Skip to main content

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

2024-25 चा अर्थसंकल्प 2024-25 Annual Budget

Blog No. 2024/ 162.  

Date: 24th ,July 2024

मित्रांनो,

काल 23 जुलै ला वर्ष 2024-25  चा पूर्ण अर्थसंकल्प, अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारामन यांनी संसदेपुढे सादर केला. ज्यामध्ये सर्वसमावेशक वाढीवर आणि विकासावर भर दिला आहे. येथे काही मुख्य मुद्दे सादर करत आहे.

सविस्तर:  

*आर्थिक वाढ आणि वित्तीय धोरण:2024-25 आर्थिक वर्षासाठी GDP वाढ 7.3% राहण्याचा अंदाज आहे, जो RBI च्या सुधारित अंदाजाशी सुसंगत आहे

*वित्तीय तूट GDP च्या 5.1% पर्यंत ठेवण्याचा अंदाज आहे, 2025-26 पर्यंत 4.5% पेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट

*भांडवली आणि पायाभूत सुविधा:भांडवली खर्चात 11.1% वाढ, 11.1 लाख कोटी रुपये, GDP च्या 3.4%

*पायाभूत सुविधा विकासासाठी मोठे गुंतवणूक, ज्यामध्ये बंदर कनेक्टिव्हिटी आणि पर्यटन पायाभूत सुविधा प्रकल्प

*कर:नवीन कर प्रणाली अंतर्गत 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करदायित्व नाही. स्टँडर्ड डिडक्शन मधे रु.  50,000/- वरुन रु.75,000/-  जुन्या कर प्रणाली अंतर्गत काही बदल नाहीत.   

*विद्यमान घरेलू कंपन्यांसाठी कॉर्पोरेट कर 22% आणि नवीन उत्पादन कंपन्यांसाठी 15%

*सामाजिक कल्याण आणि समावेश:गरीब, महिला, युवक आणि शेतकऱ्यांना उन्नत करण्यावर भर.

*11.8 कोटी शेतकऱ्यांसाठी PM-KISAN SAMMAN योजना अंतर्गत आर्थिक मदत आणि 4 कोटी शेतकऱ्यांसाठी PM Fasal Bima योजना अंतर्गत पिक विमा

*30 कोटी महिला उद्योजकांसाठी मुद्रा योजना कर्ज वितरण आणि STEM कोर्सेसमध्ये 43% महिला नामांकन

*PM Awas Yojana अंतर्गत पुढील पाच वर्षांत 2 कोटी घरे बांधण्याचे लक्ष्य

*आरोग्य आणि शिक्षण:सर्व आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आयुष्मान     भारत योजना विस्तारित

* 9.14 वयोगटातील मुलींसाठी मोफत गर्भाशय मुखाचा कर्करोग लसीकरण आणि   अधिक वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना

*पर्यावरणीय उपक्रम:रूफटॉप सोलरायझेशन प्रकल्पाचा उद्देश 1 कोटी घरांना दरमहा 300 युनिट्स पर्यंत मोफत वीज पुरवणे

*विविध कृषी-हवामान क्षेत्रांमध्ये नॅनो-DAP चा वापर विस्तारित.

* मुद्रा लोनची मर्यादा रु. 10.00 लाखावरुन रु. 20.00 पर्यन्त वाढविण्यात आली आहे.

*शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स हा काही असेट्सवर 20% करण्यात आला आहे.

* लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स 10.00% वरुन 12.5% एवढा करण्यात आला आहे.    

*संरक्षणावरचा खर्च 6.21 लाख कोटी एवढा.     

*आरोग्यावर 90,958 कोटी एवढे पैसे राखीव.

*शिक्षणासाठी 1.48 लाख कोटी ची तरतूद.    

समारोप:

            या वर्षीच्या अर्थसंकल्पातील हे काही महत्वाचे मुद्दे म्हणता येतील. नोकरदारांना फार मोठा दिलासा यातून नाही.स्वतःचे घर घेणाऱ्यास यातून काही प्रलोभन दिसत नाही.एकंदरीत बचत किंवा गुंतवणूक करण्यासाठीचे कुठले प्रलोभन या अर्थसंकल्पात नाही. बिहार आणि आंध्र प्रदेश यांना अपेक्षेप्रमाणे झुकते माप देणारा अर्थसंकल्प. लोकांनी बाजारात जाऊन खरेदी करावी,पैसा खर्च करावा आणि सरकारचा GST वाढवावा. शेअर बाजारातील उत्पन्नावरचा कर वाढवून तिथेही सरकारसाठी पैसे जमा करणे हाच अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारामन यांचा इरादा दिसतो आहे.पूर्ण बजेट वाचून झाल्यावर सविस्तर लिहिन.        

            तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु, पुणे           

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...