Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

श्रीराम नवमी

Blog No. 2023/77     

Date: 30th, March 2023

 



मित्रांनो,

            आज चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच श्रीराम नवमी.मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रांचा आज जन्मदिवस.कुठल्याही गोष्टीत अर्थ/तथ्य नाही म्हणजे राम नाही असे आपण म्हणतो.दुसऱ्या अंगाने विचार केला तर जिथे राम आहे त्या गोष्टीत अर्थ आहे आणि तथ्य देखिल आहे.एवढी मोठी गोष्ट आपण कशी सहज म्हणून जातो बघा.

 

प्रभू श्री रामचंद्रांचे जीवन

भगवान श्री  रामचंद्रांचे आयुष्य हे अनंत यातनांनी भरलेले होते.सीतेशी स्वयंवर झाल्यावर त्या वेळेसच्या चालीरीती नुसार राजाचा वरिष्ठ राजपुत्र हाच राजा होत असे.पण पितृवचनामुळे श्रीरामांना राज्याचा त्याग करावा लागला.एवढेच नव्हे तर 14 वर्षाचा वनवास देखिल भोगावा लागला.वनवासाचा अवधि तरी सुखात गेला कां,नाही. तिथेही त्यांची प्रिय पत्नी सीतेचे अपहरण केले गेले.सुग्रीव सेना आणि परमसेवक भक्त हनुमानाच्या मदतीने महाप्रतापी रावण,कुंभकर्ण आणि मेघनाद आदि महायोध्याना पराजित करून सीतेला परत मिळविले.सीता अग्निदिव्यातून सुखरूप बाहेर आली.पण लोकापवादामुळे पुनः सीतेला वनात सोडून द्यावे लागले.लव कुश या आपल्या पुत्रांच्या भेटीचा आनंद देखिल पुरता उपभोगता आला नाही.कारण सीतेला धरणीमातेने आपल्यात सामावून घेतले.त्यानंतर प्रिय बंधु लक्ष्मणाचा वियोग.संत तुकाराम म्हणतात “ज्याचे अंगी मोठेपण, तया यातना कठीण.” लौकिक अर्थाने हे सत्य जरी असले तरी,श्रीरामचंद्र हे केवळ त्यांना यातना सहन कराव्या लागल्या म्हणून मोठे नाहीत.तर या सर्व यातना,संकट यात कधीही आपल्या मर्यादा त्यांनी सोडल्या नाहीत म्हणून ते मोठे ठरले.

प्रभू श्रीरामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते ते यामुळेच.मर्यादांचे पालन करणाऱ्या पुरुषामधील उत्तम पुरुष असे त्यांना म्हटले जाते. श्रीरामचंद्र हे मानव होते. तुमच्या माझ्या सारखे, पितृवचन झुगारून देणे त्यांना सहज शक्य होते.पण ते आदर्श पुत्र होते.आदर्श पुत्राच्या व्याख्येत बसेल असेच ते वागले.या प्रसंगी त्यांनी आपला संयम सोडल्याचे,त्यांना राग आल्याचे वाचायला मिळत नाही.लक्ष्मण क्रोधित होतो,आपल्या आईची कृती पाहून भरत क्रोधित होतो.पण श्रीराम नाही.

 


सीतेसोबत श्रीरामचंद्र

वनात असतांना सीतेला कांचनमृगाचा मोह झाला.आपल्याला सगळ्यांना माहित आहे की श्रीरामचंद्र हे मानव होते.सीतेने जेव्हा त्यांच्या समोर कांचनमृगाच्या चोळीबद्दल म्हटले.तेव्हा मला जे वाटते ते हे की  श्रीरामचंद्रांच्या मनात हा विचार आला असावा,की अरे 14 वर्षे वनवास,हा तर माझ्यासाठी होता.ही सर्वसंग परित्याग करून माझ्या सोबत आली.लग्नाला काही जास्त वर्षे झाली नव्हती. एक महाराणी म्हणून ती खूप सुखात असती. पण तिने देखिल मला झालेल्या वनवासाबद्दल,कुणाला दूषणे न देता केवळ माझ्या सोबत राहायची इच्छा प्रकट केली. कुरबुर केली नाही.कांचनमृगाच्या चोळीबद्दल म्हणते आहे तर करावे ना काही हिच्यासाठी.मी ना वाल्मिकी रामायण वाचले आहे ना अन्य कुठले पण एक सामान्य माणूस म्हणून प्रभू रामचंद्राच्या मनात जे आले असावे असे मला वाटते ते मी लिहिले आहे.सीतेच्या वियोगानंतर प्रभू श्रीरामचंद्रांना शोक अनावर झाला होता.हे देखिल  ते मानव  असल्याचे दर्शविते.

यानंतर रामायणात घडलेल्या अनेक प्रसंगातून प्रभू रामचंद्र हे मानव होते हे सिद्ध होते.प्रभू रामचंद्र आणि सुग्रीवाची सेना ही सागराच्या अलीकडील किनाऱ्यावर असतांना सागर कसा पार करुन जावा या बद्दल प्रभू रामचंद्र अनभिज्ञ होते.नळ आणि नील या संबंधीची माहिती,म्हणजे ते दोघं विश्वकर्मा यांची मुले आहेत.त्यांची सेतु बांधण्यास मदत होईल.हे प्रत्यक्ष समुद्राने त्यांना सांगितले. दूसरा आणखी एक प्रसंग म्हणजे इन्द्रजीतच्या बाणांनी लक्ष्मण बेशुद्ध होऊन पडतो हा.या प्रसंगी प्रभू रामचंद्र हतबल होतात.बिभीषणाची मदत घेऊन लंकेतील वैद्य सुषेण हा द्रोणागिरी पर्वतावरील औषधी आणण्याबद्दल सांगतो.आणखी एक गोष्ट अशी प्रभू श्रीरामचंद्र रावणाची मस्तके धडापासून अलग करतात.पण रावणाचा मृत्यु होत नाही.तेव्हा इंद्राच्या रथाचा सारथी मातली प्रभू श्रीरामचंद्रांना सांगतो की तुम्हाला अगस्ती ऋषींनी दिलेल्या बाणाचा उपयोग करावा. ह्या साऱ्या गोष्टी प्रभू रामचंद्र हे मानव होते आणि त्यांची वर्तणूक तशीच होती हे सिद्ध करते.

थोडक्यात मला हे म्हणायचे आहे की जरी प्रभू रामचंद्र श्रीविष्णूचा अवतार होते. तरी प्रभू रामचंद्र हे एक मानव होते आणि त्यांनी आपल्या चारित्र्यातून,वागणुकीतून,कृतीतून,आचार आणि विचारातून स्वतःला देवपदांपर्यंत पोहोचविले. म्हणून ते पूजनीय आहेत आणि अनुकरणीय देखिल .

शेवटी प्रभू रामचंद्राची आराधना कशासाठी करायची ऐहिक सुखासाठी,नाही. तर विपदा आणि विपरीत परिस्थितिवर कशी धैर्याने मात करायची ह्याची  प्रेरणा घेण्यासाठी, प्रत्येक परिस्थितित संयम राखता यावा यासाठी. संयम फक्त विपरीत परिस्थितित राखावा लागतो कां? नाही. तर सुखाच्या परिस्थितित संयम राखणे म्हणजे जमिनीवर पाय असू देणे हे होय. आज श्रीराम नवमीच्या पावन दिवशी मी आपणा सर्वांस खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि प्रभू श्रीरामचंद्रांना वंदन करुन आजचा ब्लॉग संपवितो  

 

photo courtesy@printrest 

 

                                                                                                             प्रसाद नातु,पुणे.  

                               

 

 

Comments

  1. खूप छान माहिती.
    श्रीरामांचा जन्म हा समाजामध्ये आदर्श दाखवण्यासाठी झालेला आहे.

    , एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, कर्तव्यदक्ष, जाणता राजा,.

    राजे अनेक झाले पण श्री रामा सारखा नाही
    राम नामात प्रचंड ताकद आहे.
    ब्लॉग आवडला.
    आपण मत मांडलं हे महत्त्वाचं.

    ReplyDelete
  2. जय श्रीराम !

    ReplyDelete
  3. मस्त विचार मांडला आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...