Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

मनमोहन देसाई - एक अनोखा दिग्दर्शक

Blog No. 2023/49         

Date: 26th, February 2023.


 मित्रांनो,

            मनमोहन देसाई हे 70 आणि 80 च्या दशकातील सर्वात यशस्वी चित्रपट निर्मात्यांपैकी एक समजले जातात. बॉलीवूड मधील सर्वात प्रभावशाली चित्रपट दिग्दर्शक आणि मसाला चित्रपटाचे प्रणेते म्हणून देसाई मानले जातात. हिन्दी चित्रपटांचे एक वेगळे युग त्यांच्या मुळे अनुभवास मिळाले.  

 

मनमोहन देसाई बद्दल थोडे काही

            मनमोहन देसाई यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1937 चा. ते एका गुजराती कुटुंबात जन्माला आले. त्यांचे वडील किकूभाई देसाई हे पॅरामाउंट स्टुडिओ (नंतरचे फिल्मालय) चे मालक आणि भारतीय चित्रपट निर्माते होते.त्यांनी  मुख्यतः स्टंट चित्रपट जसे की सर्कस क्वीन, गोल्डन गँग आणि शेख चिली चित्रपट बनविले.त्यांचे मोठे भाऊ सुभाष  देसाई यांनी त्यांना 1960 मध्ये छलिया चित्रपटात दिग्दर्शक म्हणून चान्स दिला.निर्माता सुभाष देसाई ह्यांनी निर्मिलेल्या ब्लफ मास्टर,धरमवीर आणि देशप्रेमी ह्या चित्रपटांची निर्मिती केली.ज्यांचे दिग्दर्शन हे मनमोहन देसाई ह्यांनी केले.   

       

मनमोहन देसाई यांची वेगळी थीम  

मनमोहन देसाई हे परिवार-केंद्रित,action-गाणी-आणि-नृत्य चित्रपटांसाठी ओळखले जातात.भारतीय जनतेच्या अभिरुचीनुसार त्यांनी चित्रपट बनविले.त्यांना त्यात यश देखिल भरपूर मिळाले. मनमोहन देसाई यांनी प्रथम मसाला चित्रपटांची निर्मिती केली. त्यांचे चित्रपट म्हणजे जत्रेत हरवलेले भाऊ पुनः एकत्र येतात. ह्या थीमवर बेतलेले होते.

 


मनमोहन देसाई यांचे चित्रपट

            मनमोहन देसाई यांच्या चित्रपटांची नांवे बघितली तर त्या काळातील लोक हा हिट तो हिट असेच सांगत राहतील. त्याचे शेवटचे तीन चित्रपट मात्र ओळीने फ्लॉप झाले. त्यांनी राजकपूर सोबत 1960 ला छलिया, 1963 ला शम्मी कपूर सोबत ब्लफ मास्टर, 1966 ला बत्तमीज हा शम्मी कपूर सोबत, 1968 ला किस्मत विश्वजीत सोबत तर 1970 ला सच्चा झुटा राजेश खन्ना सोबत, 1972 ला रामपुरका लक्ष्मण रणधीर कपूर सोबत, भाई हो तो ऐसा 1972 ला जितेंद्र सोबत तर  शशी कपूर सोबत 1973 ला आ गले लग जा, राजेश खन्ना सोबत 1974 ला रोटी आणि मग अमिताभ बच्चनचे युग सुरु झाले. 1974 ला परवरिश, 1977 ला अमर अकबर एंथनी, 1979 ला सुहाग, 1981 ला नसीब, 1982 ला देश प्रेमी, 1983 ला कुली,जो अमिताभला सेटवर झालेल्या अपघातामुळे जास्त गाजला,अमिताभच्या प्राणावर बेतले होते,1985 चा मर्द थोडा फार यशस्वी झाला. पण त्या नंतरचे 1988 चा गंगा जमुना सरस्वती,1989 चा तूफान हे दोन चित्रपट अमिताभ असूनही साफ पडले.1993 ला त्यांनी अनमोल हा शेवटचा चित्रपट केला.अमिताभच्या युगातही त्यांनी 1977 ला धर्मवीर आणि चाचा भतिजा हे दोन चित्रपट केले आणि ते यशस्वी झाले.. अमिताभ सोबतचा अमर अकबर अॅंथनी हा मल्टी स्टार चित्रपट यांत अमिताभ सोबतच विनोद खन्ना, ऋषि कपूर, परवीन बाबी,शबाना आझमी,नीतू सिंग आणि प्राण हे स्टार होते. तो काळ हा मल्टी स्टार चित्रपटांचा होता.

मृत्यू

            1994 ला त्यांचा मुंबईतल्या राहत्या घरी मृत्यू झाला.

अशा ह्या मसाला चित्रपटांच्या प्रणेत्यास त्यांच्या 86 व्या जयंतीला माझा प्रणाम.एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून ते वर्षानुवर्ष आठवणीत रहातील,हयात शंका नाही.      

 

 

प्रसाद नातू,पुणे.   

                       

Comments

  1. Chan blog.
    Actress Nanda was supposed to marry film-maker Manmohan Desai, engagement took place in 1992, but before the wedding could take place, Manmohan died when he fell from a building.

    ReplyDelete
  2. Sudden loss of a talented life.....Charumati

    ReplyDelete
  3. विनम्र श्रद्धांजलि🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...