Skip to main content

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

मोठ्या थकित कर्जदारांना कर्ज माफी मिथ्या काय तथ्य काय?

Blog No. 2023/73        

Date: 24th, March 2023. 



मित्रांनो,

            काल मी अमेरिकेतील बँकांच्या कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय बँकांच्या स्थितिबद्दल लिहिले होते. कालच एक लेख प्रसिद्ध झाला.त्यात अर्थतज्ञांनी भारतीय बँका सुरक्षित आहेत आणि भारत सरकार व रिजर्व बँक ऑफ इंडिया त्याकडे लक्ष ठेवून असते असे म्हटले आहे.आज मी बँकिंग संबंधित एका वेगळ्या विषयाला हात घालतोय. ज्या संबंधात लोकांमध्ये खूप गैरसमज अधिक आहेत.मधूनमधून त्या संबंधीत कंडया पिकवायची कामं प्रसार माध्यमे,राजकीय पक्ष करीत असतात.

 

एनपीए अकाऊंट म्हणजे काय?

              मित्र हो, मला आता 3 वर्षे होतील बँकेतून सेवानिवृत्त होऊन.त्यामुळे बँकांबद्दल काही तांत्रिक गोष्टी लिहायच्या झाल्या तर मला देखिल इंटरनेटचा आधार घ्यावा लागतो.अन मग असं लक्षांत येतं की नेटवर एवढे सारे उललब्ध असतांना गैरसमज असायचे कारण असायला नको. एनपीए अकाऊंट म्हणजे काय? ह्याच्या सखोल व्याखेत मी जाणार नाही.एखाद्या कर्ज खात्यापासून बँकेला कर्ज दिलेल्या रकमेबर व्याजाची वसूली नियमित होतं नसेल व ती 90 दिवसांपेक्षा जास्त थकीत असेल तसेच मुदती कर्ज खाते जसे होम लोन, मध्ये हफ्ते नियमित परत येत नसतील  आणि  90 दिवसांपेक्षा जास्त थकीत असेल तर असे कर्ज खाते म्हणजे एनपीए खाते होय.साहजिकच कर्ज खाते एनपीए झाले की त्याच्या वसूलीसाठी प्रयत्न सुरु होतात. ज्यातही दोन प्रकार आहेत. एक तरं ते नियमित करुन घ्यायचे आणि कर्जदार नियमित करायला तयार नसेल किंवा त्याची परिस्थिति नसेल तर वसुलीसाठी जप्ती,कोर्ट केस ह्या सारखे उपाय करायचे.यात देखिल मला खोलात जायचे नाही. कारण माझा उद्देश हा आहे की एनपीए अकाऊंट विशेषतः मोठ्या उद्योगांचे एनपीए अकाऊंट आणि त्यांची कर्जमाफी या वरुन ज्या बातम्या प्रसूत केल्या जातात. त्यात मिथ्या काय आणि तथ्य काय ही तुमच्यासमोर आणणे.

 

एनपीए कर्ज खाते आणि प्रावधान (Provisioning)

            एखादे कर्ज खाते एनपीए झाले आणि ते समजा बुडीत खाते झाले तर बँकेवर त्याचा एकदम परिणाम व्हायला नको म्हणून Provisioning केले जाते.आपल्या देशातील बँका ह्या शेअर बाजारात देखिल आहेत आणि बऱ्याचशा बँकांच्या परदेशात देखिल शाखा आहेत.त्यामुळे या बँकांना आपले प्रॉफिट अँड लॉस अकाऊंट आणि बॅलेन्सशीट प्रसिद्ध करावी लागते.आपल्या देशातच काय जगात सर्वत्र बँकांचा सकल एनपीए किती असावा आणि शुद्ध एनपीए किती असावा याचे नियम आहे.नीरव मोदी,विजय मल्या आणि इतरांची रु.36,000 कोटी रुपयांची कर्जे माफ करण्यात आली अशी बातमी काही महिन्यांपूर्वी प्रसून करण्यात आली. लोकसभेत केलेल्या निवेदानाचा विपर्यास करुन ही बातमी प्रसारित करण्यात आली.ह्यात तथ्य किती मिथ्या किती ते पाहू या.         

 

मिथ्या काय तथ्य काय?

            मी वर लिहिले आहे की बँकांची प्रॉफिट अँड लॉस अकाऊंट आणि बॅलेन्सशीट प्रसिद्ध करावी लागते.त्यामुळे त्यात सकल एनपीए (Gross NPA) किती असावा आणि शुद्ध एनपीए (Net NPA) किती असावा याचे नियम असल्याने बँका एनपीए खात्यासंबंधातील वसूलीची सर्व प्रक्रिया जसे मालमत्ता जप्त करणे, कोर्ट केस केस करणे हे सर्व वसुलीचे प्रयत्न सुरु ठेवते मात्र हे मोठमोठाले एनपीए खाते आपल्या पुस्तकातून राइट ऑफ करते. त्याला टेक्निकल राइट ऑफ किंवा prudential राइट ऑफ म्हणतात.ह्याचा अर्थ ही कर्जे माफ केली जात नाही. त्यातून वसूल झालेली सर्व रक्कम ही बँकेच्या प्रॉफिट अँड लॉस मध्ये जमा होते.ही कर्ज माफी नाही, ही एक बूक एंट्री असते. शेतकऱ्यांची कर्जे जेव्हा माफ केली जातात,तेव्हा त्यांच्याविरुद्ध वसुलीच्या साठी कोर्ट केसेस् दाखल केल्या जात नाहीत. ती कर्जे खरोखर माफ केली जातात. इतकेच नव्हे तर ते पुनः नविन कर्ज घेण्यासाठी पात्र ठरतात. त्यामुळे विजय मल्या किंवा नीरव मोदी इत्यादींची कर्ज माफ झाली असे कुणी सांगितले तर विश्वास ठेवू नका.अशा लोकांकडून बँक कर्ज वसूल करतेच.आणि असे आहे म्हणूनच भारतीय बँका टिकून आहेत.भारतातील बँकांना रिजर्व बँकेने आता हे निर्बंध लागू केले आहेत की त्यांचा provision coverage ratio हा 70% पेक्षा अधिक असायला हवा.ह्याचा अर्थ जेवढी रक्कम एनपीए खात्यामध्ये आहे त्याच्या 70% राशी ही बँकांनी आपल्या प्रॉफिट अँड लॉस मधून बाजूला काढून ठेवावी.म्हणजे एखादे खाते बुडीत खाते झाले तर त्याचा बँकेवर आणि परिणामी ठेवीदाराच्या ठेवीवर आणि त्यांच्या विश्वासावर त्याचा वाईट परिणाम व्हायला नको.

             मला असे वाटते की भारतीय बँकांचा provision coverage ratio हा 80% पेक्षा जास्त आहे.ही देखिल तुमची बँक भक्कम असल्याची आणि तुमची बँक सुरक्षित पावती आहे. मला एका गोष्टीने खूप छान वाटले की आज बँकेत काम करणाऱ्यांना नेटवर किती माहिती उपलब्ध आहे.अन्यथा मला सेवानिवृत्तीच्या 3 वर्षानंतर इतकी माहिती लक्षात रहाणे शक्य नव्हते.त्यासाठी संकल्पना समजून घेणे आणि त्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे. Up-dation तर नेटमुळे करणे सहज शक्य आहे.

 

 

प्रसाद नातु,पुणे.  

माहिती सौजन्य @अर्थात इंटरनेटवरील विविध संकेतस्थळे             

Comments

  1. खूप छान माहितीपूर्ण लेख.
    सौ.भावना नातू.

    ReplyDelete
  2. छान माहिती

    ReplyDelete
  3. उपयुक्त माहिती

    ReplyDelete
  4. Very useful information. Thanks.

    ReplyDelete

Post a Comment