Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणे:

Blog No. 2024/ 107.  

Date: 27th,May 2024

मित्रांनो,

            शरीराच्या वाढीसच नव्हे तर शरीर तंदुरुस्त राहाण्यासाठी विविध व्हिटॅमिन्सची गरज असते.त्यात महत्वाचे दोन,एक व्हिटॅमिन बी 12 आणि दुसरे व्हिटॅमिन D3. त्यांची कमतरता असल्यास जे परिणाम शरीरावर होतात,त्याची किती जणांना माहिती आहे.अनेक जण मी स्वतः बघितलेत की आपला पाय धरून बसलेले असतात किंवा चालतांना माझा तोल जातो असं वाटतं रे म्हणून फिरायला जातं नाही.त्यांना माहित नसतं की हे व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेने होऊ शकतं.आजकाल 40 च्यावर वय असलेल्यांनी तर,व्हिटॅमिन बी 12 आणि व्हिटॅमिन D3 ची टेस्ट करायला हवी.पण तरुण लोकांमध्ये देखिल ही कमतरता आढळून येते.आजचा ब्लॉग याच विषयावर.                     

सविस्तर:-

            व्हिटॅमिन बी 12 अनेक पदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात आढळते,परंतु तरी देखिल त्याची कमतरता आणि अपुरेपणा खूप लोकांमध्ये आढळून येते आणि ही गोष्ट सामान्य झाली आहे.तज्ञांच्या मते, व्हिटॅमिन बी 12 हे एक आवश्यक पोषक तत्व आहे,जे आपल्या शरीराला डीएनए संश्लेषण,ऊर्जा उत्पादन आणि मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या  (central nervous system) कार्यासाठी आवश्यक असते.पण होतं काय की,आपल्या शरीराची अन्नातून B12 शोषण्याची समर्थता वयोमानानुसार कमी होत जाते,ज्यामुळे वृद्ध आणि प्रौढांमध्ये, विशेषत: 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये,पायांवर व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्याची विविध चिन्हे आणि लक्षणे आढळून येतात.

            डॉक्टर सांगतात की,व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असलेल्या 40 वर्षाच्या वरील पुरुषांमध्ये, विशेषत: रात्री ते विश्रांती घेत असताना बधीरपणा किंवा पायांमध्ये पिन आणि सुयां टोचल्याच्या वेदना जाणवतात.हे निरोगी चेतापेशींसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे मज्जातंतूंवर झालेल्या दुष्परिणामामुळे असू शकते..

पाय आणि पायांमधील स्नायू कमकुवत होणे:-

            व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेच्या चेतावणी लक्षणांपैकी एक म्हणजे अशक्तपणा आणि थकवा जाणवणे, विशेषत: पायांमध्ये अशक्तपणा जाणवतो.ज्याचा दैनंदिन जीवनावर आणि एकूणच जिवनमानावर प्रतिकूल  परिणाम होतो.नीट चालता येत नाही.जर तुम्हाला पाऊले टाकण्यास किंवा शरीराचे संतुलन राखण्यात अडचण येत असेल,तर हे व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचे लक्षण असू शकते.तज्ञांच्या मते,असे घडते कारण जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे,स्नायूंच्या हालचालींमध्ये समन्वय साधणाऱ्या मज्जातंतूंवर परिणाम होतो आणि समन्वयाच्या समस्या निर्माण होतात.यात त्वचेचा रंग बदलणे हे देखिल होऊ शकते.  

            डॉक्टर म्हणतात की व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे त्वचा फिकट आणि पिवळी पडते, विशेषत: तुमचे पाय आणि पाऊले यांचा रंग बदलत असतो.जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शरीर पुरेसे लाल रक्तपेशी तयार करू शकत नाही,तेव्हा त्वचेच्या रंगात हे बदल घडून येतात.लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये व्हिटॅमिन बी12 महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने, यामुळे मेगालोब्लास्टिक ॲनिमिया होतो, ज्याचा कावीळशी संबंध असतो. यात हात किंवा पायांना मुंग्या येणे याचा देखिल समावेश होतो.  

            व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे हात किंवा पायांमध्ये पिन आणि सुया टोचल्यासारखे जाणवते. हे लक्षण जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे उद्भवते.कारण तुमच्या मज्जासंस्थेमध्ये जीवनसत्त्वे महत्त्वाची भूमिका बजावतात.तज्ञांच्या मते, त्याच्या कमतरतेमुळे लोकांना मज्जातंतू वहन समस्या किंवा मज्जातंतूंचे नुकसान होऊ शकते.

            मज्जासंस्थेमध्ये, व्हिटॅमिन बी 12 एक पदार्थ तयार करते - मायलिन जे मज्जातंतूंचे संरक्षण करते आणि त्यांना संवेदना प्रसारित करण्यास मदत करते.पुरेशा मायलिनशिवाय, मज्जातंतूंना अधिक नुकसान होण्याची शक्यता असते.जसे की सूज आणि जळजळ.पाय आणि पावलांमद्धे सूज आणि जळजळ देखील व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचे कारण असू शकते.

            तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,सांध्यातील कमकुवतपणा शरीरातील द्रवपदार्थाच्या गतिमानतेतील असंतुलनाच्या कमतरतेमुळे उद्भवतो.व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे सांध्यामध्ये वेदना होतात,ज्यामुळे सांध्यामध्ये अस्वस्थता आणि जळजळ होते. त्यामुळे अनेकदा जडपणा, सूज आणि हालचाली मर्यादित होतात. व्हिटॅमिन बी 12 हा संधिवातासाठी थेट उपचार नसला तरी, संपूर्ण आरोग्यास सहाय्यभूत भूमिका बजावते आणि काही लक्षणे कमी करण्यास,व्हिटॅमिन बी 12 ची मदत होऊ शकते.

उपचार आणि प्रतिबंध

            उपचार आणि प्रतिबंध पहाण्याआधी,शरीरात व्हिटॅमिन बी 12 किती असावे हे बघू.सामान्यपणे 160 ते 950 पिकोग्राम प्रति मिलीलीटर (pg/mL), किंवा 118 ते 701 पिकोमोल्स प्रति लिटर (pmol/L) आहेत. वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये सामान्य मूल्य किंचित बदलू शकतात. व्हिटॅमिन बी 12 ची टेस्ट pathology लॅब मध्ये केल्यास हे प्रमाण माहित होते.   

            डॉक्टरांचे म्हणणे आहे की तुम्हाला आहारातील स्त्रोतांमधून,पुरेसे व्हिटॅमिन बी 12 मिळू शकते.आणि जे करू शकत नाहीत,त्यांच्यासाठी तज्ञ B12 पूरक आहाराची शिफारस करू शकतात.B12 च्या जिभेखाली विरघळणाऱ्या सबलिंग्युअल गोळ्या किंवा इंजेक्शनच्या स्वरूपात घेतले जाऊ शकतात.ज्यांना व्हिटॅमिन बी 12 शोषण्यात अडचण येते,त्यांना त्यांच्या कमतरतेवर उपचार करण्यासाठी व्हिटॅमिनच्या शॉट्सची आवश्यकता असू शकते.

समारोप:-

            मित्रांनो, व्हिटॅमिन बी 12 ची टेस्ट pathology लॅब मध्ये जाऊन करून घ्या,म्हटलं की बरेच लोक अगदी नातेवाईक सुद्धा म्हणतात,याला पैसे लागतील.बरोबर आहे पैसे लागतील. पण याहून एखादा गंभीर आजार झाला तर,हॉस्पिटलमध्ये जाऊन आपण पैसे खर्च करतोच ना.मग एकदा ही टेस्ट करून घ्यायची.आणि कमतरता निघाली तर त्यावर उपाय आहेच.म्हणून वर दिलेल्या पैकी कुठलीही गोष्ट होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि डॉक्टरनी म्हटल्यास टेस्ट करून घ्या. कारण Prevention is always better than cure असं म्हटलं जातं ते उगीच नाही.  

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु, पुणे.

image courtesy @femina

Comments

  1. उपयोगी माहिती 🙏

    ReplyDelete
  2. सर्वांना आवश्यक माहिती

    ReplyDelete
  3. खूप छान आणि आरोग्यास उपयुक्त माहिती आहे. धन्यवाद

    ReplyDelete
  4. Important useful information

    ReplyDelete
  5. अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...