ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025. मित्रांनो, माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर: लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...
Blog No. 2023/7 8 Date: 31 st ,March 2023 मित्रांनो, गेल्या दशकभरापासून माणसाच्या जीवनात विशेषतः नोकरी करणाऱ्यांच्या जीवनात,खूप बदल घडून आलेत.जीवघेणी स्पर्धा,बदललेली जीवन पद्धती,लहान लहान गावातून आणि शहरातून मोठ्या शहरांकडे झपाट्याने होणारे स्थलांतर,बदललेल्या कार्य पद्धती,कार्याच्या वेळा,वाढत्या गरजा,मोठ्या शहरांचे अचानक मेट्रोमधे झालेले रूपांतर,त्या शहरातील घरापासून कार्य स्थळी पोहोचण्यासाठी लागणारा विलंब,या साऱ्याचा परिणाम ऑफिसमधील कार्य किंवा काम आणि वैयक्तिक जीवन यांचे संतुलन बिघडण्यात झाला आहे.आपल्या व्यस्त कामाच्या वेळापत्रकात,आपण आपले वैयक्तिक जीवन हरवून बसायला लागलो आहे.आपण आपल्या कार्यातील वचनबद्धतेला,आपल्या वैयक्तिक जीवनापेक्षा अधिक महत्व देऊ लागलो आहे.कार्य स्थानातील जास्त दबावामुळे जास्त ताण आणि ताणामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या अनेक समस्या उदभवू शकतात, नव्हे उदभवत आहेत.पुरेशी विश्रांती किंवा झोप न मिळाल्याने कामाच्या उत्पादकतेवर आणि कार्यक्षमतेवरही विपरित परिणाम ह...