Skip to main content

मधुमेह आणि आवळा, एक सुपरफूड

  ब्लॉग नं. 2026/08 2 दिनांक: 23 मार्च , 2026. मित्रांनो मधुमेह आणि आवळा: रक्तातील साखर नियंत्रित करणारे एक नैसर्गिक ' सुपरफूड ' आजच्या धावपळीच्या युगात ' मधुमेह ' (Diabetes) हा जीवनशैलीशी संबंधित,एक अत्यंत वेगाने पसरणारा आजार बनला आहे.चुकीच्या खाण्याच्या सवयी , मानसिक ताण , लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव,ही यामागची प्रमुख कारणे आहेत. मधुमेह केवळ रक्तातील साखरेवरच परिणाम करत नाही , तर तो हळूहळू डोळे , किडनी , हृदय आणि मज्जातंतूंवरही विपरीत परिणाम करू शकतो.चला सविस्तर जाणून घेऊ. सविस्तर:  अशा परिस्थितीत , औषधांसोबतच ' काय खावे आणि काय टाळावे ' हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकदा मधुमेही रुग्ण फळे खाण्यास घाबरतात , परंतु निसर्गामध्ये असे एक ' सुपरफूड ' उपलब्ध आहे जे साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित करण्यास मदत करते— ते म्हणजे ' आवळा ' . आवळा: पोषकतत्त्वांचा खजिना : आवळ्याला ' इंडियन गूसबेरी ' असेही म्हणतात.अनेकांना वाटते की आवळा आंबट असल्याने तो हानिकारक ठरेल , पण सत्य याच्या उलट आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी , फा...

उस्ताद बिस्मिल्ला खान- Ustad Bismilla Khan

 Blog No. 2023/71      

Date: 21st, March 2023.


 

मित्रांनो,

            पूर्वी काय आणि आता काय,लग्नाच्या किंवा एखाद्या मंगल प्रसंगाच्या प्रारंभी मंगल वाद्यांचे सूर म्हणजे सनई वाजविली जातं असे.हळूहळू जसे कॅसेटचं युग आलं तसं सनईच्या कॅसेट वाजवित असतं,त्या नंतर सीडी, मग पेन ड्राइवचा जमाना आला. आजकाल तर थेट यूट्यूबवर मंगल वाद्याचे विडियो वाजविले जाते.उपकरण बदलली. मंगलवाद्य तेच आहे सनई आणि ती ही उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी वाजविलेली.मंगल कार्यक्रम, आणि मंगलवाद्यांचे ह्यांचे जे नाते तेच मंगलवाद्यांचे आणि शहनाईचे आणि सनई कुणाची उस्ताद बिस्मिल्ला खान यांची.त्यांची आज 107 वी जयंती.

 

उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या बद्दल थोडे काही

            काही कलाकार शतकातून एखादा जन्माला येतात.उस्ताद बिस्मिल्ला खान हे त्यापैकी एक.उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा जन्म 21 मार्च,1916 चा. त्यांचा जन्म एका पारंपरिक मुस्लिम कुटुंबात झाला.त्यांच्या आई वडिलांचे ते दुसरे अपत्य.त्यांचे वडील पैगंबर बक्ष खान हे डुमरान संस्थान ह्या बिहारमधील एका संस्थानात महाराजा केशव प्रसाद सिंह यांच्या दरबारात सनई वादनासाठी जात असतं. उस्ताद बिस्मिल्ला खान ह्यांचे लहानपणचे नांव  कमरुद्दीन होते.पण ते उस्ताद बिस्मिल्ला खान या नावाने नावारूपास आले. वाराणसी मध्ये त्यांनी आपले मामा अली बख्ष विलायती यांचे कडून सनई वादनाचे शिक्षण घेतले. त्यांचे मामा उस्ताद 'विलायतीहे विश्वनाथ मंदिरात स्थायी स्वरूपात  सनई -वादनाचे काम करायचे. उस्ताद बिस्मिल्ला खान काशीच्या बाबा विश्वनाथ मंदिरात जाऊन सनई वाजवायचे आणि त्या सोबत गंगा नदीच्या किनारी बसून रियाज करीत असतं. बनारस सोडण्याच्या विचाराने ते व्यथित होतं. ते जात पात मानीत नसतं. संगीत हाच त्यांचा धर्म होता. सनईच्या माध्यमातून विविध रागांची ते मांडणी करीत असतं. राग भूपाली,राग तोडी, राग भीमपलासी, राग शाम कल्याण, राग यमन, राग वृंदावनी सारंग ह्या विविध रागातून ते सनईचे सूर रासिकांपर्यंत पोहोचवित असतं.रागाचे काडीमात्र ज्ञान नसलेल्याला देखिल त्यांचे  विविध रागातील सनई वादन मंत्रमुग्ध करीत असे.                    

            15 ऑगस्ट,1947 ला त्यांना लाल किल्यावर जेव्हा तिरंगा फडकावण्यात आला.त्या कार्यक्रमात सनई वादन करण्यासाठी त्यांची निवड झाली होती. 1966 पूर्वी परदेशातून आलेली निमंत्रणे ते स्वीकारीत नसतं. पण भारत सरकारने एडीनबर्ग इंटरनॅशनल फेस्टिवल मध्ये त्यांनी कार्यक्रम द्यावा, यासाठी रदबदली केल्यावर त्यांनी तिथे आपली कला प्रदर्शित केली. तेव्हापासून ते परदेशात देखिल लोकप्रिय झाले. त्यांनी अफगाणिस्तान, अमेरिका, कॅनडा, बांगलादेश, इराण, इराक, पश्चिम आफ्रिका, जपान, हाँगकाँग आणि युरोपच्या विविध भागांसह अनेक देशांमध्ये सनई वादनाचे कार्यक्रम केले.आपल्या शानदार कारकिर्दीत त्यांनी  जगभरातील अनेक प्रमुख प्रदर्शनांमध्ये सनई वादनाचे कार्यक्रम केले.यात मॉन्ट्रियलमधील जागतिक प्रदर्शन, कान्स आर्ट फेस्टिव्हल आणि ओसाका ट्रेड फेअरमध्ये केलेल्या काही कार्यक्रमांचा समावेश होतो.

 

पुरस्कार आणि सन्मान

1.       1956 साली त्यांना संगीत नाटक अकादमी अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

2.       1961 साली त्यांना पद्मश्री हा चतुर्थ सर्वोच्य नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.

3.       1968 साली त्यांना पद्मभूषण हा तृतीय सर्वोच्य नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.  

4.       1980 साली त्यांना पद्मविभूषण हा द्वितीय सर्वोच्य नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.

5.       2001 साली त्यांना भारतरत्न हा सर्वोच्य नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.

6.       याशिवाय मध्यप्रदेश सरकारचा तानसेन अवॉर्ड, संगीत नाटक अकादमीची फेलोशिप प्रदान करण्यात आली होती.

 

मृत्यु

            सनई सारख्या केवळ लोकसंगीतात वाजवल्या जाणाऱ्या वाद्याला त्यांनी मैफिलीत सादर केल्या जाणाऱ्या वाद्याचा सन्मान प्राप्त करुन दिला.अशा ह्या संगीतातील जादूगाराने 21 ऑगस्ट 2006 रोजी वाराणसी येथे या जगाचा निरोप घेतला. खऱ्या अर्थाने उस्ताद  असणाऱ्या उस्ताद बिस्मिल्ला खान यांना त्यांच्या 107 वा जयंती दिनी त्रिवार प्रणाम.        

 

 

प्रसाद नातु,पुणे.    

Comments

  1. सनई -वादन ani उस्ताद बिस्मिल्ला खान dusra kahi tyapudhe nahi year Ani athavnar suddha nahi. Your efforts of blog writing at odd hours needs huge applause.

    ReplyDelete
  2. फार मोठ्या मनाचा माणूस आणि त्यांच्याबाबतचा फार छान लेख

    ReplyDelete
  3. Chan challay sagle. Tumche blog vachtana khoop mahiti milte.👌

    ReplyDelete
  4. Khupch chan mahiti.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...