Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

मधुमेह हात पाय पसरवतोय

Blog No 2024/225.

दिनांक:24,सप्टेंबर, 2024 

मित्रांनो,

            मागील वर्षी 321 आणि यावर्षी 225 ब्लॉग्ज मी लिहिले.पण एक विषय असा आहे की मी त्या विषयावर तीन ते चार वेळा ब्लॉग लिहिला आणि आज पुनः 5 व्या वेळेस लिहितो आहे,कारण तो तुमच्या सगळ्यांच्या आरोग्याचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे.मी रोज ब्लॉग लिहिण्यासाठी काही पोस्ट म्हणा काही चॅनल चाळत असतो,त्या सर्वात देखिल मधुमेह या विषयावर जास्तीतजास्त पोस्ट असतात,याला कारण मधुमेहाचे वाढते प्रमाण आणि लोकांचे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष न देणे कारणीभूत आहे. आज पुनः मधुमेह या विषयावर ब्लॉग लिहीत आहे.

सविस्तर:

            इतक्यात माझ्या संबंधातील दोघांनी मधुमेह झाला आहे कां ते तपासण्यासाठीची,HBA1c ही शरीरातील तिमाही सरासरी शुगरची तपासणी करणारी टेस्ट केली. आणि हे प्रमाण 7 च्यावर म्हणजे मधुमेह झाला आहे हे दर्शविणारे होते.पण त्यांची Fasting म्हणजे सकाळी उठल्याबरोबर घेतलेली शुगर आणि जेवणानंतर 2 तासांनी घेतलेली शुगर नॉर्मल होती. म्हणून ते HBA1c कडे दुर्लक्ष करून मला मधुमेह नाही असे घोषित करते झाले. अपोलो लॅबोरटरीजच्या HBA1c टेस्टिंग प्रमाणे मधुमेहाची पातळी आणि त्यावरचा अभिप्राय असा आहे.

 वेगवेगळ्या लॅबोरटरीजच्या नुसार आंकडे थोडे इकडे तिकडे असू शकतात.  

1.       HBA1c 5.7 च्या खाली मधुमेह नाही.

2.       HBA1c 5.7 ते 6.4 मधुमेह पूर्व (म्हणजे होऊ शकतो)

3.       HBA1c 6.5 आणि त्याच्यावर म्हणजे मधुमेही

मधुमेहीसाठी  

4.       HBA1c 6 ते 7 म्हणजे Excellent Control

5.       HBA1c 7 ते 8 Fair to Good Control

6.       HBA1c 8 ते 10 Unsatisfactory Control

7.       HBA1c 10 च्या पुढे Poor Control

            याचा अर्थ हाच आहे की ज्याची शुगर लेव्हल 5.7 च्या खाली आहे, तो मधुमेही नाही,तो सामान्य म्हणता येईल. यातील नंबर 4 ते 7 जे मधुमेही आहेत आणि जे गोळ्या आणि/किंवा इंसुलिन घेतात. त्यानंतरची त्यांची तीन महिन्यांची सरासरी शुगर लेव्हल आहे.ते नंबर जे मधुमेही नाही त्यांच्यासाठी लागू नाही.

            हे सगळे द्यायचे कारण हे की भारतात जेवढे निदान झालेले मधुमेही आहेत, त्यापेक्षा हा आंकडा किती तरी जास्त असू शकतो असे वारंवार माझ्या वाचनात आले आहे.आजकाल मधुमेह होण्यासाठी अमुक वय झालं तर होऊ शकतो असं राहिलेले नाही. म्हणून खाली दिलेली लक्षणे तुमच्यात आढळून येत आहेत कां बघा. कारण मधुमेह हा सायलंट किलर आहे,त्यावर नियंत्रण ठेवले नाही तर तो एक एक अवयव निकामी करत जातो. डायबिटीजची (मधुमेह) लक्षणे दोन प्रमुख प्रकारांमध्ये विभागली जातात: टाइप 1 डायबिटीज आणि टाइप 2 डायबिटीज, आणि त्यातील लक्षणे काही प्रमाणात वेगवेगळी असू शकतात. दोन्ही प्रकारात रक्तातील साखर (ब्लड शुगर) वाढते, ज्यामुळे खालील सामान्य लक्षणे आढळतात:

 सामान्य लक्षणे (दोन्ही प्रकारांसाठी):

1. खूप तहान लागणे (Polydipsia) - वारंवार तहान लागणे, जरी भरपूर पाणी प्यायलं तरी.

2. वारंवार लघवीला जाणे (Polyuria) - रात्रीसह वारंवार लघवीला लागणे.

3. भूक वाढणे (Polyphagia) - जास्त भूक लागणे.

4. अतिशय थकवा (Fatigue) - खूपच थकल्यासारखं वाटणे, ऊर्जेची कमतरता.

5. वजन कमी होणे - कारणाशिवाय वजन घटणे, विशेषत: टाइप 1 डायबिटीजमध्ये.

6. अंधुक दृष्टि (Blurred Vision) - डोळ्यांवर परिणाम होऊन दृष्टी अस्पष्ट होणे.

7. हळू भरून येणाऱ्या जखमा - त्वचेवरील जखमा, चिरा किंवा संसर्ग हळू भरून येणे.

8. वारंवार संसर्ग होणे - मूत्रपिंडाचे किंवा त्वचेचे संसर्ग वारंवार होणे.

टाइप 1 डायबिटीजचे लक्षणे:

- लहान वयात किंवा तरुणांमध्ये सामान्यतः आढळतात.

- लक्षणे अचानक सुरू होतात.

- वजन अचानक आणि जास्त प्रमाणात कमी होऊ शकते.  

टाइप 2 डायबिटीजचे लक्षणे:

- सामान्यतः प्रौढांमध्ये किंवा वृद्धांमध्ये आढळतात.

- लक्षणे हळूहळू विकसित होतात.

- वजन कमी होण्याऐवजी वजन वाढलेले किंवा स्थिर राहते.

लक्षणांमध्ये विशेष:

- टाइप 2 डायबिटीजमध्ये काहींना प्रारंभिक लक्षणे दिसत नाहीत, म्हणून हा आजार हळूहळू आणि अनियंत्रितपणे वाढतो.

समारोप:

            यापैकी कुठलीही लक्षणं आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क करा.कारण वेळीच इलाज केलात तर मधुमेह नियंत्रण (औषधे आणि आहाराचे योग्य नियोजन करून ) शक्य होऊ शकते.त्याला जास्त वाढू देऊ नका.अन्यथा दृष्टी दोष, किडनीचे आजार,उच्च रक्तदाब आदि रोग उद्भवू शकतात. तेव्हा वेळीच काळजी घ्या, काळजी करू नका.टाइप 1 हा आनुवंशिक असू शकतो आणि टाइप 2 हा ताण,तणाव,काळजी इत्यादि मुळे होतो.

            तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु, पुणे


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...