप:

पुरुष आणि महिलांच्या मेंदूंमध्ये काही फरक आहेत, परंतु हे फरक श्रेष्ठता किंवा कनिष्ठता दर्शवत नाहीत. पुरुष आणि महिला दोघांचेही मेंदू अत्यंत अनुकूलनीय असतात, आणि वैयक्तिक फरक लिंग-आधारित फरकांपेक्षा अधिक महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या क्षमता आणि वैशिष्ट्यांचा आदर करणे गरजेचे आहे.तसेच प्रत्येक व्यक्ति मग ती महिला असो वा पुरुष,त्यांना ज्या प्रकारचे exposure मिळते,त्यावर अवलंबून असतं. याचा अनुभव मला नोकरीच्या काळात आला.मी जवळपास 14 वर्षे फॉरेन एक्स्चेंजमध्ये काम केलं म्हटल्यावर, फॉरेन एक्स्चेंजमधील माझं ज्ञान हे माझ्या सीनियरपेक्षा (ज्याने कधीही काम केलेले नाही) अधिक असणार हे अधोरेखित आहे. त्यामुळे माझा मेंदू ज्यास्त तल्लख आहे असा होतं नाही.म्हणून ज्याला ज्या क्षेत्रात काम करायची संधि मिळत असते,तिथे तो प्रगत होतो,मग स्त्री असो वा पुरुष. इथे मेंदूचा अर्थाअर्थी काही संबंध नसतो.    

मला इथे हे अपेक्षित आहे की मग काही लोक विद्वान आणि अगदीच ढ कां असतात असं कुणी विचारेल,ते देखिल जाणून घ्यायला हवं.     

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 

प्रसाद नातु,पुणे.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...