ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025. मित्रांनो, माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर: लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...
Blog No. 2023/10 5 Date: 30th, April 2023. मित्रांनो, आपल्या देशात काही नवीन गोष्टी घडत आहेत.ह्याचे श्रेय निश्चितपणे केंद्र सरकारला आणि त्या सरकारचे नेतृत्व करणाऱ्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते.गोष्टी लहान लहान असतात पण हिंदीत म्हणतात ना “छोटी छोटी बाते भी माईने रखती है.” बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ( BRO) ने माणा गावात एक साइनबोर्ड लावला आहे , जिथे लिहिले आहे "पहिले भारतीय गाव माणा." हेच माणा गाव पूर्वी भारतातील शेवटचे गाव म्हणून ओळखले जायचे. आजच्या ब्लॉग मध्ये सविस्तर जाणून घेऊया. प्रास्ताविक माणा हे भारतातील उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात वसलेले एक छोटेसे गाव आहे. हे भारत-तिबेट सीमेजवळ वसलेले आहे आणि भारतातील अनेक सीमावर्ती गावांपैकी एक आहे.माणा हे गांव आकाराने जरी लहान असले , तरी लोकप्रियतेचा विचार करता ते खूप महत्वाचे आहे. माना गावाबद्दल येथे काही मनोरंजक तथ्ये आहेत.त्यातील एक म्हणजे , हे गाव पांडवांचे जन्मस्थान असल्य...