Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

मानदुखीची कारणे आणि उपाय

ब्लॉग नं 2024/280

दिनांक :- 20 नोव्हेंबर, 2024.

मित्रांनो,

            तुमचा दिवसभराचा सर्व क्षीण, दगदग शमविण्याचा एकमेव उपाय म्हणजे रात्रीची शांत झोप.ही शांत झोप अनेक गोष्टींवर अवलंबून असते. त्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे मानेखाली योग्य उशी (Pillow) असणे महत्वाचे आहे.मानदुखीचे एक प्रमुख कारण म्हणजे योग्य उशी नसणे. आज आपण याबद्दल जाणून घेऊ या.         

सविस्तर

आपल्या झोपेचा आरामदायी अनुभव बहुतेक वेळा आपल्या उशीवर अवलंबून असतो. परंतु, चुकीची उशी किंवा तिचा अयोग्य उपयोग मानदुखीचे कारण ठरू शकतो. मानदुखीचा त्रास झोपेच्या स्थितीवर आणि उशीच्या योग्यतेवर अवलंबून असतो. परंतु, उशीशिवाय देखील इतर अनेक कारणे आहेत,ज्यामुळे मान दुखू शकते. चला या समस्येचे मूळ कारणे आणि उपाय समजून घेऊया. 

उशीमुळे मानदुखी का होते? 

1. चुकीचा आकार व जाडी: उशी फार जास्त जाड किंवा फार पातळ असल्यास मान आणि पाठीचा कणा अयोग्य स्थितीत राहतो, ज्यामुळे स्नायूंवर ताण येतो. आणि त्यामुळे मन दुखू शकते.   

2. साहित्याची अयोग्यता:   उशी बनवितांना त्यात कुठले साहित्य वापरले आहे,हे देखिल महत्वाचे आहे.   कठीण किंवा फार मऊ उशी झोपताना योग्य आधार देत नाही. 

3. झोपण्याची पद्धत:  झोपतांना पाठीवर किंवा उजव्या/डाव्या कुशीवर झोपावे.कारण, पालथे म्हणजेच पोटावर झोपल्यास मान वेगळ्या कोनात वळते, ज्यामुळे स्नायू ताणले जातात.त्यामुळे देखिल मान दुखू शकते.    

मानदुखीची इतर कारणे: 

1. दीर्घ काळ संगणक किंवा मोबाइलचा वापर: सतत मान झुकवून काम केल्यामुळे "टेक नेक" नावाचा त्रास होतो.जो प्रामुख्याने दीर्घ काळ पर्यन्त संगणक किंवा मोबाइलचा वापर केल्याने होतो.    

2. बसण्याची अयोग्य पद्धत: काम करताना किंवा प्रवासात चुकीच्या स्थितीत बसल्यास मान दुखायला लागते.सतत समोर पाहावे लागल्याने देखिल मन आखडते म्हणून मधून मधून डाव्या आणि उजव्या बाजूला वळून पाहणे गरजेचे आहे. विशेषतः कार चालवितांना हे घडते,त्यामुळे मधून मधून रस्त्यावर गर्दी नसतांना आजूबाजूला पाहणे आवश्यक आहे. बसचे ड्रायव्हरकडे तुम्ही लक्षपूर्वक पाहिल्यास ते तसे करतात हे तुमच्या लक्षात येऊ शकते.            

3. स्नायूंवर ताण: ताणतणावामुळे स्नायू कडक होतात, ज्यामुळे मानदुखी होते. 

4. चुकीचा व्यायाम: चुकीच्या प्रकारे व्यायाम केल्याने मानेच्या स्नायूंवर अनावश्यक भार पडतो. 

5. आजार किंवा इजा: आर्थ्रायटिस, स्पॉन्डिलायटिस किंवा मानेवर झालेली जुनी दुखापत देखील मानदुखीचे कारण असते. 

मानदुखी दूर करण्यासाठी उपाय: 

1. योग्य उशीची निवड करा:    झोपतांना नेहमी उशी मध्यम उंचीची व मऊसर निवडा, जी तुमच्या मानेला आणि पाठीला योग्य आधार देईल.मेमरी फोमची उशी चांगला पर्याय असू शकतो. 

2. योग्य स्थितीत झोप घ्या:  झोपतांना पाठीवर झोपणे उत्तम मानले जाते.किंवा तसे शक्य नसल्यास म्हणजे तुम्हाला झोप येत नसल्यास डाव्या किंवा उजव्या कुशीवर (शक्यतो,पचनाच्या दृष्टीने डाव्या कुशीवर) झोपणे योग्य. पाठीच्या कणाच्या नैसर्गिक वळणाला आधार देणारी उशी वापरा. 

3. स्नायू शिथिल करण्यासाठी व्यायाम:  रोज हलके मान वळवण्याचे व्यायाम करा.मान आणि खांद्यांच्या स्नायूंना ताण देऊन शिथिलता आणा. 

4. संगणक व मोबाइलचा योग्य वापर:  स्क्रीन डोळ्यांच्या समोर ठेवा, ज्यामुळे मान झुकवण्याची गरज पडणार नाही.दर तासाला 5-10 मिनिटांचा ब्रेक घ्या. 

5. ताण कमी करा:  योगसाधना आणि ध्यानधारणा यांचा सराव करा. स्नायू सैल करण्यासाठी गरम पाण्याचा शेक किंवा मसाज घ्या. 

6. डॉक्टरांचा सल्ला घ्या:   जर मानदुखी दीर्घकाळ राहत असेल तर तात्काळ तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

समारोप:

संपूर्ण आरोग्यासाठी योग्य झोपेचे महत्त्व फार आहे. चांगल्या झोपेसाठी योग्य उशी निवडणे आणि मानेची काळजी घेणे गरजेचे आहे. मानदुखी टाळण्यासाठी उशीबरोबरच आपली बसण्याची स्थिती, स्क्रीनचा वापर, आणि व्यायामाचे योग्य नियोजन करा. तुमची झोप चांगली झाली की तुमचा दिवसही चांगला जाईल. तुमच्या झोपेच्या सवयी सुधारण्यासाठी आजच योग्य ते बदल करा आणि मानदुखीमुक्त जीवनाचा आनंद घ्या.

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

            महाराष्ट्रात आज मतदान आहे, प्रत्येकाने मतदान करणे हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे,म्हणून मी नाही केलं तर एकट्याने काय फरक पडतो,असा विचार करू नका. कारण ही संधी पाच वर्षातून एकदाच मिळते.        

प्रसाद नातु,पुणे.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...