Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

कोची वॉटर मेट्रो सेवा

Blog No. 2023/103         

Date: 29th, April 2023. 


मित्रांनो,  

          भारतात एका बाजूला शहरात मेट्रोचे जाळे विणले जात असतांना,मध्यंतरी गंगेतून वाहतूक सुरू केली गेली.कोची हे केरळमधील एक वैशिष्ठपूर्ण शहर जे कोचीन म्हणून देखिल ओळखले जाते.कोची हे मलबार किनाऱ्यावरील एक महत्वाचे बंदर आहे.कोची किंवा कोचीनची लोकसंख्या ही 21 लाखाच्या जवळपास आहे.एर्नाकुलम हे जिल्ह्याचे ठिकाण असून कोची हा त्याचाच एक भाग आहे.कोची हे अनेक बेटांनी वेढलेले गांव आहे.इथे सामुद्रिक वाहतुकीला वाव आहे.इथे तशीही जलवाहतुक सुरू आहे,पण खासगी वाहतूकदार आहेट.पण 25 एप्रिल, 2023 ला एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली.त्या बद्दल आहे आजचा ब्लॉग.

कोची वॉटर मेट्रोचे उद्घाटन                   

कोची येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी 25 एप्रिल 2023 ला भारतातील पहिल्या वॉटर मेट्रो सेवेचे उद्घाटन झाले. मंगळवारी उद्घाटन झालेल्या या वॉटर मेट्रो सेवेचा   बुधवारी 6,559 प्रवाशांनी आस्वाद घेतला.या सेवेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून त्यांचे जीवन सुसह्य झाले आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, मेट्रो जलवाहतुकीत मोठी क्रांती आणेल आणि राज्याच्या पर्यटनालाही चालना देईल.केरळ सरकार आणि जर्मन फर्म KfW  यांचे  अर्थसहाय्य असलेल्या,या बोटी कोचीन शिपयार्ड लिमिटेडद्वारे तयार केल्या आहेत.एकूण प्रकल्पात 38 टर्मिनल्ससह 78 इलेक्ट्रिक बोटींचा समावेश आहे.बुधवारी म्हणजे 26   एप्रिल,2023 ला,सकाळी 7 वाजता व्यावसायिक कामकाज सुरू झाले आणि रात्री 8 वाजता संपले.दर 15 मिनिटांनी 'वॉटर मेट्रो' हायकोर्ट ते वायपिन टर्मिनल्स दरम्यान धावेल.

वॉटर मेट्रोचा प्रवास अनुभव घेण्यास गर्दी

पहिल्याच दिवशी, वॉटर मेट्रोचा प्रवास अनुभवण्यासाठी टर्मिनल परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती आणि शेकडो लोक बोटींमध्ये बसण्यासाठी लांब रांगा लावून थांबलेले होते.वॉटर मेट्रो प्रकल्पाचे उद्दिष्ट कोची तलावाच्या किनाऱ्यालगत असलेल्या शहरी घरांसाठी मुख्य भूभागावरील व्यावसायिक क्षेत्रांमध्ये प्रवेश सुलभ करणे आणि त्याच वेळी शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करणे हे आहे. प्रवासी वाढवण्यासाठी, कोची वॉटर मेट्रो प्रकल्प वारंवार नवीन, ऊर्जा-कार्यक्षम, पर्यावरणास अनुकूल आणि सुरक्षित अशा बोटी लॉन्च करण्याची योजना आखत आहे.

कोची मेट्रोबद्दल थोडेची माहिती  

कोची वॉटर मेट्रो प्रकल्पात 15 मार्गांचे बांधकाम समाविष्ट आहे,जे 78 किमी-लांब मार्गांच्या नेटवर्कसह 10 बेटांना जोडेल, 78 जलद, इलेक्ट्रिकली-प्रोपेल्ड हायब्रीड फेरीचा ताफा वापरून 38 जेटीवर थांबतील. वॉटर मेट्रोमुळे बेटावरील 100,000 पेक्षा जास्त लोकांना फायदा होईल असा अंदाज आहे.

ही एक खेळ बदलणारी (Game Changer) वाहतूक व्यवस्था आहे.कारण कोची अनेक बेटांनी वेढलेले आहे आणि त्यापैकी 10 बेटे अतिशय महत्त्वाची आणि दाट लोकवस्तीची आहेत, असे कोची मेट्रो रेल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यांनी सांगितले.

कोची वॉटर मेट्रोबद्दल सर्व काही

1.     कोची बंदर शहराच्या सभोवतालची एकूण 10 बेटे जोडली जातील आणि पहिल्या टप्प्यातील सेवा हायकोर्ट-वायपिन टर्मिनल ते व्हिटिला-कक्कनड टर्मिनलपर्यंत सुरू होईल.

2.    तिकीट ऑनलाइन बुक केले जाऊ शकतात आणि ते कोची वॉटर मेट्रोमध्ये प्रवास करण्यासाठी ‘कोची 1’ कार्ड देखील वापरू शकतात.

3.    तिकिटाची किंमत: किमान .20 आणि कमाल .40. नियमित प्रवासी 180 ते ₹1,500 पर्यंतचे साप्ताहिक किंवा मासिक पास घेऊ शकतात.

4.   सीएम विजयन म्हणाले की, वॉटर मेट्रोने प्रवासी हायकोर्ट टर्मिनलवरून वायपिन टर्मिनलला 20 मिनिटांत आणि कक्कनाडहून वायपिनला 25 मिनिटांत ट्रॅफिकमध्ये न अडकता पोहोचू शकतात.

5.    हा प्रकल्प ₹747 कोटी रुपयांचा आहे, ज्याने 78 किमी पसरलेल्या बेटांना जोडणारे 15 मार्ग निवडले आहेत.

समारोप

भारत बदलतोय. 75 वर्षानंतर कां होईना काही नवीन ऐकायला मिळते आहे. 75 वर्षात काहीच झाले नाही असे नाही म्हणणार,पण 11 पंचवार्षिक योजना आणि तीन वार्षिक योजना ह्यांचा एकंदर outlay बघता,भारत प्रगतिशील राष्ट्रांमधून प्रगत राष्ट्रात जाण्यास काही हरकत नव्हती.पण जाऊ द्या. “जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी अथवा पुरुनी टाका. सडत न एक्या ठायी ठाका,सावध, ऐका पुढल्या हाका.” असे केशवसुत म्हणून गेलेत.तर आज इथेच थांबतो. पुनः भेटू या. शनिवारच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत नमस्कार. 

 

 

प्रसाद नातु,पुणे.

Comments

  1. Real game changer
    छोड़ो कल की बातें
    कल की बात पुरानी
    नए दौर में लिखेंगे
    मिलकर नई कहानी ..

    ये

    ये गाना

    उपरोक्त गीत

    ReplyDelete

Post a Comment