Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

वाहनांचे फॅन्सी नंबर

 Blog No. 2023/55    

Date:3rd, March 2023.


मित्रांनो,

कुणाला कुठल्याचे आकर्षण वाटेल सांगता येत नाही. वाहनांचे आकर्षण खूप लोकांना असते. ते फक्त एखादी नविन कार किंवा मोटरसायकल with new features येते आहे. ह्याची वाटच पहात असतात आणि अशी  कार किंवा मोटरसायकल लॉंच झाली की लगेच जुनी विकून टाकून नविन घ्यायला मोकळे होतात.काही दिवसांनी ही आवड व्यसनांत बदलून जाते.ते क्वचितच एखादी कार किंवा मोटरसायकल 5000 किमी चालवत असतील. नविन कार किंवा मोटरसायकल with new features असली तरी रस्ते तेच असतात, खड्डे तेच असतात आणि ट्राफिक देखिल तोच सिग्नल न पाळणारा, रॉन्ग साइड ने येणारा, समोर खूप जागा असतांना हळूहळू आपल्या स्पीडने जात लोकांना बोअर करणारा, आलिशान कारचा काच उघडून बाहेर पिचकारी मारणारा,नाही तिथे गाडी पार्क करणारा, रस्त्यात कार मोटरसायकल उभी करून मोबाईल वर बोलणारा,अजून असे किती तरी लिहिता येतील. तात्पर्य हेच की मग कार किंवा मोटरसायकल नविन घेऊन काय फायदा.ह्याचं उत्तर हे जे सर्व काही करतात ना तेच देऊ शकतात. 




वाहनांचे फॅन्सी नंबर

तर ठीक आहे, कार किंवा मोटरसायकल with new features घेतली आणि शहराच्या बाहेर कुठे आउटिंग गेलो तर एक वेगळीच मजा असते हे काय फायदा ह्याचे एक उत्तर मला सुचले. पण माझ्या कार किंवा मोटरसायकलचा रजिस्ट्रेशन नंबर 8645 असला काय किंवा 8888, 5555, 8, 5 77 असला काय,ह्याचा काय फायदा हो. ना कार किंवा मोटरसायकलची स्पीड वाढत ना ती अॅवरेज जास्त देत ना ती विदाउट ड्रायवर चालत काही नाही. तरी देखिल पण पुणेकर म्हणून रोज नवनवीन किस्से ऐकायला मिळतात. आता RTO कडून मिळालेल्या माहिती नुसार असे वाहनांचे फॅन्सी नंबर घेण्यासाठी जे अतिरिक्त शुल्क (FEE) भरावे लागते.तो जो महसूल RTO ने वसूल केला आहे, तो 2021 मध्ये रु.21.45 कोटी होता तो 2022 मध्ये वाढून रु.31.80 कोटी झाला आणि या वर्षी महसुलची रक्कम फक्त जानेवारी 2023 ची रु.4.80 कोटी झाला आहे. (कोटीच्या कोटी उड्डाणे असे मारुती रायाच्या बाबतीत म्हटले जायचे.) 

पुणेकरांना 1,7 किंवा 9 हा नंबर पसंत आहे असे देखिल RTO च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एखाद्या विशेष नंबरसाठी जर खूप साऱ्या applications आल्या तर auction करून जो जास्त बोली लावेल त्याला तो नंबर देण्यात येतो. जे पुणेकर महागड्या कार विकत घेतात, ते 1,7,9,77,90,99,9999,990,770,7070,7707 तसेच 9090 आणि 9990 ह्या सारखे नंबर पसंत करतात.




तात्पर्य:-

कार किंवा मोटरसायकल ज्याची त्याची असल्याने तिला कुठला नंबर हवा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पसंत अपनी खयाल अपना अपना. पण सरकारच्या RTO विभागाची त्या निमित्ताने ही जी अतिरिक्त कमाई होते आहे आणि ती सरकारच्या खाती जमा होते आहे.जी स्वागतार्ह बाब आहे. 


                                                                                                                                            प्रसाद नातु,पुणे. 


Comments

  1. खरंय छान माहिती

    ReplyDelete
  2. Same with mobile number. But don't know how much revenue they are getting.
    We had had a clerk who used to inform about opening ac out with specific number in manual Banking system in Gadhinglaj

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...