Skip to main content

दररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते?

  ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025.   मित्रांनो,              माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर:          लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...

अन्नधान्याची नासाडी

 Blog No. 2023/74      

Date: 26th, March 2023

 


 मित्रांनो,

            बँकिंग बद्दलचे दोन स्वतंत्र ब्लॉग केल्यानंतर आज थोडा वेगळ्या विषयाकडे वळतो.हा विषय गंभीर आहे.ह्याचा उपाय सापडायला हवा असे ह्या ब्लॉगच्या शेवटापर्यंत नक्कीच तुम्हाला वाटेल.  

 प्रास्ताविक

            आपण जवळपास सगळेच महिन्याभरातून कधी ना कधी हॉटेलमधे जेवायला जात असतो.लग्न वा इतर प्रसंगाला वर्षातून एकदा जात असतो.तेव्हा जर लक्षपूर्वक पाहिले तर तुम्ही विचारात पडाल.खाण्याचे विविध पदार्थ तिथे उपलब्ध असतात आणि आपल्या पोटाचा अंदाज न घेता भरपूर काही ऑर्डर केले जाते आणि त्याचा जो परिणाम व्हायचा तो होतो.म्हणजे बरेचसे अन्न टाकून दिले जाते.आपल्या  देशांत अगदी आजही दोन्ही वेळचे पूर्ण जेवण नशिबी नाही असे असंख्य लोकं आहेत.मी हे जाणून घेण्यासाठी सर्च करुन बघितले तर रोज ह्या हॉटेल्स, उपहारगृहे यांच्याकडे 30 ते 40 % अन्न फेकून द्यावे लागते.पण हे झालं शेतात पिकवेलेले अन्न आपल्या ताटात पडल्या नंतरचे नुकसान. पण पीक काढणीपासून ते आपल्या उपभोगापर्यंत पोहोचण्यापर्यन्त होणारे नुकसान किती असते हे मी तुम्हाला सांगितले तर थक्क व्हाल.   

 कापणीनंतरचे नुकसान

केंद्र सरकारने समर्थित केलेल्या एका समितीच्या अभ्यासानुसार, 2022 मध्ये भारताने काढणी आणि उपभोगा दरम्यान फळे आणि भाज्या यांचे 5-13% इतके आणि तेलबिया आणि मसाल्यांसह इतर पिकांचे 3-7% इतके (एकूण उत्पादनाच्या) नुकसान होते.जर या नुकसानाला रुपयांत  मोजायचे झाले तर ते ₹1,52,000 कोटींपेक्षा जास्त नुकसान आहे.म्हणजेच ही समस्या किती गंभीर आहे. मुख्य म्हणजे गेल्या काही वर्षात धान्य आणि इतर पिकांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झालेली आहे.आर्थिक वर्ष 2015 पेक्षा 2022 मध्ये धान्य आणि इतर पिकांच्या उत्पादनात 23% इतकी वाढ झाली आहे.पण ह्याच अवधीत नुकसानीचे प्रमाण केवळ एक टक्क्याने कमी झाले आहे.

 काढणी आणि उपभोगा दरम्यान नुकसानीची कारणे

भारतात कापणीनंतरच्या पायाभूत सुविधांची समस्या आहे.आपल्या देशातील उष्णकटिबंधीय हवामानाचा  नाशवंत पिकांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.त्यासाठी ते शेतातून बाजारात जाण्यासाठी तयार होईपर्यंत,त्या शेतमालाला साध्या खोलीत ठेवता येणार नाही.त्यासाठी पिकांची वाहतूक करताना योग्य पॅकेजिंग मटेरियल, हवामान-नियंत्रित करणारे स्टोरेज वातावरण आणि अगदी योग्य शीतगृह सुविधा आवश्यक आहेत.पण आपल्याकडे त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत.आकडेवारी बघायची झाली.तर त्यातील साठवण सुविधा ह्या वृक्षारोपण उत्पादनांसाठी लागणाऱ्या साठवण सुविधेच्या 10% एवढ्या आहेत आणि कोल्ड स्टोरेजचा विचार केला तर, भारताची क्षमता फक्त ३२ दशलक्ष मेट्रिक टन कोल्ड चेनची आहे,ज्याची क्षमता ३५ दशलक्ष मेट्रिक टन आहे.ह्यात पिके, मांस, मासे, अंडी आणि दुग्धशाळेत दुग्धन्य पदार्थ सामावले गेल्यावर देखिल बऱ्याचशा गोष्टींसाठी कोल्ड स्टोरेजची ही क्षमता अपुरी आहे. असे म्हणावे लागेल.


 

नुकसान टाळण्यासाठी उपायोजना

            कापणी नंतरच्या पायाभूत सुविधा जसे साठवण सुविधा (Godown) आणि कोल्ड स्टोरेज सुविधा उभारण्यासाठी मदत करण्यासाठीच केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान संपदा योजना (PMKSY) 1 जुलै,2015 पासून कार्यान्वित केली. ह्या योजनेचे उद्दिष्ट कोल्ड स्टोरेज चेन आणि इतर पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी सहाय्य उपलब्ध करुन देणे हा आहे.या योजनेनुसार शेतकऱ्याने गुंतवणूक केली,तर सरकार राज्यानुसार ₹10 कोटींपर्यंतच्या खर्चाच्या 35-75% पर्यंत योगदान देते.पण या योजनेसाठी लागणारा खर्च  एकट्या शेतकऱ्याला परवडण्यासारखा नाही. कारण आपल्या देशात 85% शेतकरी हे लहान आणि सीमान्त शेतकरी आहेत.या प्रकारच्या योजनेत गुंतवणूक करण्यासाठीची क्षमता या शेतकऱ्यांमध्ये नाही.तसेच त्या कर्जाची परतफेड करण्याची देखिल त्याची क्षमता नाही आहे.त्यामुळे योजना चांगली असून देखिल तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही.

 

विकीकरण (Irradiation) एक उपाय

            दूसरा पर्याय हा की पिकांचे विकीकरण (Irradiation) करणे हा एक उपाय आहे.अन्न विकिरण ही एक अन्न सुरक्षा प्रक्रिया आहे जी किरणोत्सर्गाचा वापर जंतूंना मारण्यासाठी करते.ज्या जंतूमुळे अन्न विषबाधा होऊ शकते. (अन्नजनित आजार). अन्न विकिरण ही एक सुरक्षित प्रक्रिया आहे आणि तिच्या परिणामकारकतेला विविध फेडरल एजन्सी आणि आंतरसरकारी संस्थांनी मान्यता दिली आहे. विकिरण ही एक प्रक्रिया आहे.ज्यामध्ये सूक्ष्म जीवजंतू नष्ट करण्यासाठी गामा रेडिएशनद्वारे प्रक्रिया केली जाते. ह्या प्रक्रियेमुळे पिकं कापणीनंतर लवकर खराब होत नाही आणि ती पीक पिकण्यास विलंब करते, अंकुर वाढण्यास प्रतिबंध करते आणि अन्नाचे शेल्फ लाइफ वाढवते.

भारताने 2007 मध्ये आंब्याच्या किरणोत्सर्गाला सुरुवात केली आणि 10 वर्षांत आपण यशस्वीरित्या विकिरणित आंब्याची निर्यात देखिल केली आहे.लवकरच, आम्ही बटाटे आणि कांदे यांसारख्या पिकांचे शेल्फ लाइफ वाढवण्यावरील तंत्राच्या परिणामांवर संशोधन करण्यास सुरुवात केली आहे आणि नॅशनल हॉर्टिकल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की कांद्याचे विकिरण केल्याने उन्हाळ्यातील 6% नुकसान टाळता येते.पण यात एक गोम आहे. इरॅडिएशन हे केवळ योग्य स्टोरेजसाठी एक प्रस्ताव आहे, पर्याय नाही. विकिरण सुविधा प्रकल्प उभारण्यासाठी देखील ₹6-10 कोटींची चांगली गुंतवणूक आवश्यक आहे. म्हणजेच हे प्रक्रिया केंद्र उभे करण्यासाठी लागणारे भांडवल आणि ते कर्ज परतफेड करणे हे लहान आणि सीमान्त शेतकऱ्यांना व्यवहार्य नाही.

सारांश

            सरकारने ह्या साठी शेतकऱ्यांचे स्वयं सहाय्यता समूह बनवून,त्यांना प्रधानमंत्री किसान संपदा योजने अंतर्गत कोल्ड स्टोरेज चेन आणि गोदाम तयार करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे किंवा विकीकरण (इरॅडिएशन) प्रकल्प उभा करण्यास प्रोत्साहन द्यायला हवे.तर देशाचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान कमी करणे शक्य होईल.

 

 

                                                                                    प्रसाद नातु,पुणे.  

 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...