Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98       

Date: 21st, April 2023. 


मित्रांनो,

               आज अक्षय्यतृतीया आहे.अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो.साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही.असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.

 प्रास्ताविक

               माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात्रा करून पुण्य मिळवायला पहातात.गंगेत जाऊन स्नान केल्याने सर्व पापे धुतली गेली असे म्हणतात.अरे इतकी भीती वाटते ना मग पाप कर्म करू नका ना.

 आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

हे सर्व बघितले की मला आठवतो तो संत चोखोबा यांचा अभंग, जो पंडित जितेंद्र अभिक्षेकी यांनी गायला. तुमच्या पैकी अनेकांनी हा अभंग ऐकला असेल कारण आकाशवाणीवर भक्ति संगीतात हा अभंग हमखास ऐकायला मिळायचा.संत चोखोबा म्हणतात “आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन.” मला पुराण कळत नाही आणि वेदातील वचने देखिल कळत नाहीत. ते जरी असे म्हणत असले तरी माझ्या मते त्यांना आपल्या पेक्षा जास्त ज्ञान होते. चोखोबा म्हणतात “आगमाची आढी निगमाचा भेद, शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा” चोखोबा म्हणतात आगम हे अध्यात्मातील तत्वज्ञान आहे,ज्याचे शैव पंथी आचरण करीत असतात आणि निगम म्हणजे वेदांना प्रमाण मानणारे वैष्णव पंथी आचरण करतात. म्हणजेच शैव परंपरेतील आगमाची आढी आणि वैष्णव परंपरेतील निगमाचा  भेद काय हे मला माहिती नाही,तसेच शास्त्रात काय आहे हे देखिल मला माहित नाही.

पुढे चोखोबा म्हणतात, “योग,याग,तप, अष्टांग साधन, न कळेची दान व्रत तप” अर्थात मला योग विद्या काय आहे ते माहिती नाही, याग म्हणजे यज्ञ काय ते माहित नाही,तो कां केला जातो,त्याचे महत्व काय हे मला काहीच माहित नाही. तप म्हणजे तपश्चर्या म्हणजे काय? ती कशासाठी करावी लागते हे मला माहित नाही. तसेच मोक्षप्राप्ती साठी करावी लागणारी आठ प्रकारची योग साधने कोणती ती देखिल मला माहित नाहीत. दानाचे आणि व्रताचे महत्व देखिल मी जाणत नाही. असे चोखोबा म्हणतात.

शेवटी चोखोबा म्हणतात “चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा,गाईन केशवा नाम तुझे.” चोखोबांचे हे विचार मला भावतात. ते म्हणतात की हे परमेश्वरा,देवा विठ्ठला माझा भोळा भाव आहे आणि असं म्हणतात की तू तर भावाचा भुकेला आहेस.मग मी कशाला दुसरे काही करू मला त्याची गरज वाटत नाही. मी तुझे नाम गात राहीन. वारकरी संप्रदायात नामाचे महत्व अनन्य साधारण आहे.

 समारोप

तुम्हाला वर लिहिलेले म्हणजेच वेद,योग,याग,तप, अष्टांग साधन,दान, व्रत, तप, आगम आणि निगम काही देखिल माहित नसले तरी तुमचा परमेश्वर चरणी भाव आहे, श्रद्धा आहे तर त्याच्या नुसत्या नामाचे गायन केले तरी पुरेसे आहे.असाच या अभंगाचा मतीतार्थ आहे.या सर्व गोष्टी करायच्या असतील तर खुशाल करा पण त्यात देखिल भावभक्तीने करण्याची गरज आहे. केवळ उपचार म्हणून नको असे मला वाटते.तुम्हाला काय वाटत ते ह्या ब्लॉग मधे दिलेल्या कमेन्ट बॉक्स मध्ये लिहा. आणि हो लिहितांना आपले नांव शेवटी जरूर लिहा.

 ऐकुया हा अभंग 


 प्रसाद नातु,पुणे.

                                                         

 photo courtesy@ Amazon  

 


Comments

  1. ब्लॉक बिल्कुल योग्य वाटला, भक्ति ने घेतलेले नाम हेच तारक अस्ते

    ReplyDelete
  2. अनिल वेगिनवार

    ReplyDelete
  3. रामकृष्ण हरि🙏🌺🌺

    ReplyDelete
  4. जय राम कृष्ण हरी.

    ReplyDelete
  5. खूप छान. सोप्या आणि कमीत कमी शब्दात खूप काही सांगितले आहे.
    - पराग जोगळेकर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...