Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

नेमेची येतो मग पावसाळा

 Blog No.2023/197      

Date:-29th ,July, 2023.

 

मित्रांनो,


            मान्सून हा आधीपासून लहरीच होता.पण तो बदलला केंव्हा हे कळलंच नाही. माझ्या लहानपणी अगदी 7 जूनला मृग नक्षत्रावर त्याचं आगमन होत असे.मला आठवतंय पावसाळ्याच्या सुरुवातीला विजांच्या लखलखाटात आणि ढगांच्या गडगडाटात त्याचं आगमन व्हायचं.सुरुवातीला संध्याकाळी मग दुपारी मग सकाळी आणि मग दिवसभर यायचा.”श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन्हं पडे.” असं खरोखर होतं असे. कविता असली तरी ते वास्तव देखिल होतं.पण आता सगळं तंत्र बिघडलं आहे. आज त्यामुळे पावसावर हा ब्लॉग लिहिला.

 प्रास्ताविक

            पाऊस जून आणि जुलैचा पहिला आठवडा, असा काही लपंडाव खेळला आणि “पावसा पावसा यो रे यो रे” किंवा अगदी “येरे येरे पावसा तुला देतो पैसा” म्हणावेसे वाटत होतं.शेवटी तो आला धसमुसळ्या सारखा की हा पहिला पाऊस वाटला नाही. “आला पाऊस मातीच्या वासात गं, मोती गुंफीत मोकळ्या केसात गं” असं म्हणावेसे वाटू नये अशा थाटात आला.”आला आला वारा संगी पावसाच्या धारा, पाठवणी करा निघाल्या सासुरा.” असं म्हणणे जड वाटू लागलं. कारण कुठे दरड कोसळल्यामुळे वाहतूक बंद, तर कुठे पाणीच पाणी झाले म्हणून वाहतूक बंद.

            पाऊस उशिरा आल्यामुळे श्रावण लवकर आल्यासारख वाटतय, लगेच काही लोक म्हणतील श्रावण नाही अधिक श्रावण आला आहे. पण श्रावण आहेच.तर श्रावण म्हटलं अन मला आठवलं “श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धारा” अन रिमझिम वरुनच आठवलं “रिमझिम पाऊस पडे सारखा यामुनेला ही पुर चढे पाणीच पाणी चहूकडे ग बाई गेला मोहन कुणीकडे” आजकाल रस्त्यांची यमुना होते.अन शहरात पाणीच पाणी चहूकडे अशी अवस्था होते.

            रिमझिमवर मराठीतच गाणी आहेत असं नाही.हिन्दीत तर रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मन”, झिलमिल सितारोका आंगन होगा रिमझिम बरसता सावन होगा”, रिमझिम रिमझिम रुणुझुणू भीगी भीगी ऋतमे तुम हम हम तुम चलते है”,“रिमझिम के गीत सावन गाए गाए भीगी भीगी रातोमे” ही गाणी आली गीतकारांचा आणखी एक आवडता शब्द त्यातले “एक लडकी भीगी भागीसी सोती रातोमे जागी से”, “भीगी भीगी रातोमे मिठी मिठी बातोमे ऐसी बरसातमे कैसा लगता है”, तर अदनान सामी “भीगी भीगी रातोमे तुम आओ ना” म्हणून बोलावत असे.”हम तुम दोनो साथमे भीग जाएंगे बरसातमे” या गाण्यातला हा देखिल एक आवडता शब्द “जिंदगी भर नही भुलेगी वो बरसात की रात”, सावन हा देखिल परवलीचा शब्द जसं “सावन का महिना पवन करे सोर” “सावन के झुले पडे तुम चले आओ” सावन आये या ना आये,जिया जब झुमे सावन है”, “सावन का महिना आ गया हो जिना नही आता जिन लोगो को”. “अबके सजन सावनमे आग लगेगी बदन मे”. तसच टीप टीप चं   “टीप टीप टीप टीप बारिश शूरु हो गई”. किंवा “टीप टीप बरसा पानी,पानीने आग लगा दी.”

            मित्रांनो,हे सारं आठवायचं कारण असं की रोमॅंटिक होता पावसाळा. शेतकरी आनंदित असायचा.चित्रपट हे शेवटी खूप सार वास्तवाचं प्रतिबिंब असतं. आज काल पहिलाच पाऊस अंगावर शहारे तर आणतोच पण काटे आणतोच. पहिल्याच पावसात 50 ते 60% धरणं भरतात,नदीला पुर येतो, गावाकडे पिकं आणि शहराकडे घर पाण्याखाली जातात.यालाच विकास म्हणायचं कां?

            मुंबईहून नागपूरला 7.30 तासात जाण्यासाठी समृद्धिमार्ग तयार होतो. “समृद्धिमार्ग” आपण सुरु केला म्हणून काही जण पाठ थोपटून घेतात आणि काही जण आपल्याला “समृद्धिमार्गाला” हिरवा झेंडा दाखवता आला नाही म्हणून त्याला शापित म्हणतात. पण मुंबई पासून 100-150 किमी वरील तळोघ ग्रामपंचायतीतील जूनवणे वाडीतील वनिता भगत या गर्भवतीचा गावाहून जिथे आरोग्य मिळेल तिथे जायला रस्ता नाही. चिखलात, खाचखळग्यातून डोलीतून दवाखान्यात नेलं तर दवाखाना आहे पण डॉक्टर नाही. शेवटी जिल्हा शासकीय मध्ये उपचार झाले खरे पण बाळ आणि बाळंतीन दोघही मृत्यू पावले.ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे.

            स्वातंत्र्याच्या 75 वर्षात आपण अगदी प्राथमिक सुविधा गरजुपर्यंत पोहोचवू शकलो नसू तर विकास झाला म्हणता येईल कां? मित्रांनो, मोठ मोठे रोड, शहरांना जोडणे ही सारी विकासाची दार आहेत मी मानतो. पण त्याचं वेळेस हे असंही घडत त्याचं काय? पण एक विचार मनात येतो याला काय फक्त सरकार जबाबदार आहे कां? आपण सारेच जबाबदार आहोत. पाच वर्षासाठी निवडून देतांना मला काही देणारे सरकार पाहिजे आहे.गावाला रस्ते नकोत,पाणी नकोय, आरोग्यसेवा नकोय. मला पाहिजे रोजगार,नाही तोही नकोय, मला सगळं फुकट पाहिजे आहे.अगदी बारा महिने जेवण फुकट हवे आहे. याला काही उपाय आहे असं मला वाटतं नाही. “फुकट” ही मानसिकता संपून जेव्हा गावासाठी,तालुक्यासाठी, जिल्हयासाठी,राज्यासाठी आणि शेवटी देशासाठी काही देण्याचं वचन देणाऱ्याला आपण निवडून दिलं तर हे संपेल. अन्यथा पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरूच राहील.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु,पुणे

Comments

  1. पावसाचे वर्णन व त्या वरील गाण्याचे संदर्भ उत्तम . शेवटी जो संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे तो खरंच खूप छान आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...